Milind soman mother usha at the age of 81 did workout with daughter in law ankita konwar 
मनोरंजन

मिलिंद सोमनची 81 वर्षीय आई घालतेय लंगडी...

सकाळन्यूजनेटवर्क

मुंबई : मॉडेल-अभिनेता मिलिंद सोमन त्याचा उत्तम अभिनय, मॉडेलिंग आणि त्याच्या फिटनेससाठी ओळखला जातो. 2018 साली अंकीता कुंवर हिच्यासोब लग्नबंधनात अडकला. तो आणि त्याची पत्नी अंकीता हे दोघेही त्यांच्या फिटनेस व्हिडिओमुळे फारच चर्चेत असतात. सध्या कोरोना विषाणूमुळे सर्वत्र लॉकडाऊन असताना. मिलिंद त्याच्या कुटुंबाबरोबर वेळ घावलताना दिसत आहे.

मिलिंद त्यांच्या चाहत्यांसोबत सोशल मिडियाच्या माध्यमातून संपर्कात असतो. मिलिंद सोशल मिडियाद्वारे त्याचे फिटनेसचे व्हिडिओ शेअर करत असतो. मिलिंद जितका फिट आहे तितकीच त्याची पत्नी आणि त्याची आई उषा सोमन या देखील आहे. त्याची आई 81 वर्षांची आहे. आणि या वयातही फिट आहे. तो नेहमीच तो त्याच्या आईसोबत व्यायाम करतानाचे व्हिडिओ सोशल मिडियावर पोस्ट करत असतो. नुकताच त्याने एक व्हिडिओ त्याच्या सोशल मिडियावर शेअर केला आहे. ज्यामध्ये त्याचीआई आणि त्याची पत्नी लंगडी घालताना दिसून येत आहे. या दोघींमध्येही लंगडी या खेळाची स्पर्धा लागली आहे. या स्पर्धेसाठी दोघीही आपली पुरेपुर एनर्जीचा वापर करत आहेत. या दोघीही लंगडी स्पर्धेत गुंतलेल्या आहेत.

हा व्हिडिओ शेअर करताना मिलिंदने कॅप्शन लिहिले की, '28 आणि 81… कोणत्याही वयात फिट रहा.' मिलिंदच्या आईचा हा व्हिडिओ आणि हे कॅप्शन प्रत्येकाला प्रेरणा देणारे आहे. या व्हिडिओवर कमेन्ट बॉक्समध्ये त्याच्या चाहत्यांच्या बऱ्याच प्रतिक्रिया येत आहेत. 

भारतात वाढत असलेल्या कोरोना विषाणूच्या संसर्गाने देशात २१ दिवसांसाठी लॉकडाऊन करण्यात आले. यामुळे सर्वांनाच घरात थांबणे बंधनकारक आहे. करोना विषाणूच्या दहशतीमुळे सर्व चित्रीकरण काही काळासाठी बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे प्रत्येक जण आपापल्या घरी आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवत आहेत. सर्वच कलाकार ही घरी बसले आहेत आणि आपल्या परीने विरंगुळ्याचे साधन शोधत आहेत. कोणी स्वयंपाक घरात मन रमवत आहे तर कोणी घर कामांमध्ये मदत करत आहे तर कोणी चित्रकला आणि झाडं लावून आपला वेळ घालवत आहेत. त्याप्रमाणे मिलिंद देखील घरी राहून त्याचा वेळ फिटनेसमध्ये घालवत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harshvardhan Sadgir Retire: महाराष्ट्र केसरीचा किताब जिंकताच हर्षवर्धनची निवृत्तीची घोषणा; सरकारला ठरवलं जबाबदार

Ashok Kharat: पोलिसांनी अशोक खरातचा माज उतरवला! अखेर रडत रडत 'नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला' असल्याचा म्हणाला, पाहा व्हिडिओ

Maharashtra Kesari Prize: विजेता हर्षवर्धन सदगीरसह उपविजेता महेंद्र गायकवाडही मालामाल; पाहा कोणाला काय मिळालं बक्षीस

Rohit Pawar: महाराष्ट्र महिला आयोगाची कमान कोणाकडे? रोहित पवारांनी ४ नावे सुचवली; महायुतीची डोकेदुखी वाढवली!

Maharashtra Kesari: नाशिकचा हर्षवर्धन सदगीर 'डबल महाराष्ट्र केसरी'! महेंद्र गायकवाडला चितपट करत पटकावली मानाची गदा

SCROLL FOR NEXT