Mithun Chakraborty Makes Clear He Doesn't Want A Biopic On Himself Google
मनोरंजन

Mithun Chakraborty: 'माझ्यावर बायोपीक बनवू नका, माझी कहाणी कोणालाही...', हे काय बोलून गेले मिथून दा?

बायोपिक वरील मिथुन चक्रवर्ती यांचे स्पष्ट मत कार्यक्रमात उपस्थित अनेकांना मात्र भावूक करून गेले.

प्रणाली मोरे

Mithun Chakraborty: सध्या बॉलीवूडमध्ये बायोपीक बनवण्याची लाट आलीय. गेल्या काही वर्षात बनलेल्या बायोपिकची जोरदार चर्चाही झाली. काहींना लोकांनी डोक्यावरही उचलून धरलं. यामध्ये दंगल,महेंद्रसिगं धोनी असो किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाग मिल्खा भाग, नीरजा, शेरशहा, मेरी कॉम, सिल्क स्मिता, पानसिंग तोमर अशा कितीतरी बायोपीकची नावं घेता येतील. आपल्यावर जिवंतपणी बायोपिक बनणं ही तर एखाद्या व्यक्तीसाठी गौरवास्पद गोष्ट. पण मिथुन चक्रवर्ती यांनी मात्र सरळ आपले मत मांडले आहे की,''माझ्यावर कोणी बायोपिक बनवू नका''.(Mithun Chakraborty Makes Clear He Doesn't Want A Biopic On Himself)

ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांनी खुलासा केला आहे की 80 च्या दशकात ते स्टारडमच्या शिखरावर होते आणि अजुनही आहेत, पण इथपर्यंत पोहचणे सोपे नव्हते. त्यांच्या संघर्षाच्या दिवसांमध्ये दुसऱ्या दिवशीचं जेवण मिळेल की नाही याचाही ठावठिकाणा नसायचा, ना झोपायचं कुठे माहित नसायचं, घर तर दुरची गोष्ट होती.

चक्रवर्तींच्या म्हणण्यानुसार, त्यांचा संघर्ष इतका तीव्र होता की त्यांना अनेक दिवस फूटपाथवर झोपावे लागले. “मी असे दिवस पाहिले आहेत जेव्हा मला रिकाम्या पोटी झोपावे लागले आणि मी झोपण्यासाठी रडत असे. खरं तर, एक काळ होता जेव्हा मला माझे पुढचे जीवन कसे असेल हे देखील माहित नव्हते''..

''आयुष्यात मी ज्या अनुभवातून गेलो आहे त्यातून कोणीही जावे असे मला कधीच वाटत नाही. माझी कथा कोणाला प्रेरणा देणार नाही. माझी कथा त्यांना मानसिकरित्या तोडेल, लोकांना काही संदेश यातून देता येणार नाही कारण माझा संघर्ष खूप त्रासदायक होता'', मिथुन यांनी या गोष्टी शेअर केल्यावर तिथे उपस्थित लोक भावूक झाले.

चक्रवर्ती यांनी 'सा रे ग मा प लिटिल चॅम्प्स' या सिंगिंग रिअॅलिटी शोमध्ये त्यांच्या कठीण काळातील आठवणी सांगितल्या. 'सेलिब्रेटिंग डिस्को किंग्स' या विशेष भागादरम्यान ते ज्येष्ठ अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरेसोबत शोमध्ये दिसणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT