मनोरंजन

सोनाक्षीच्या पंचने अक्षयची हालत वाईट; पाहा व्हिडिओ

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : सोनाक्षी सिन्हा आणि अक्षय कुमार 'मिशन मंगल' चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा एकत्र आले असून ते आपल्या सहकलांकारांसोबत मौज-मस्ती करताना दिसत आहेत. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये सोनाक्षीने अक्षयला जोरदार पंच मारला असून अक्षय खुर्चीवरून खाली कोसळला आहे. त्यानंतर अक्षयची हालत पाहण्यासारखी झाली होती.

भारताच्या मंगळ मोहिमेची कथा दाखविणारा ‘मिशन मंगल’ हा अक्षय कुमार आणि सोनाक्षी सिन्हा यांचा चित्रपट उद्या म्हणजेच स्वातंत्र्यदिनी रिलीज होत आहे. या चित्रपटाचा काही दिवसापूर्वी धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित झाला होता. त्यानंतर आता प्रेक्षकांची प्रतिक्षा संपणार असून उद्या हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

दरम्यान, चित्रपटामध्ये अक्षयने राकेश धवन ही भूमिका साकारली असून तो या मोहिमेचे नेतृत्व करताना दिसत आहे. त्याच्याव्यतिरिक्त या टीम तारा शिंदे (विद्या बालन), कृतिका अग्रवाल (तापसी पन्नू), एका गांधी (सोनाक्षी सिन्हा), शर्मन जोशी (परमेश्वर नायडू), नेहा सिद्दिकी (कृति कुल्हारी) नजर हे कलाकार झळकणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar : रोहित पवार झाले भावनिक, अजित पवारांनी केली नक्कल! म्हणाले, असली नौटंकी...

PCB T20 WC 2024 : टी 20 वर्ल्डकप जिंकला तर पाकिस्तानी खेळाडू होणार करोडपती; PCB ने दिलं मोठं आश्वासन

LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

IPL 2024 PBKS vs CSK : जडेजाची अष्टपैलू कामगिरी, चेन्नईचा पंजाबवर विजय

Rohit Pawar Video : 'तुम्ही आमचा जीव, आत्मा आहात...' बारामतीमधील सभेत रोहित पवारांना अश्रू अनावर

SCROLL FOR NEXT