Miss Universe 2023 esakal
मनोरंजन

Miss Universe 2022 : 'बिटकॉईन' चा ड्रेस घालून रँप वॉक, परिक्षकही पाहतच राहिले!

ज्या स्पर्धेकडे साऱ्या जगाचे लक्ष लागले असते त्या मिस युनिव्हर्स स्पर्धेतील शेवटचा टप्पा आता पार पडतो आहे.

सकाळ डिजिटल टीम

Miss Universe 2023 Video: ज्या स्पर्धेकडे साऱ्या जगाचे लक्ष लागले असते त्या मिस युनिव्हर्स स्पर्धेतील शेवटचा टप्पा आता पार पडतो आहे. त्यामधील काही स्पर्धकांच्या वेशभूषेनं साऱ्या जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. एका सुंदरीनं तर चक्क बिटकॉईनचा ड्रेस परिधान केला होता.

मिस युनिव्हर्स पेजेंट २०२३ मध्ये एल साल्वाडोरमधून आलेल्या अलेजेंद्रा गुजारडियोनं ज्याप्रकारे वेशभूषा केली होती त्याचे सगळीकडे कौतूक होताना दिसत आहे. तिच्या बिटकॉईनच्या ड्रेसनं परिक्षकांना अवाक करुन टाकले होते. ते तर तिला पाहून थक्कच झाले. सोशल मीडियावर तर अलजेंद्राच्याच ड्रेसची चर्चा आहे. तिनं बिटकॉईनचा ड्रेस परिधान करुन केलेलं रॅम्प वॉक अनेकांना भावलं आहे.

९० हून अधिक देशांमधील स्पर्धक यंदाच्या मिस युनिव्हर्समध्ये सहभागी झाल्या आहेत. जगभरातील प्रेक्षकांचे या साऱ्या स्पर्धेकडे लक्ष लागले आहे. मिस युनिव्हर्स 2023 दरवर्षीप्रमाणे यंदाही मिस युनिव्हर्स 2023 स्पर्धा सुरू झाली आहे. यावेळी 71 वी मिस युनिव्हर्स सुरु होणार आहे. न्यू ऑर्लीन्स, लुईझियाना येथील अर्नेस्ट एन मेमोरियल कन्वेंशन सेंटर येथे या स्पर्धचा अंतिम टप्पा पार पडतो आहे.

यंदाच्या मिस युनिव्हर्समधून भारतातर्फे दिविता राय सहभागी होत आहे. गेल्या वर्षी भारताच्या हरनाज संधूनं मिस युनिव्हर्सचा मुकूट आपल्या नावावर केला होता. यंदा दिविकाला मोठ्या स्पर्धेला आणि आव्हानाला सामोरं जावं लागणार आहे. तिची मोठमोठ्या देशांतील स्पर्धकांशी टक्कर असल्याचे बोलले जात आहे.

यासगळ्यात मात्र चर्चा रंगली ती अलजेंद्रोच्या बिटकॉईन ड्रेसची. तिच्य त्या ड्रेसनं साऱ्यांना भुलवून टाकलं आहे. तिनं बिटकॉईनं इन्स्पायर्ड गोल्ड बॉडीसुट परिधान केला होता. त्यानंतर तिनं केलेलं रॅम्प वॉक आता सोशल मीडियावर चर्चेत आलं आहे. चाहत्यांनी तिचं कौतूक केलं आहे.

एल साल्वाडोर हा एकमेव असा देश आहे की, त्यांनी क्रिप्टो करन्सीला लिगल टेंडर म्हणून आपल्या देशात लागू केले आहे. त्यामुळे यासगळ्या पार्श्वभूमीवर अलजेंद्राचा तो ड्रेस अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News: मराठी डिजिटल न्यूजमध्ये eSakal पुन्हा नंबर 1; Comscoreच्या ताज्या आकडेवारीत 7.4 कोटींचा टप्पा

Chandgad MD Drugs Case: चंदगड पोलिस, पालकांची जबाबदारी वाढली; हाजगोळी ड्रग्ज प्रकरण; मुलांच्या वर्तणुकीकडे लक्ष ठेवण्याची गरज

Shaktipeeth Highway : नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गाला बांदावासियांचा तीव्र विरोध! 214 एकर जमीन बाधित होणार, ग्रामसभेत एकमुखी ठराव मंजूर

Latest Marathi News Live Update : जसप्रीत बुमराहला मागे टाकत मिचेल स्टार्क कसोटी क्रमवारीत अव्वल

Sparrow Chick Rescue : घरट्यातून पिल्लू खाली पडलं अन्...; चिमणीची लेकरासाठी जीवाचा आकांत करणारी धडपड पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले, हॉस्पिटलबाहेरील 'तो' प्रसंग नक्की काय?

SCROLL FOR NEXT