Mirzapur Season 3  Esakal
मनोरंजन

Mirzapur Season 3: मिर्झापूर ऑन द वे! जाणून घ्या तिनही सीझनचे बजेट आणि कधी रिलीज होणार?

सकाळ डिजिटल टीम

मिर्झापूर या वेबसिरिजनं मनोरंजन विश्वात वेगळीच जागा निर्माण केली आहे. या वेबसिरिजची क्रेझ चाहत्यामध्ये मोठ्या प्रमाणात आहे. जितकी ही वेब सिरिज गाजली तितकेच या सिरिजचे मिम्सही. अजूनही सोशल मिडियावर या सिरिजमधल्या अनेक डॉयलॉगचे व्हिडिओ व्हायरल होतांना दिसतात.

मिर्झापूरचे आतापर्यंत दोन सिझन आले आहेत. पहिला सीझन 2018 आणि दुसरा 2020 मध्ये आला होता. आता चाहते या सिरिजच्या तिसऱ्या सिझनची प्रतिक्षा करत आहे. आता तुम्हाला या सिझनचे बजेट आणि रिलिज डेट सांगूया.

रिपोर्ट्सनुसार, 2018 मध्ये जेव्हा मिर्झापूरचा पहिला सीझन रिलीज झाला तेव्हा तो तयारसाठी जवळपास 12 कोटी रुपये खर्च करण्यात आला होता. तर, 2020 मध्ये रिलीज झालेल्या दुसऱ्या सीझनसाठी, पहिल्या सीझनच्या तुलनेत बजेटमध्ये 5 पट वाढ करण्यात आली होती. म्हणजेच सीझन 2 चे बजेट जवळपास 60 कोटी होते.

आता तिसऱ्या सीझनच्या बजेटबद्दल बोलयचं झालं तर रिपोर्ट्समध्ये असं सांगण्यात येत आहे की दुसऱ्या सीझनच्या तुलनेत तिसऱ्या सीझनचे बजेट तब्बल 30 टक्क्यांनी वाढले आहे. त्यानुसार मिर्झापूरच्या तिसऱ्या सिझनचे बजेट सुमारे 78 कोटी रुपये आहे.

दुसऱ्या सीझनचा शेवट अशा टप्यात झाला की त्यामुळं अनेक सस्पेन्स निर्माण झाले आहेत. तिसऱ्या सीझनमध्ये अनेक सस्पेन्सवरून पडदा उठणार आहे, ज्यामुळे लोक मिर्झापूर सीझन 3 ची आतुरतेने वाट पाहत आहेत.

अधिकृतपणे अद्याप कोणतीही तारीख निश्चित केलेली नाही, परंतु मीडिया रिपोर्ट्सनुसार असे मानले जाते की प्रेक्षकांना 2023 मध्येच तिसऱ्या सीझनची भेट मिळू शकते. मिर्झापूर सीझन 3 चे शूटिंग डिसेंबर 2022 मध्येच पूर्ण झाले आहे, ज्याची माहिती गुड्डू भैया फेम अली फजलने इंस्टाग्रामच्या माध्यमातून दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who is Praful Hinge? वैभव-यशस्वीला रोखण्यासाठी SRH ने विदर्भच्या पोट्ट्याला पदार्पणाची दिली संधी; जाणून घ्या त्याची प्रेरणादायी कहाणी

Success Story: शेतकरी कुटुंबातील मुलाची 'एनडीएत' भरारी; अमेय साळुंखेंचा देशात 34 वा क्रमांक, लहानपणीच पितृछत्र हरपलं, आईने कष्टाने वाढवलं..

India Monsoon Update 2026 : यंदा ‘एल निनो’ मुळे पावसात घट होण्याची शक्यता, हवामान विभागाचा मान्सूनबाबत चिंताजनक अंदाज

Sangamner Concert: संगमनेरकरांची अजरामर आठवण; बाळासाहेब थोरात-आशा भोसले यांचे जिव्हाळ्याचे नाते, कॉन्सर्टमुळे मनात कायम घर!

Big Breaking : IPL 2026 च्या वेळापत्रकात बदल, चेन्नई सुपर किंग्स अन् गुजरात टायटन्सच्या चाहत्यांसाठी महत्त्वाची बातमी... कारण काय?

SCROLL FOR NEXT