Miss World 2024 esakal
मनोरंजन

Miss World 2024: 'मिस वर्ल्ड 2024' जिंकू न शकलेली सिनी शेट्टी खूप रडली, नंतर कुटुंबानं सांभाळलं; भावूक करणारा व्हिडीओ

Miss World 2024: सिनीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये सिनी भावूक झालेली दिसत आहे.

priyanka kulkarni

Miss World 2024: मिस वर्ल्ड 2024 (Miss World 2024) या स्पर्धेची विजेती चेक रिपब्लिकची क्रिस्टिना पिस्कोव्हा  (Krystyna Pyszkova) ही ठरली आहे. लेबनॉनची यास्मिना ही या स्पर्धेची रनर अप ठरली. यंदा मिस वर्ल्ड 2024 या स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व सिनी शेट्टीने (Sini Shetty) केले. सिनीने टॉप 8 स्पर्धकांमध्ये स्थान मिळवले. पण तिला टॉप- 4 स्पर्धकांमध्ये स्थान मिळवू शकली नाही. सिनीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये सिनी भावूक झालेली दिसत आहे.

सिनी शेट्टी झाली भावूक

सिनी शेट्टी ही टॉप-4 स्पर्धकांमध्ये स्थान मिळवू शकली नाही. पराभवानंतर सिनी खूपच भावूक झालेली दिसत आहे. नुकताच सिनीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये सिनी आपल्या कुटुंबातील सदस्याला मिठी मारून रडताना दिसत आहे. यावेळी सिनीचे कुटुंब तिला सांभळताना दिसत आहे.

पाहा व्हिडीओ:

सिनीने टॉप 8 मध्ये स्थान निर्माण केले

सिनीने मिस वर्ल्डचा खिताब जिंकला नसला तरी तिने भारतातील लोकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केलं आहे. सिनी शेट्टीने मिस इंडिया 2022 मध्ये सहभाग घेतला होता. या स्पर्धेत तिने मिस इंडियाचा ताज जिंकला होता. मिस वर्ल्डच्या ग्रँड फिनालेमध्ये सिनी शेट्टीही टॉप 8 मध्ये स्थान निर्माण केलं. पण टॉप-4 स्पर्धकांमध्ये ती स्थान मिळवू शकली नाही.

जाणून घ्या सिनी शेट्टीबद्दल...

सिनी शेट्टी ही कर्नाटकची आहे. वयाच्या 21 व्या वर्षी सिनीने मिस इंडिया ही स्पर्धा जिंकली. सिनीनं चार्टर्ड अकाउंटंटचे शिक्षण घेत आहे. सिनी ही एक उत्कृष्ट भरतनाट्यम नृत्यांगना देखील आहे.

चेक रिपब्लिकची क्रिस्टिना पिस्कोव्हा ठरली 'मिस वर्ल्ड'

मिस त्रिनिदाद आणि टोबॅगो, मिस बोत्सवाना, मिस चेक रिपब्लिक आणि मिस लेबनॉन यांनी मिस वर्ल्ड टॉप 4 स्पर्धकांच्या यादीत आपले स्थान निर्माण केले. त्यातील चेक रिपब्लिकची क्रिस्टिना पिस्कोव्हा ही विजेती ठरली आहे.

करण जोहर आणि मेगन यंग फिलिपिन्स यांनी मिस वर्ल्ड स्पर्धा होस्ट केली. या स्पर्धेचा अंतिम सोहळा मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये पार पडला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT