Miss Universe 2021 Harnaaz Sandhu  esakal
मनोरंजन

माजी मिस युनिव्हर्स अडचणीत! चंदीगड न्यायालयाने 'या' प्रकरणात बजावली नोटीस

पंजाबची अभिनेत्री उपासना सिंग हिने माजी मिस युनिव्हर्स हरनाज कौर संधू विरुद्ध चंदीगड कोर्टात केस दाखल केली, त्यावर आज सुनावणी होणार आहे.

सकाळ डिजिटल टीम

माजी मिस युनिव्हर्स हरनाज कौर संधू अडचणीत सापडली आहे. तिच्या विरोधात चंदिगड न्यायालयात गुन्हा दाखल करण्यात आला होता, ज्यामध्ये अभिनेत्रीवर पंजाबी चित्रपट पूर्ण न केल्याचा आणि त्या दरम्यानचा करार मोडल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी आज चंदीगडमध्ये न्यायालयात सुनावणी होणार आहे.

जिथे हरनाज आणि इतरांचे लेखी जबाब नोंदवले जातील. पंजाबी अभिनेत्री आणि एका फिल्म प्रोडक्शन हाऊसची मालकीण उपासना सिंह यांनी हरनाज संधू आणि इतरांविरोधात गुन्हा दाखल केला होता. 4 ऑगस्ट 2022 रोजी, अभिनेत्रीने 'बाई जी कुटणगें' नावाच्या पंजाबी चित्रपटाशी संबंधित वादाबद्दल चंदीगड न्यायालयात खटला दाखल केला. उपासना सिंहने या चित्रपटासाठी एक कोटी रुपयांची भरपाई मागितली आहे.

कोर्टात दाखल केलेल्या केसनुसार, 2020 मध्ये हरनाजने फेमिना मिस इंडिया पंजाबचा किताब जिंकला होता. त्यानंतर तिने संतोष एंटरटेनमेंट स्टुडिओ एलएलपीसोबत करार केला. उपासना सिंह ही तो मनोरंजन स्टुडिओ चालवते. हा स्टुडिओ 'बाई जी कुटणगें' हा पंजाबी चित्रपट बनवत होता ज्यात हरनाजला मुख्य भूमिका देण्यात आली होती. चित्रपटाच्या प्रमोशनल अॅक्टिव्हिटीमध्ये कलाकाराला सहभागी करून घ्यायचे होते, असे करारात नमूद करण्यात आले होते.

परंतु हरनाज यावेळी उपस्थीत नव्हती. यामुळे चित्रपटाचे आणि त्याच्या वितरकांचे मोठे नुकसान झाले आहे. आम्हाला चित्रपटाचे प्रदर्शनही पुढे ढकलावे लागले. विलंबामुळे आमच्या प्रतिमेलाही मोठा फटका बसला. असा आरोप तिच्यावर करण्यात आला आहे. दरम्यान चंदीगड न्यायालयाच्या आजच्या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pimpri Lift Accident: १२ वर्षांचा पोटचा गोळा गेला, आई पोरकी झाली... पिंपरीत मुलगा लिफ्टमध्ये कसा अडकला? काय घडलं होतं?

Robert Kiyosaki Alert: शेअर मार्केट कोसळणार; रॉबर्ट कियोसाकींचा इशारा, वॉरेन बफेंनी बदलली भूमिका

Latest Marathi News Live Update : परभणी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन

100 Years Of RSS: रेशीम बागेत चैतन्य अन्‌ उत्साह; संघ शताब्दी विजयादशमीला हजारो स्वयंसेवकांची गर्दी

IND vs WI 1st Test Live: रवींद्र जडेजाने मोडला MS Dhoni चा रेकॉर्ड! आता 'हिटमॅन'चा विक्रम संकटात; ध्रुव जुरेलसह शतकी भागीदारी

SCROLL FOR NEXT