Mithila Palkar trolled for her dress at Elle Awards 2022, users made fun of her sakal
मनोरंजन

Mithila Palkar: सोफ्याचं कापड गुंडाळून आली.. मिथिला पालकर झाली ट्रोल..

अभिनेत्री मिथीला पालकरने घातलेला अजब ड्रेस पाहून चाहत्यांनी तिची चांगलीच खिल्ली उडवली आहे.

नीलेश अडसूळ

दोन वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर काल रात्री मुंबईत ELLE ब्युटी अवॉर्ड्स 2022 चे आयोजन करण्यात आले होते. यादरम्यान बॉलिवूड आणि टीव्ही जगतातील अनेक कलाकारांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. यावेळी अनेक अभिनेत्रींनी त्यांच्या खास लूकसाठी प्रशंसा मिळवली. तर काहीजणी त्यांच्या ड्रेसिंग स्टाइलने चांगल्याच ट्रोल झाल्या. 'लिटिल थिंग्स' फेम काव्या म्हणजेच मिथिला पालकर ही तिच्या ड्रेसमुळे ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली आहे.

(Mithila Palkar trolled for her dress at Elle Awards 2022, users made fun of her)

मिथिला पालकर देखील 'Elle India Beauty Awards 2022' मध्ये सहभागी झाली होती. या सोहळ्यासाठी मिथिलाने शॉर्ट ब्लॅक ड्रेस परिधान केला होता. तिचा पोशाख शोल्डरलेस होता आणि त्याला खालच्या भाजूस एखाद्या डब्ब्या प्रमाणे घेर होता. नक्की तिने काय घातले समजत नव्हते आणि खूपच विचित्र दिसत होता. आता तिची तुलना उर्फी जावेद बरोबर केली जात आहे.

मिथिला पालकरची सोशल मीडियावर चांगलीच खिल्ली उडवली जात आहे. एकाने कमेंट केली आहे की, "हीने तर अवॉर्ड मध्ये येण्यासाठी घरचे पडदे फाडून ड्रेस तयार केला" तर दुसऱ्याने लिहिले आहे की, "हिने तर घरच्या सोफ्याच्या उरलेल्या कपडाचा ड्रेस परिधान केला आहे" तर "सकाळपासून घरचा डोअरमॅट गायब आहे मिथिला तु तर घालून नाही गेली ना",असेही एकाने म्हंटले आहे. "मिथिला तु उर्फी जावेद पासून दूर रहा ग" तर काहीनी 'या कपड्यावर ती बसणार कशी' याचीही काळजी बोलून दाखवली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 World Record : ख्रिस गेलचा १७५ धावांचा विक्रम उद्ध्वस्त, Lhuan-Dre Pretorius ने रचला इतिहास; २८चेंडूंत १३८ धावा

बालीत सुट्टी एन्जॉय करणं पडलं महागात! नुसरत भरुचाच्या भीषण अपघात, मुंबईत होणार सर्जरी

Latest Marathi News Live Update : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी जंतर-मंतरवर १० ऑक्टोबरला CJPचे आंदोलन

Ratnagiri News : देवरूखच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना नोटीस मोबाईल मेडिकल युनिट बंद; जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांचे आदेश

Mumbai Weather: ऑक्टोबर हीट'चा मुंबईला चटका, तापमानाचा पारा चाळिशीजवळ; पाहा IMDचा अंदाज

SCROLL FOR NEXT