Mirzapur 3 Golu Gupta Esakal
मनोरंजन

Mirzapur 3: 'गोलू गुप्ता'नं मिर्झापूर बाबत केला मोठा खुलासा म्हणली, 'भौकाल होगा'

सकाळ डिजिटल टीम

Mirzapur 3 Golu Gupta: 'मिर्झापूर' वेब सिरीज लोकांमध्ये प्रचंड लोकप्रिय होत आहे. या वेब सीरिजच्या दोन्ही सीझनला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले. ओटीटी प्लॅटफॉर्मवरही या वेब सीरिजला खूप व्ह्यूज मिळाले. आता या मालिकेच्या पुढील भागाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.

पुढच्या भागात काय होणार आणि हा सिझन कधी भेटीला येणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. आता हा सिझन कधी रिलिज होतो यासंबधित अपडेट जाणुन घेण्यासाठी ते उत्सुक आहेत. आता याचा खुलासा करत गोलू गुप्ता उर्फ ​​श्वेता त्रिपाठी शर्मानं 'मिर्झापूर 3' बद्दल काही खुलासे केले आहे.

अलीकडेच एका मुलाखतीत श्वेता त्रिपाठीने तिच्या आगामी 'मिर्झापूर 3' या सिरिजबद्दल सांगितलं आहे. वेब सिरीज व्यतिरिक्त कलाकारांबद्दल बोलताना ती म्हणाली की, 'आम्ही सर्व एक कुटुंब आहोत आणि एक-दोन आठवड्यात एकमेकांना भेटत राहायला हवं.' मिर्झापूर ३ ला विचारलं असता ती म्हणाली, 'हा आतापर्यंतचा सर्वात मोठा भौकाल असेल. तो शूट करताना खूप मजा आली.

'मिर्झापूर'चे पहिले दोन सिझन रसिकांच्या पसंतीस उतरले आहेत. श्वेताचा अभिनयही चाहत्यांना आवडला होता. मालिकेतील त्याच्या भूमिकेने लोकांना खूप आश्चर्यचकित केले. श्वेताच्या या मुलाखतीनंतर कालिन भैया प्रेक्षकांसाठी काहीतरी नवीन घेऊन येणार आहे. आता चाहत्यांनाही उत्सुकता लागली आहे.

नुकताच वेब सीरिजचा लूक रिलीज करण्यात आला आहे. त्यात मोठ्या प्रमाणात रक्तपातही दिसत आहे. प्रेक्षकांना तो खूप आवडला आहे. या सिरिजमध्ये पंकज त्रिपाठी, दिवेंदु शर्मा आणि अली फजल या कलाकारांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.

काही वेळापूर्वीच अली फजलने या मालिकेचे शूटिंग पूर्ण झाल्याची माहिती चाहत्यांसोबत शेअर केली होती आणि सेटवरील काही छायाचित्रेही शेअर केली होती, ज्यांना पाहून चाहते खूप उत्साहित झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tata Capital IPO: 'टाटा'च्या आयपीओचा धमाका! सामान्यांसाठी खुला होण्यापूर्वीच बड्या कंपन्यांची मोठी गुंतवणूक

Arattai messaging app : स्वदेशी मेसेजिंग ॲप ‘Arattai’ची क्रेझ वाढली! ; आता आनंद महिंद्रांनीही केलंय डाउनलोड

Barshi Crime : बार्शीत एसटी महामंडळ बसच्या महिला वाहकास मारहाण; सहा महिलांविरुद्ध गुन्हा

Akola News : खदान पोलीस स्टेशनमधील नितीन मगर निलंबीत, डीबी स्कॉडवर पुन्हा संशयाची सावली

Latest Marathi News Live Update: कोरडेवाडी साठवण तलावाच्या मंजुरीसाठी राजश्री राठोड यांचे आमरण उपोषण

SCROLL FOR NEXT