aai kuthe kay karte, milind gawali, milind gawali viral video SAKAL
मनोरंजन

Milind Gawali: मिलिंद गवळी एकविरा आईच्या दर्शनाला, फॅन्सची प्रचंड गर्दी, Video व्हायरल

अनिरुद्धने अरुंधतीच्या लग्नात जे काही अडथळे आणता येतील ते आणले

Devendra Jadhav

Milind Gawali News: 'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte) या मालिकेतील मिलिंद गवळी साकारत असलेल्या अनिरुद्ध या भूमिकेला खलनायक असुनही प्रचंड प्रेम मिळत आहे.

अनिरुद्धने अरुंधतीच्या लग्नात जे काही अडथळे आणता येतील ते आणले. पण तरीही अनिरुद्धच्या विरोधाला न जुमानता अरुंधतीने लग्न केलंच. मिलिंद गवळी यांना त्यांच्या फॅन्सचे अमाप प्रेम मिळतंय याचा अनुभव नुकताच आला.

मिलिंद गवळी एकविरा आईच्या दर्शनाला गेले होते. तिथे मिलिंद गवळी यांना भेटायला त्यांच्या फॅन्सनी प्रचंड गर्दी केली. हा सर्व अनुभव मिलिंद यांनी सोशल मीडियावर शेयर केलाय. मिलिंद गवळी लिहितात..

प्रेम - आतहा प्रेम - असीम प्रेम.. आपली माणसं आपल्यावर प्रेम करतातच, जन्माला आल्या आल्या सगळ्यांना आपल्यावर प्रेम करायला आई असते, जिच्या प्रेमाची तुलना होऊ शकत,

त्यामुळे आपण सगळेच जन्माला आल्यापासून आपल्यावर अतोनात प्रेम करणारा एक तरी व्यक्ती असतोच असतो, ती म्हणजे आपली आई.....

मिलिंद गवळी पुढे लिहितात... आणि मग वडील असतात, प्रत्येकाला ही दोन माणसं तर असतातच , निस्वार्थ प्रेम करणारी, मग नातेवाईक आले, आजी आजोबा आले, आपल्या आईचे आई वडील आणि मग वडिलांचे, नातवावर प्रेम करायला,

मग काका काकू मावश्या मामा मामी आल्या, ते पण आपल्यावर प्रेम करतात, मग भावंड आले, सख्खे चुलत मावस, मग कौटुंबिक मित्रमंडळी पण असतात प्रेम करणारे.

मिलिंद गवळी पुढे लिहितात.. काही बिचारे खूप दुर्दैवी असतात, आयुष्यामध्ये त्यांचे फार कमी लाड होतात किंवा होतच नाहीत. प्रेमाशिवाय मी माझ्या आयुष्याची कल्पनाच करू शकत नाही,कलाकार पण बहुतेक मी यासाठी झालो असेन.

प्रेमाला ही खरंच नशीब लागतं कारण अनिरुद्ध सारखा toxic डोक्याने सटकलेलं कॅरेक्टर करतोय, तरीसुद्धा लोकांचं मला भरभरून प्रेम मिळत आहे, लोकं अनिरुद्ध चा द्वेष करतात पण मिलिंद गवळी वर प्रेम करतात.

मिलिंद गवळी शेवटी लिहितात.. प्रेमाशिवाय मी माझ्या आयुष्याची कल्पनाच करू शकत नाही, कलाकार पण बहुतेक मी यासाठी झालो असेन.

प्रेमाला ही खरंच नशीब लागतं कारण अनिरुद्ध सारखा toxic डोक्याने सटकलेलं कॅरेक्टर करतोय, तरीसुद्धा लोकांचं मला भरभरून प्रेम मिळत आहे, लोकं अनिरुद्ध चा द्वेष करतात पण मिलिंद गवळी वर प्रेम करतात.

माझ्यासाठी हेच यश आहे, या सगळ्यांच्या प्रेमाने मला समृद्ध केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asaduddin Owaisi: आमचा धर्म ठरवणारे न्यायाधीश कोण?; हिजाबच्या निर्णयावर ओवैसी आक्रमक , उच्च न्यायालयाच्या निर्णयावर टीका

Ratnagiri MIDC D Plus Category : रत्नागिरीसाठी ऐतिहासिक निर्णय! एमआयडीसीचा दर्जा थेट 'ड प्लस'; उद्योजकांना मिळणार गडचिरोलीसारख्या बंपर सवलती

Smartwatch Technology: हाताची हालचाल की चालणे? स्मार्टवॉचला कसे कळते तुम्ही किती चाललात? पाहा इनबिल्ट सेन्सर्सचे तंत्रज्ञान...

Latest Marathi News Live Update : मुंबईतील आमदारांचे रिपोर्ट कार्ड समोर; शिंदेंच्या आमदाराची कामगिरी सर्वांत खराब

Katraj-Kondhwa Road Land Acquisition Dispute: कात्रज-कोंढवा रस्त्यावर भूसंपादनाचा पेच कायम; काही मालमत्ता अवॉर्डमध्ये राहिल्याने गोंधळाची स्थिती; पथविभागाला सलग रस्ता करण्यास अडचणी

SCROLL FOR NEXT