Mithila palkar shared photo in saree internet goes crazy  
मनोरंजन

सिरिज क्वीन मिथिलाने शेअर केला साडीतला फोटो, नेटकरी झाले घायाळ !

वृत्तसंस्था

मुंबई : बॉलिवूडमध्ये नवनवीन चित्रपट येत आहेत आणि दिवसेंदिवस शर्यतह वाढतेय. पण गेल्या वर्षांपासून सिनेमांना टक्कर देणारा प्लॅटफॉर्म आला तो म्हणजे वेब सिरिज. वेब सिरिजमधून अनेक यंग कलाकारांना संधी मिळाली आणि त्यातून सेलिब्रिटीही बनले. वेब सिरिजमध्ये टॉपला असलेली एक मराठमोळी सेलिब्रिटी म्हणजे मिथिला पालकर. नुकाताच तिने इन्स्टाग्रामवर एक फोटो अपलोड केला आणि इंटरनेटवर धुमाकुळ झाला आहे. पाहा तिचा नवा फोटो. 

मिथिलाने नुकताच साडीमधला एक फोटो शेअर केला आणि तो व्हायरलही होतोय. मिथिला तिच्या साडीमधील लुकचे अनेकदा फोटो शेअर करते. मिथिला पालकर हे नाव आता इंटरनेट आणि घराघरात पोहोचलं आहे. वेब सिरिजमधून ती फेमस झाली. त्यानंतर मराठीमध्येही तीने अनेक सिनेमे केले. 'माझा हनिमून' हा पहिल मराठी सिनेमा तिने केला. अभिनेता अमेय वाघ, सचिन खेडेकर, चिन्मयी सुमित असा दमदार कलाकारांसोबत तिने 'मुरांबा' हा चित्रपट केला.  

2015 मध्ये कंगणा आणि इमरान खान यांच्यासोबत 'कट्टी बट्टी' हा सिनेमा तिने केला. हिंदीत 2018 मध्ये इरफान खानसोबत 'कारवां' हा सिनेमा केला. 2019 मध्ये नेटफ्लिक्सचा 'चॉपस्टिक्स' हा सिनेमा अभय देओलसोबत मिथीलाने काम केलं.

'गर्ल इन द सिटी' आणि 'लिटल थिंग्स' या दोन वेब सिरिजमधून तिने काम केलं. या दोन्ही सिरिजने लोकांना अक्षरश: वेड लावले. तिच्या सरळ, साध्या आणि सहज अभिनयाने सर्वांनाच भूरळ घातली. 

मिथिला सोशल मीडियावर सतत अॅक्टीव असते आणि चाहत्यांशी संवादही साधते. ती इंटरनेट सेंसेशन आहे. मिथिला क्युट आणि दिसायला अतिशय सुंदर आहे त्यामुळे तिचे अऩेक चाहते आहेत. तिच्या कुरळ्या केसांचही चाहत्यांना विशेष आकर्षण आहे. त्यातच तिने साडीमध्ये फोटो टाकला की तो व्हायरल होतोच. तिच्या साडीमधल्या लुकवर नेटकरी घायाळ होतात !

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fight Between Two Pilots: विमानात 174 प्रवासी अन् दोन पायलटचे भांडणे, हाणामारी... नंतर थेट हायजॅकचा अलर्ट; इस्राईल सरकारमध्ये खळबळ!

Ambegaon Crop Insurance: पावसाने दगा दिला तर आधार मिळणार; आंबेगावातील ६,८६३ शेतकऱ्यांनी घेतले पीकविम्याचे कवच

Purna River Crisis: कोल्हापुरी बंधाऱ्याची दुरुस्ती रखडल्याने पूर्णा नदीचे पाणी वाहून गेले

Earthquake: भूकंपाचे धक्के किल्लारीत; माहिती दिल्लीहून!घटनेला ३३ वर्षे होऊनही स्थानिक संशोधनाचा अभाव

Raju Shetti: ‘नोव्हेंबरपूर्वी एकही साखर कारखाना सुरू करू देणार नाही’; राजू शेट्टींचा इशारा, ‘रोक सको तो रोक लो’

SCROLL FOR NEXT