siddharth mitali 
मनोरंजन

सिद्धार्थ-मितालीची लग्नानंतरची पहिली धुळवड; पाहा फोटो

स्वाती वेमूल

मराठीतील लोकप्रिय अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि अभिनेत्री मिताली मयेकर २४ जानेवारी २०२१ रोजी लग्नबंधनात अडकले. पुण्यातील ढेपे वाडा या ठिकाणी अत्यंत पारंपरिक पद्धतीने या दोघांचा विवाहसोहळा पार पडला. देशभरात धुळवड साजरी होत असताना सिद्धार्थ-मितालीसुद्धा लग्नानंतरची पहिली धुळवड साजरा करत आहेत. यानिमित्ताने मितालीने सोशल मीडियावर सिद्धार्थसोबतचे फोटो पोस्ट केले आहेत. कोरोनाचं सावट असल्याने या दोघांनी घरातच ही पहिली धुळवड साजरी केली. 

'लग्नानंतरची पहिली धुळवड, घरात बसून खेळलेली पहिली धुळवड. हेही बदलेल. पण त्यासाठी आज, उद्या, आणखी काही दिवस घरातच थांबावं लागेल, तेवढं करुया. सर्वांना होळीच्या शुभेच्छा', असं कॅप्शन मितालीने या फोटोंना दिलं आहे. त्यासोबतच पोस्टच्या शेवटी मितालीने मजेशीर ओळ लिहिली आहे. सिद्धार्थच्या फोटोला अनुसरून मितालीने लिहिलं की, 'जेव्हा मी म्हणते, सिद्ध्या माझं डोकं खातो. तेव्हा ते खरं असतं. तुम्हाला पुरावा हवा असेल तर दुसरा फोटो पाहा.' मितालीच्या या फोटोवर अनेकांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत. 

अशी सुरु झाली दोघांची प्रेमकहाणी
एका मालिकेच्या सेटवर सिद्धार्थ-मितालीची पहिल्यांदा भेट झाली. या भेटीचं रुपांतर हळूहळू मैत्रीत आणि नंतर प्रेमात झालं. २०१७ मध्ये सिद्धार्थने मितालीच्या वाढदिवसानिमित्त एका सरप्राइज पार्टीचं आयोजन केलं होतं. या पार्टीत सिद्धार्थने तिला लग्नासाठी प्रपोज केलं. त्यानंतर काही महिने एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी लिव्ह इन रिलेशनशिपचा निर्णय घेतला. जवळपास दोन वर्ष सिद्धार्थ-मिताली लिव्ह इनमध्ये राहिले. २०१९ मध्ये या दोघांचा साखरपुडा पार पडला. २०२० मध्ये ही जोडी लग्नबंधनात अडकणार होती. मात्र कोरोना महामारी आणि लॉकडाऊनमध्ये जानेवारी २०२१ मध्ये या दोघांनी लग्नगाठ बांधली. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पंजाब किंग्सच्या 'डिल' वर आर अश्विन खूपच प्रभावित; म्हणतोय, हा खेळाडू IPL 2026 मध्ये घुमशान घालणार

Education News: उच्च शिक्षणात क्रांती! परदेशी शिक्षणाचा खर्च वाचणार; भारतातच जागतिक विद्यापीठांचे वर्ग भरणार

Latest Marathi News Live Update : मुक्ताईनगर येथे अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई करणाऱ्यांना वाळू माफियांकडून धमकी

Kolhapur Election : एफआरपी थकवणाऱ्यांवर कारवाई करा! राजू शेट्टींचा सरकारवर थेट हल्लाबोल

Cold wave alert: कडाक्याची थंडी वाढली, आरोग्याची घ्या काळजी! आरोग्य विभागाचे आवाहन

SCROLL FOR NEXT