Shahid Kapoor,Mira Rajput-Kapoor Google
मनोरंजन

''शाहिदच काय त्याच्या साध्या फोनवरही माझंच राज्य,कोई शक!''

मीरा राजपूत असं का आणि कोणाला म्हणाली? जाणून घ्या

प्रणाली मोरे

शाहिद कपूर(Shahid Kapoor) आणि मीरा राजपूत(Mira Rajput) हे कपल म्हणजे अगदी 'मेड फॉर इच अदर'. २०१५मध्ये या दोघांचं लग्न अगदी थोरा-मोठ्यांच्या पसंतीनं,बघण्याचा वगैरे कार्यक्रम करून ठरलं. म्हणजे दोघांनी एकमेकांना पसंत केल्यानंतरच झालं लग्न बरं का. अर्थात पसंती ठरताना दोघांवर कुणीही जोर-जबरदस्ती केली नव्हती याची प्रचिती येते जेव्हा लग्नाच्या सहा वर्षांनंतरही दोघे एकमेकांसोबत प्रेमाने नांदताना दिसतायत. यांना दोन लहान गोंडस मुलं आहेत. मोठी मिशा आणि धाकटा झेन. हे चौकोनी कुटुंब मोठ्या खुशीत आहे याचा अंदाज येतो जेव्हा सोशल मीडियावर मीरा किंवा शाहिद त्यांचे फोटो-व्हिडीओ शेअर करीत असतात.

मीरा राजपूत तर सोशल मीडियावर शाहिदपेक्षा सुपरअॅक्टिव्ह असते. ती अगदी आपल्या फीटनेसपासून त्वचेपर्यंत सगळ्याची काळजी कशी घेते याच्या टीप्स आणि संबंधित व्हिडीओ शेअर करीत असते. तिचे तिच्या केसांवर भयंकर प्रेम आहे असे एकदा शाहिदनेच एका मुलाखतीत सांगितले होते. तेव्हा सोशल मीडियावर केसांची निगा ती कशी राखते,तिचा न्यू हेअरकट ते हेअरकलर पर्यंत सगळ्याच अपडेट्स द्यायला तिला आवडतात. मागे शाहिद मीरा आणि मुलांसोबत बाहेर फिरायला गेला होता तेव्हा त्यांचे ट्रॅव्हल संबंधित फोटो,तिथले मजेदार व्हिडीओही शाहिदने शेअर केले होते. आता सध्या मीराची व्हिडिओ पोस्ट वायरल होतेय. पण तो व्हिडीओ तिनं तिच्या फॅननं विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी बनवलाय बरं का. पुढे तो व्हिडीओ आहे,नक्की पहा.

तर त्याचं झालं असं की मीराच्या एका फॅननं तिला प्रश्न केला की,'शाहिदच्या फोनच्या वॉलपेपरवर तू आहेस का?' म्हणजे एका अर्थाने त्या फॅनने मीरा-शाहिदचं एकमेकांवर खरंच प्रेम आहे की उगाच दाखवायला सगळं करतात असा तिरक्या अर्थानेच विचारलेला हा प्रश्न होता. पण मीराने मात्र उत्तरादाखल असा झक्कास व्हिडीओ पोस्ट केलाय की विचारणा-याची बोलती बंद झालीच असेल, पण व्हिडीओ पाहणा-यांनीही म्हटलं,'प्रेम आणि विश्वास असावा तर असा'. मीरानं एक व्हिडीओ शूट केलाय. ज्याच्या बॅकग्राऊंडला 'गंगा की कसम' या सिनेमातलं एक राजस्थानी गाणं वाजतंय. आणि मीराचा चेहरा बरोबर फोन वॉलपेपरच्या फ्रेममध्ये दिसतोय. तिने अशा पद्धतीचा व्हिडीओ पोस्ट करीत हे सूचित केलंय की शाहिदच्या वॉलपेपरवरही तिच आहे. त्याला तिने एक कॅप्शनही दिलंय की,Love from @mira_is_precious ❤️. म्हणजेच मीरा शाहिदसाठी नेहमीच मौल्यवान आहे.

शाहिद लवकरच त्याच्या चर्चित 'जर्सी' या सिनेमातनं आपल्याला दिसणार आहे. एका क्रिकेटरची ही गोष्ट आहे. यात शाहिदसोबत अभिनेत्री मृणाल ठाकूर आणि त्याचे वडील पंकज कपूरही आहेत. हा सिनेमा येत्या डिसेंबर महिन्यात आपल्या भेटीस येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update: कोल्ड्रिफ सिरप (Batch No. SR-13) चा तात्काळ वापर थांबविण्याचे एफडीएचे आदेश

Hampi Tourism: फक्त 2 दिवसात हंपी एक्सप्लोर करायचंय? ही ठिकाणं नक्की पाहा!

INDW vs PAKW: ४,४,४ प्रतिकाने केलेली सुरुवात अन् मग ऋचाच्या आक्रमणाने केला शेवट; भारताचे पाकिस्तानसमोर मोठे लक्ष्य

Jayakumar Gore: रामराजेंचं प्रेम करायचं वय निघून गेलंय: पालकमंत्री जयकुमार गोरे; रणजितसिंहांकडे मैत्रीचा हात पुढे केला अन्..

अब मजा आयेगा ना भिडू! प्रियाचे खरे आई-वडील अखेर सापडलेच; खोटी तन्वी प्रतिमाला त्रास देताना रविराज स्वतः पाहणार, आजच्या भागात काय घडणार?

SCROLL FOR NEXT