Mira rajput Kapoor Instagram
मनोरंजन

Mira Rajput: 'मला घरी जाऊ द्या..', पापाराझींना विनवणी करत भर कार्यक्रमातनं मीरानं घेतली घराकडे धाव..असं काय घडलं?

शाहिद कपूरची पत्नी मीरा राजपूतही आता पब्लिक फिगर आहे. एका कार्यक्रमाला गेली असतानाचा तिचा एक व्हिडीओ व्हायरल होतोय,जो पाहून चाहते हैराण झाले आहेत.

प्रणाली मोरे

Mira Rajput: बॉलीवूड अभिनेता शाहिद कपूरची पत्नी मीरा राजपूत अनेकदा लाइमलाइटमध्ये आलेली दिसते. आधी तर बोललं जायचं की मीरा राजपूत बॉलीवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे. पण सिनेमात ती नजर आली नसली तरी जाहिरातींमधून तिची झलक दिसलीच.

शाहिदची पत्नी मीरा राजपूत बॉलीवूड इंडस्ट्रीतून नसली तरी तिनं स्वतःला ग्लॅमर जगताशी व्यवस्थित जुळवून घेतलं आहे.(Mira Rajput Kapoor Request paparazi to not click picture she is in hurry to go home, know the reason)

यादरम्यान मीराचा आता एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत मीरा राजपूत भलतीच सुंदर दिसत आहे. तिनं क्रिम व्हाइट आणि ब्लॅक कलरचा आकर्षक आऊटफिट घातला आहे. मीरा राजपूत कोणत्याही अभिनेत्रीपेक्षा कमी नाही हे तिनं अनेकदा आपल्या लूकमधनं सिद्ध केलं आहे.

व्हिडीओत मीरा वॉक करत घाई घाईत घरी जाताना दिसत आहे. पण पापाराझी तिचे फोटो घेण्यासाठी तिच्यासोबत चालताना दिसत आहेत. यामुळे मीराचा चालण्याचा वेग मंदावत आहे आणि ती अगदी कळवळीनं म्हणताना दिसत आहे की, 'मला घरी जाऊ द्या प्लीज...'

मीरा राजपूत पापाराझीला म्हणाताना दिसत आहे की, माझी मुलं उदया सकाळी शाळेत जाणार आहेत. तेव्हा मला घरी लवकर जाऊ द्या. एकीकडे नेटकरी मीरा राजपूतच्या मुलांप्रती असलेल्या जबाबदारीविषयी आपल्या घराविषयीची तिची ओढ पाहून कौतूक करताना दिसत आहेत. तर काहींनी म्हटलंय,आता सुट्ट्या सुरु आहेत,आता कोणती शाळा सुरु आहे?..

माहितीसाठी सांगतो की मीरा राजपूत आणि शाहिद कपूर यांनी २०१५ मध्ये लग्नगाठ बांधली होती. यांचे अरेंज मॅरेज होते. या कपलला दोन मुलं आहेत-मुलगी मीशा कपूर आणि मुलगा जैन कपूर.

गेल्या वर्षीच शाहिद आणि मीरा मुंबईच्या वरळी भागात आलिशान ड्युप्लेक्स अपार्टमेंटमध्ये शिफ्ट झाले आहेत. शाहिद आणि मीरा नेहमीच लग्नाच्या आधीच्या आपल्या पहिल्या भेटीविषयी बोलताना दिसतात.

शाहिद मीरासोबत आपली प्रत्येक गोष्ट शेअर करतो. शाहिद आणि मीरा चाहत्यांच्या फेव्हरेट सेलिब्रिटी जोड्यांपैकी एक आहेत. आता चाहत्यांना मीराच्या सिनेमातील पदार्पणाची उत्सुकता लागून राहिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: पुण्यात एकनाथ शिंदेंकडून 'जय गुजरात'ची घोषणा; अमित शाहांच्या उपस्थितीत नारेबाजी, व्हिडिओ व्हायरल

Latest Maharashtra News Updates : "खरी लाचारी आज बघितली" उपमुख्यमंत्री शिंदेंनी जय गुजरात दिलेल्या घोषणेवर मनसे नेत्याची टीका

IND vs ENG 2nd Test: W,W,W,W,W! मोहम्मद सिराज ऑन फायर, बेन स्टोक्स गांगरला; इंग्लंडचा निम्मा संघ तंबूत परतला

ती खूपच बारीक, काळी-सावळी... प्रियांका चोप्राला पहिल्यांदा पाहिल्यावर थक्क झालेली मराठी अभिनेत्री; म्हणाली- ती हिरोईन बनायला आलेली...

FASTag Annual Pass: FASTag वार्षिक पास घ्यायचा विचार करताय? मग घेण्यापूर्वी 'हे' 11 महत्त्वाचे प्रश्न आणि त्यांची सविस्तर उत्तरं जरूर वाचा!

SCROLL FOR NEXT