mission raniganj box office collection day 1 akshay kumar parineeti chopra SAKAL
मनोरंजन

Mission Raniganj: सिनेमा चांगला पण लोकांनी नाही बघितला, मिशन राणीगंजने पहिल्या दिवशी कमावले फक्त इतके कोटी

मिशन राणीगंज सिनेमाचं पहिल्या दिवशीचं बॉक्स ऑफीस कलेक्शन समोर आलंय

Devendra Jadhav

Mission Raniganj Box Office Day 1: अक्षय कुमारच्या मिशन राणीगंज सिनेमाची सर्वांना उत्सुकता होती. अखेर हा सिनेमा ६ ऑक्टोबरला संपूर्ण भारतात रिलीज झालाय. सत्य घटनेवर आधारीत या सिनेमाची सर्वांना उत्सुकता होती.

पण अक्षय कुमारच्या सिनेमाची बॉक्स ऑफीसवर मात्र सुरुवाता तितकीशी चांगली नाही. लोकांनी अक्षयच्या सिनेमाकडे पाठ फिरवलेलं दिसतंय. जाणून घ्या मिशन राणीगंज सिनेमाचं पहिल्या दिवशीचं बॉक्स ऑफीस कलेक्शन.

(mission raniganj box office collection day 1)

मिशन राणीगंज बॉक्स ऑफीस कलेक्शन Day 1

मिशन राणीगंज सिनेमाबद्दल सर्वांना खूप अपेक्षा होत्या. समीक्षकांनी मिशन राणीगंजची वाहवा केलीय. पण प्रेक्षकांनी मात्र सिनेमाकडे पाठ फिरवलेली दिसतेय.

अक्षय कुमार, परिणीती चोप्राचा मिशन राणीगंज चित्रपट प्रेक्षकांना आकर्षित करण्यात अपयशी ठरला. आता 'मिशन राणीगंज'च्या रिलीजच्या पहिल्या दिवसाच्या कमाईचे सुरुवातीचे आकडे समोर आले आहेत.

SACNILC च्या सुरुवातीच्या ट्रेंड रिपोर्टनुसार, 'मिशन राणीगंज' ने पहिल्या दिवशी फक्त 2.8 कोटी रुपयांची कमाई केली आहे. पण सध्या सुरु असलेल्या विकेंडला मिशन राणीगंज अपेक्षेपेक्षा चांगली कमाई करण्याची शक्यता आहे.

काय आहे मिशन राणीगंज सिनेमाची कथा?

अक्षय कुमार आणि परिणीती चोप्रा यांच्या ‘मिशन राणीगंज’ ही खऱ्या आयुष्यातील नायक जसवंत गिलची कथा आहे. अक्षय कुमारने चित्रपटात जसवंत गिलची भूमिका साकारली आहे. हा चित्रपट पश्चिम बंगालमधील राणीगंज येथील कोळसा खाणीत 65 खाण कामगार अडकल्याच्या वास्तविक जीवनावर आधारित आहे. अक्षय कुमार अभिनीत पात्र जसवंत सिंग गिल सर्व 65 खाण कामगारांचे प्राण वाचवते. या घटनेनंतर जसवंत सिंग गिल हे 'कॅप्सूल गिल' म्हणून ओळखले जाऊ लागले.

मिशन राणीगंजची स्टारकास्ट

मिशन राणीगंज मध्ये तगड्या कलाकारांची स्टारकास्ट आहे. अक्षय कुमार, परिणीती चोप्रासह कुमुद मिश्रा, राजेश शर्मा, रवी किशन, पवन मल्होत्रा, अनंत महादेवन असे कलाकार आहेत.

 मिशन राणीगंज सिनेमाचा थरारक ट्रेलर सर्वांना आवडला. हा सिनेमा ६ ऑक्टोबरला संपूर्ण भारतात रिलीज झाला आहे. टिनू सुरेश देसाई यांनी सिनेमाचं दिग्दर्शन केलंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Russia Ukraine Ceasefire : रशिया-युक्रेन युद्धबंदीच्या ठरावादरम्यान भारत अनुपस्थित, अमेरिकेनीही घेतला नाही सहभाग; झेलेन्स्कींना झटका !

T20 World Cup: पराभवानंतर भारतीय क्रिकेट संघाची देहबोली बदलली; सरावातही लक्षणीय बदल

Holi 2026: बरसाना विसरा! 'या' गावात महिला मारतात लाठ्या आणि पुरुष नाचतात साडी नेसून; लट्ठमार होळीचे हे ठिकाण माहीत आहे का?

Kolhapur Corporaters Dispute : कोल्हापूर महापालिकेत शारंगधर देशमुख-आदिल फरास यांच्यात जोरदार वाद, टेबल आपटण्याचा प्रकार; महापौरांनी केला हस्तक्षेप

UP Police: पोलिसांचा थरार! 'गो-तस्कर' कमरे हसनचा हाफ एन्काउंटर; अंधाराचा फायदा घेऊन ६ साथीदार पळाले

SCROLL FOR NEXT