मनोरंजन

शशी थरुर यांचा मिस युनिव्हर्स हरनाजसोबत 'सेल्फी'

सकाळ डिजिटल टीम

मुंबई - मिस युनिव्हर्सचा (Miss Universe) मुकूट तब्बल 21 वर्षानंतर मिळवणाऱ्या हरनाज संधूवर (Harnaaz Kaur sandhu) सध्या वेगवेगळ्या माध्यमातून कौतूकाचा वर्षाव होताना दिसत आहे. तिचे फोटो सोशल मीडियातून व्हायरल झाले आहे. बॉलीवूडमधील काही सेलिब्रेटींसोबत याशिवाय राजकारणातील मोठ्या मान्यवर नेत्यांसोबत हरनाज संधूचे फोटो व्हायरल झाले आहे. त्यामध्ये कॉग्रेसचे खासदार शशी थरुर यांच्या नावाचा समावेश आहे. शशी थरुर (shashi tharoor) यांचा हरनाज सोबतचा सेल्फी सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

थरुर यांनी आपल्या व्टिटरवरुन हा फोटो व्हाय़रल केला आहे. काही तासांपूर्वी शेयर केलेल्या त्या फोटोला मोठ्या प्रमाणावर लाईक्स आणि कमेंट्सही आल्या आहेत. देशातील जे प्रतिभावंत, भाषेवर प्रभुत्व असलेले नेते आणि वक्ते आहेत त्यामध्ये शशी थरुर यांचा समावेश होतो. ते एक प्रभावी लेखकही आहेत. सोशल मीडियावर नेहमीच अॅक्टिव्ह असणाऱ्या थरुर यांना तरुणाई मोठ्या प्रमाणावर फॉलो करत असते. त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांचा वाचकवर्गही मोठा आहे. केवळ भारतातच नाही तर जगभरात त्यांचा वाचकवर्ग पसरला आहे. इंटरनॅशनल सेलिब्रेटी म्हणूनही शशी थरुर यांच्याकडे पाहिले जाते.

हरनाजच्या नावाची जेव्हा मिस युनिव्हर्स म्हणून घोषणा झाली तेव्हा देशवासीयांनी आनंदोत्सव साजरा केला. ज्या प्रश्नामुळे ती मिस युनिव्हर्स झाली त्या प्रश्नाचं उत्तर तिनं प्रभावीपणे दिले होते. त्याचीची चर्चा काही काळापासून सोशल मीडियावर चर्चेत आहे. जगात चालेलल्या वेगवेगळ्या घडामोडींबद्दल संधूनं आपली रोखठोक भूमिका व्यक्त केल्याचे पाहून परिक्षकांनी समाधान व्यक्त केले होते. आणि तिला यंदाची मिस युनिव्हर्स म्हणून घोषित केले. तब्बल 21 वर्षानंतर भारताला मिस युनिव्हर्स होण्याचा मान मिळाला आहे. यापूर्वी सुश्मिता सेन, लारा दत्ता यांना हा बहुमान मिळाला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Sharma T20 WC 24 : टी 20 वर्ल्डकप तोंडावर आलाय अन् रोहित पुन्हा फेल गेला... माजी खेळाडूनं व्यक्त केली चिंता

नववधूने तब्येत ठीक नसल्याचं सांगत अंगाला स्पर्श करु दिला नाही, दहाव्या दिवशी दाखवले रंग!

Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेला उडणार सोने खरेदीला झुंबड, पण सोनं खरं की भेसळयुक्त असं करा चेक!

Lok Sabha Election : नाशिकमधून मोठी बातमी! शांतिगिरी महाराजांचा अर्ज बाद पण...; दिंडोरीमधूनही 5 अर्ज बाद

Adhyayan Suman : बेरोजगारी आणि आलेलं नैराश्य; हिरामंडीतील अभिनेता म्हणाला,"व्यसनाच्या आहारी जाणार होतो पण..."

SCROLL FOR NEXT