Milind Gawali Instagram
मनोरंजन

Milind Gawali: तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील 'या' बड्या व्यक्तीची भूमिका साकारताना दिसला असता मिलिंद.. पण..

मिलिंद गवळी नेहमीच वैयक्तिक आणि करिविषयीच्या अपडेट चाहत्यांसोबत शेअर करताना दिसतो.

प्रणाली मोरे

Milind Gawali: 'आई कुठे काय करते...' या मालिकेची जितकी चर्चा घराघरात होताना दिसते तितकीच चर्चा या मालिकेतील प्रत्येक कलाकाराची होते. या मालिकेतील तिरसट स्वभावाच्या अनिरुद्धला पाहून सर्वांना राग येत असला तरी हिच मिलिंद गवळीच्या कामाची पोचपावती म्हणावी लागेल.

मिलिंद गवळी नेहमीच त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील किस्से अन् प्रोफेशनल लाईफचे सीक्रेट्सही सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर करत असतो. नुकतीच त्यानं एक पोस्ट केली आहे ज्यात त्यानं राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील एक महत्त्वाची व्यक्ती साकारण्याची संधी मिळता मिळता हुकली असं म्हटलं आहे.

चला सविस्तर जाणून घेऊ या मिलिंदच्या या पोस्टविषयी. (Milind Gawali aai kuthe kay karte Marathi Actor post about new film role audition )

मिलिंद गवळीनं पोस्ट करत म्हटलं आहे, ''Audition
मागच्या आठवड्यात कोणाचातरी फोन आला,
ते म्हणाले एका चित्रपटा साठी श्री माधवराव गोवलकर गुरुजींच्या भूमिकेसाठी तुम्ही ऑडिशन द्याल का'',

''ऑडिशन म्हटलं की मी आधीच नाही म्हणून सांगतो,
पण ऑडिशन कोणासाठी ? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे गोविलकर गुरुजी यांच्या भूमिकेसाठी,
(माधव गोळवलकर हे भारतातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ . हिंदुत्ववादी-राष्ट्रवादी संघटनेचे द्वितीय सरसंघचालक होते. इ.स. १९४० – इ.स. १९७३
श्रीगुरुजींचे जीवन अलौकिक आणि ऋषितुल्य होते.
श्रीगुरुजी सर्वार्थाने राष्ट्रऋषी होते. )
मी म्हटलं देतो ऑडिशन,
ते म्हणाले getup वगैरे ची काही गरज नाही तुम्ही सेल्फ टेस्ट मोबाईलवर शूट करून पाठवा'',

''पण मला तो गेटअप करावासा वाटला म्हणून मग मी
आमचे मेकअप मन समीर म्हात्रे यांना म्हटलं सुट्टीच्या दिवशी आपण गुरुजींसारखा गेटअप करायचा प्रयत्न करूया.
सकाळी नऊ ते एक वाजेपर्यंत आम्ही ती ऑडिशन शूटिंग संपवली,
त्या कास्टिंगच्या गृहस्थाला तो व्हिडिओ पाठवून दिला,
चार दिवसांनी त्याचा मेसेज आला की गुरुजींच्या भूमिकेसाठी तुमची निवड झाली नाही.
Rejection हे माझ्यासाठी काही फार नवीन नाही आहे,
आणि कलाकार म्हटलं की रिजेक्शन हा त्याच्या नशिबाला जडलेला प्रकार आहे.
पण निदान चार तास का असेना अशी भूमिका जगायला मिळाली हे पण एक कलाकार म्हणून माझं भाग्यच आहे असे मी समजतो.
एका आयुष्यामध्ये इतके विविध आयुष्य जगायला मिळणं हे फक्त एका कलाकाराच्याच भाग्यात असतं''.

हेही वाचा: सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

''माझ्या भाग्यात होतं म्हणून “ आई कुठे काय करते “ मालिकेमधली अनिरुद्ध देशमुख ची भूमिका अजूनही जगतो आहे.
नाहीतर आयुष्यामध्ये कधी त्याच्यासारखं तिरसट वागता आलं असतं,
किती कमी कलाकारांच्या वाटेला अशी , इतक्या विविध छटांनी भरलेली भूमिका येत असेल''.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : आम्ही एकत्र आलो ते एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे

Raj Thackeray: निळा मफलर.. डोळ्यांवर गॉगल! राज ठाकरेंच्या 'लूक'मध्ये राजकीय संदेश? अमित ठाकरेही निळ्या शर्टवर

Raj Thackeray: जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं, राज ठाकरेंनी सांगितलं एकत्र येण्याचं कारण

मोठी बातमी! राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्या सुशिल केडियांचं ऑफीस मनसैनिकांनी फोडलं, पाहा VIDEO

Video : "वारी चुकली, पण विठ्ठल भेटला" हॉस्पिटलमध्ये घडली हृदयस्पर्शी घटना; व्हायरल व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील..

SCROLL FOR NEXT