Amey Khopkar News  Esakal
मनोरंजन

Amey Khopkar: 'फिल्मसिटी राज्याबाहेर गेली तर कोणाची चुक', अमेय खोपकरांचा खोचक सवाल

Vaishali Patil

Amey Khopkar MNS News: महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर हे वारंवार कलाकारांच्या पाठीशी उभे असतात. मराठी चित्रपटांना चित्रपटगृह , प्राईम टाइम मिळण्यापासून ते त्यांच्या वैयक्तिक अडचणीतही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा त्यांना पाठिंबा असतो. चित्रपट असो किंवा कलाकारांच्या काही समस्या ते नेहमी पुढाकार घेत असतात.

अमेय खोपकर यांनी नुकतच एक ट्विच केलं आहे. ज्यामुळे चर्चां सुरु झाल्या आहेत. खर तर त्यांचे हे ट्विट मुंबईतील गोरेगाव भागातील  फिल्मसिटीबद्दल आहे. यामध्ये त्यांनी सरकारला खडेबोल सुनावले आहे.

रस्त्यावरील खड्यांचा फोटो शेयर करत त्यांनी लिहिलं आहे की, 'मुंबईला मायानगरी म्हणतात ते या दादासाहेब फाळके चित्रनगरी म्हणजेच फिल्मसिटीमुळे. इथे ४२ आउटडोअर शूटिंग लोकेशन्स आणि १६ स्टुडिओ फ्लोअर्स आहेत.

टीव्ही मालिका, चित्रपट यांच्या शूटिंगसाठी हजारो माणसं इथे उपनगरातून येत असतात, पण आत प्रवेश केल्यावर अशा घाणेरड्या रस्त्यांवरुन ये-जा करावी लागते. ग्लॅमर दिसलं की हुरळून जाणाऱ्या राजकारण्यांना हे खड्डे दिसत नाहीत? '

इतकच नाही तर 'तुम्ही सुविधाच दिल्या नाहीत म्हणून उद्या हा चित्रपटउद्योग राज्याबाहेर गेला तर त्यांना चूक तरी कसं म्हणणार?' असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

पावसाळा सुरु झाला की रस्त्याची चाळण होते. जागोजागी खड्डे होतात आणि त्यात पाणी साचते. या रस्त्यांमुळे अनेक अपघातही होतात. या रस्त्यावर खड्डे असल्याने खड्डे चुकविण्याची कसरत करावी लागते. सामान्य नागरिकांपासुन कलाकारांपर्यंत सर्वांनाच या समस्येला तोंड द्यावे लागते.

दरम्यान फिल्मसिटीच्या रस्त्यावर खड्डे असल्याने कलाकारांनाही याचा नाहक त्रास होत आहे, अशा परिस्थितीमुळे चित्रपटउद्योग राज्याबाहेर जातील त्याला जबाबदार कोण असणार असा प्रश्नही ते करत आहेत.

आता अमेय खोपकर यांचे हे ट्वीट सोशल मिडियावर व्हायरल झाले आहे. त्यानंतर अनेक लोकांनी त्यावर प्रतिक्रियाही दिली आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubhanshu Shukla Return : वेलकम शुभांशु! अंतराळात तिरंगा फडकवून पृथ्वीवर परतले शुभांशु शुक्ला, कॅलिफोर्नियाच्या समुद्रावर केलं लँडिंग

Mumbai Rain: मुंबईत जोरदार पाऊस! अनेक भागात पाणी साचले, विमानांचे वेळापत्रक बिघडले अन्...; जाणून घ्या स्थिती

Crime News: धावत्या बसमध्ये प्रसूती; नवजात बाळाला रस्त्यावर फेकून दिल्याची अमानुष घटना

Mumbai News: मुंबईतील २० कोटी रुपयांच्या शौचालय घोटाळ्याची चौकशी करा, भाजपची पालिका आयुक्तांकडे मागणी

Shubhanshu Shukla Return Live : अंतराळवीर शुभांशु शुक्ला पृथ्वीवर परतले

SCROLL FOR NEXT