Minions replace Shah Rukh Khan, Deepika Padukone in hilarious fanmade Pathaan video
Minions replace Shah Rukh Khan, Deepika Padukone in hilarious fanmade Pathaan video sakal
मनोरंजन

Pathaan: मिनियन्स चाहत्यांची कलाकारी बघाच! शाहरुखच्या 'पठाण'चा मिनियन्स ट्रेलर..

नीलेश अडसूळ

shahrukh khan pathaan: शाहरुख खानने त्याच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या आगामी चित्रपट 'पठाण'चा ट्रेलर रिलीज केला आणि त्याच्या चाहत्यांना तो खुपचं आवडला. ट्रेलरला त्याच्या चाहत्यांचे प्रेम आणि खूप कौतुक मिळाले. शाहरूख चार वर्षांनंतर कमबॅक करत आहे. शिवाय दीपिका पदुकोण चे देखील कौतुक होत आहे. पण पठाणचा 'ट्रेलर' वेगळ्या मजेशीर अंदाजाने समोर आला आहे. या ट्रेलरमध्ये शाहरूख, दीपिका पदुकोण, जॉन अब्राहम आणि इतर कलाकारांची जागी मिनियन्सने घेतली आहे.

(Minions replace Shah Rukh Khan, Deepika Padukone in hilarious fanmade Pathaan video)

मिनियन्सनेला घेऊन पठाणचा चाहत्यांनी बनवलेला ट्रेलर सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आणि हा मजेदार ट्रेलर पाहून चाहते हसणे थांबवू शकत नाहीत. खऱ्या ट्रेलरप्रमाणेच या ट्रेलरच्या सुरुवातीला दोन मिनियन्स पठाणबद्दल बोलताना दिसतात, तर शाहरूख ची व्यक्तिरेखा साकारणारा मिनियन स्टुअर्ट "पठाण जिंदा है" म्हणत एंट्री घेतो..

मिनियन स्कार्लेट ओव्हरकिलने दीपिका पदुकोणची भूमिका या मिनियन्स ट्रेलरमध्ये साकारली आहे. या ट्रेलरसोबतच एक भन्नाट कॅप्शन लिहिले आहे. ते असे की, "पठाणचा मिनियन टीझर तुम्हाला आवडेल अशी आशा आहे. अब्रारामलाही हा टीझर खूप आवडला.

शाहरूखच्या चाहत्यांनी या टीझरला पाहून खुप कौतुक केले आहे . एका युजर्स ने लिहिले, "हे खूप गोंडस आहे मला खुप आवडले," तर दुसर्‍याने लिहिले , "हा टीझर खुपचं फनी आहे हसण्यापासून कोणी थांबू शकणार नाही.'' तर एक म्हणतो हा टीझर शाहरूख खानला पण आवडेल" सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित, पठाण २५ जानेवारी २०२३ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नाशिकचा सस्पेन्स संपला ! हेमंत गोडसे यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर, शांतिगिरी महाराजांना धक्का

iPhone Alarm issue : जगभरातील लोकांना आज उठायला झाला उशीर.. आयफोनचे अलार्म वाजलेत नाहीत! काय आहे कारण?

Rinku Singh : संघ निवडीबाबत मोठा खुलासा! BCCI च्या 'या' नियमामुळे रिंकूचे वर्ल्ड कप खेळण्याचे मिळाले स्वप्न धुळीस?

Traffic Noise: गाड्यांच्या आवाजामुळे वाढू शकतो हृदयविकार, डायबेटिस आणि स्ट्रोकचा धोका; धक्कादायक संशोधन समोर

Latest Marathi News Live Update: विदर्भ राज्य पार्टीच्या वतीने आज महाराष्ट्र दिवस हा काळा दिवस म्हणून पाळला जात आहे

SCROLL FOR NEXT