Mirzapur 3 Mirzapur 3 Update Vijay Verma Wrap Up Shooting Web Series Fans Excited  Esakal
मनोरंजन

Mirzapur 3: मिर्झापूरमध्ये दद्दा त्यागीच्या पोराची पुन्हा एन्ट्री! दिली मोठी हिंट, चाहत्यांची उत्सूकता वाढली

Vaishali Patil

Mirzapur 3: 'मिर्झापूर' ही सर्वात लोकप्रिय सिरिज आहे ज्याचे दोन सिझन खुपच हिट ठरले आहेत. आता चाहते या सिरिजच्या तिसऱ्या सिझनची आतुरतेने वाट पाहत आहे. अशातच 'मिर्झापूर 3' या सिरिजबाबात अनेक नवनवे अपडेट येत आहे.

या सिरिजची शुटिंग पुर्ण झाली असुन आता त्याचे एडिटिंगचे काम सुरु आहे. आता त्यातच या सिरिजबाबत आणखी एक मोठी अपडेट समोर आली आहे.

या सिरिजमध्ये पुन्हा विजय वर्माचा सहभाग झाला आहे. विजय वर्माने 'मिर्झापूर 3' संदर्भात एक पोस्ट शेअर केली आहे.

ज्यामध्ये तो डबिंग स्टुडिओमध्ये मॉनिटरसमोर उभा आहे. विजय वर्मा यांनी फोटोवर लिहिलयं की, "डबिंग किया हैं, तैयार, MS 31". विजय चित्रपटाच्या डबिंगच्या कामात व्यस्त आहे. त्याची पोस्ट पाहून चाहत्यांची उत्कंठा आणखीनच वाढली.

Mirzapur 3

'मिर्झापूर 3'मध्ये पंकज त्रिपाठी, दिव्येंदू शर्मा, विक्रांत मॅसी, अली फजल, राजेश तैलंग, रसिका दुग्गल, हर्षित शेखर गौंड, श्वेता त्रिपाठी, अंजुम शर्मा, शीबा चड्ढा, अमित सियाल आणि मनु ऋषी, विजय वर्मा यांसारखे स्टार्स आहे.

विजय वर्मा सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यापासून ते व्यावसायिक आयुष्यापर्यंत खूप चर्चेत आहे. 'दहाड' आणि 'लस्ट स्टोरीज 2' या दोन ओटीटी सिरिजमुळे त्याचे कौतुक होत आहे. तो त्याच्या आगामी वेब सीरिज 'मिर्झापूर 3'मध्येही असेल.

'मिर्झापूर 3' ऑगस्ट ते सप्टेंबर दरम्यान Amazon प्राइम व्हिडिओवर स्ट्रीम होऊ शकतो. असा दावा करण्यात येत आहे. तर विजय वर्मा 'मिर्झापूर 3' व्यतिरिक्त, 'डिव्होशन ऑफ सस्पेक्ट एक्स' आणि 'मर्डर मुबारक' यामध्ये काम करणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDW vs AUSW Live: भारतीय संघाचे T20 World Cup मधून पॅकअप! ऑस्ट्रेलियाचा दणदणीत विजय अन् दक्षिण आफ्रिका उपांत्य फेरीत... हरमनप्रीत कौरच्या संघाला अपयश

IND vs IRE 2nd T20I : आयर्लंडने इतिहास रचला! भारतीय संघाला ट्वेंटी-२० मालिकेत नमवले, श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाची लाजीरवाणी सुरुवात

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर वाढला मृत्यूचा धोका! टोल टाळण्यासाठी 'नो-एंट्री'तून वाहनांची सर्रास एंट्री; नियमांना हरताळ

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Vidarbha Rain Alert : विदर्भासाठी दिलासादायक बातमी! पावसाचा जोर वाढणार, ११ जिल्हे यलो अलर्टवर

SCROLL FOR NEXT