Hijab Controversy SAKAL
मनोरंजन

Hijab Row: 'तिला हवं तसं जगु द्या हो!', मिस युनिव्हर्स हरनाजची भावूक पोस्ट

कर्नाटकातील हिजाब प्रकरणानं साऱ्या देशाचे लक्ष वेधून घेतले आहे.

सकाळ ऑनलाईन टीम

Hijab Row: कर्नाटकातील हिजाब प्रकरणानं साऱ्या देशाचे लक्ष वेधून घेतले आहे. (Miss Universe 2021) त्याच्यावर वेगवेगळ्या सेलिब्रेटींनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. कित्येक राजकीय व्यक्तींनी हिजाब प्रकरणावर नाराजी व्यक्त केली (harnaz sandhu) आहे. यासगळ्यात मिस युनिव्हर्स हरनाज संधुनं केलेलं ट्विट आता चर्चेत आलं आहे. तिनं यापूर्वी देखील हिजाबवरुन आपली ठाम भूमिका मांडली होती. काल बिग बॉस फेम (Bigg Boss) मेहजबीनं जीममध्ये जाऊन बुरखा परिधान करुन व्हिडिओ शेयर केला होता. त्यालाही नेटकऱ्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले आहे. मेहजबीनं तर आपल्याला कुणीही ट्रोल करण्याचा प्रयत्न करु नये. धर्माच्या नावावर अनेक चुकीच्या गोष्टींचा प्रचार आणि प्रसार होत असल्याची खंत तिनं यावेळी व्यक्त केली होती.

आता सोशल मीडियावर हरनाजचं ट्विट व्हायरल झालं असून त्यामध्ये तिनं कर्नाटक सरकारच्या धोरणांवर कडाडून टीका केली आहे. एखादी मुलगी जर हिजाब परिधान करते तेव्हा तो तिचा चॉईस असतो. तिला कुणाकडून अपमानस्पद वागणुकीला सामोरं जावं लागत असेल तिनं त्याविरोधात बोललं पाहिजे. तसं बोलणं तिला फायद्याचे ठरेल. ती तिच्या हक्कांची लढाई आहे. आपण सर्व जण वेगवेगळ्या संस्कृतील महिला आहोत. प्रत्येकाची जगण्याची पद्धत वेगळी आहे. चालीरिती- परंपरा वेगळ्या आहेत. यासगळ्यात प्रत्येकवेळी महिलेला धर्माच्या बेडीत अडकवून ठेवणं चूकीचं ठरेल. हरनाजचं ते व्टिट मोठ्या प्रमाणावर व्हायरल झालं असून त्याला नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत.

कर्नाटक सरकारनं गेल्या महिन्यात हिजाब परिधान करुन शाळेत येणाऱ्या विद्यार्थीनींना विरोध केला. हे प्रकरण वाढत गेले. त्यावरुन वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चाही व्हायरल झाल्या. न्यायालयापर्यत हिजाबच्या विरोधात याचिका गेल्या. हे प्रकरण अद्याप न्यायप्रविष्ट आहे. सर्वोच्च न्यायालयातही याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. बॉलीवूडमधील अनेक अभिनेत्री, अभिनेते यांनी कर्नाटक सरकारच्या धोरणांवर टीका केल्याचे दिसून आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, IND vs PAK: मग कसा होता रविवार? इरफान पठाणचा पाकिस्तानला ट्रोल करत भन्नाट डान्स; पाहा Video

Avi Prasad IAS : चर्चित आयएएस अधिकाऱ्याने केले तिसरे लग्न, आधीच्या दोन्ही पत्नी आहेत जिल्हाधिकारी, तिसरी मंत्रालयात उपसचिव

'ती व्यक्ती आपल्यासोबत असली की...' जुई गडकरीच्या लाईफ पार्टनरबद्दल काय अपेक्षा? म्हणाली...'माझ्यासाठी खरं प्रेम हे...'

Success Story: शेतीसंघर्षातून उभी राहिली अधिकारीपदाची स्वप्ने; चिंचमंडळच्या शेतकरी पुत्राची तालुका कृषी अधिकारी पदाला गवसणी

Stock Market Today : शेअर बाजाराची लाल रंगात सुरुवात मात्र काही मिनिटांतच तेजीत! कोणते शेअर्स वाढले?

SCROLL FOR NEXT