Mirzapur 3 and Panchayat Season 3 release dates revealed by cast  Esakal
मनोरंजन

Web Series: अखेर प्रतिक्षा संपली! मिर्झापूर 3 अन् पंचायत 3 ची रिलीज डेट...

Vaishali Patil

Upcoming Popular Web Series:  गेल्या दोन-तीन वर्षात भारतात ओटीटी प्लॅटफॉर्म्सची लोकप्रियता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. चित्रपटांपेक्षा घरी बसल्या बसल्या नवनवीन सिरिज पाहण्यासाठी चाहते उत्सुक असतात. अशातच गेल्या काही दिवसांपासून काही वेब सिरिजची चाहते मोठ्या उत्सुकतेने प्रतिक्षा करत आहेत. यात एक म्हणजे 'मिर्झापूर 3' आणि पंचायत 3.

मिर्झापूर वेब सिरीजच्या दोन्ही भागांना प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले आहे. या दोन भागांनंतर आता प्रेक्षक तिसर्‍या भागाची वाट पाहत आहेत. तर दुसरीकडे पंचायत 3ची देखील तितकीच प्रतिक्षा प्रेक्षकांना लागली आहे.

या दोन्ही सिरिजची रिलीज डेट अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. मात्र आता लवकरच या दोन्ही सिरिज रिलिज होण्यासाठी सज्ज असल्याचा दावा मीडिया रिपोर्ट्समध्ये करण्यात आला आहे.

पंचायत 3 कधी रिलिज होणार?

पंचायत आणि पंचायत 2 या सिरिज खुपच गाजल्या. त्यानंतर नीना गुप्ता यांनी एका मुलाखतीत पंचायत 3 याबद्दल खुलासा केला होता. नीना गुप्ता म्हणाल्या होत्या की, या मालिकेचे अजून शूटिंग थोडे बाकी आहे. ऑक्टोबरमध्ये हे काम पूर्ण होईल आणि त्यानंतर पोस्ट प्रोडक्शनचे काम सुरू करण्यात येईल. त्यानंतर 2024 मध्ये पंचायत 3 रिलीज होणार आहे

मिर्झापूर ३ कधी येणार?

'मिर्झापूर' ही सर्वात लोकप्रिय सिरिज आहे ज्याचे दोन सिझन खुपच हिट ठरले आहेत. आता चाहते या सिरिजच्या तिसऱ्या सिझनची आतुरतेने वाट पाहत आहे. अशातच 'मिर्झापूर 3' या सिरिजबाबात अनेक नवनवे अपडेट येत आहे. कालीन भैया, गुड्डू पंडित, बीना भाभी यांची कहाणी मिर्झापूर 3 मध्ये पुढे दाखवण्यात येणार आहे.

या मालिकेचे शूटिंग आधीच पूर्ण झाले आहे. यात आता डबिंगनंतर पोस्ट प्रॉडक्शनचे काम सुरू आहे. ही मालिका जानेवारीत प्रदर्शित होऊ शकते असं या मालिकेत रॉबिनची भूमिका साकारणाऱ्या प्रियांशू पानुलीने एका मुलाखतीत सांगितले होते, दोन्ही लोकप्रिय मालिकांसाठी चाहते उत्सुक आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharmendra Pradhan Video: धर्मेंद्र प्रधानांचं जंगी स्वागत; राजीनाम्यानंतर पहिल्यांदाच संसदेत आले; BJP च्या खासदारांनी पाहा काय केले...

Vaibhav Sooryavanshi: रोहितसोबत वैभव सूर्यवंशीनेच सलामीला यावं! माजी दिग्गजाचा मोठा सल्ला, गिलबाबतही केलं मोठं वक्तव्य

देवदूत! पुरात अडकलेल्या चिमुरड्यासाठी ५ जणांनी लावली जीवाची बाजी; काळजाची धडधड वाढवणारा, Video Viral

Goa Casino Industry : गोव्यातील वादग्रस्त कॅसिनो आता महाराष्ट्राच्या सीमेवर? नव्या ठिकाणांचा सिंधुदुर्गात शोध, निवडणुकीआधी भाजप सरकारवर मोठा दबाव!

Latest Marathi News Live Update: पंजाबचे मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालक यांना नोटिसा बजावल्या

SCROLL FOR NEXT