punit kaur
punit kaur  Team esakal
मनोरंजन

'देवा तो तुरूंगातच राहु दे' राजला असं म्हणणारी पुनित कौर आहे कोण ?

युगंधर ताजणे

मुंबई - बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा (shilpa shetty) पती राज कुंद्रा (raj kundra) तुरुंगात आहे. त्याच्यावर न्यायालयात सुनावणी सुरु आहे. दरम्यानच्या काळात त्याच्यावर बॉलीवूडमधील अनेक सेलिब्रेटी अभिनेत्रींनी वेगवेगळ्या प्रकारचे आरोप केले होते. यात अभिनेत्री पुनम पांडे, शर्लिन चोप्रा यांचा समावेश होता. आता त्यात पुनम कौर या अभिनेत्रीचीही भर पडली आहे. तिनं ज्या प्रकारे राजवर आरोप केले आहेत. त्यातून राज आणि तिच्यात जोरदार वाद झाले होते हे लक्षात येते. यापूर्वी राजनं शर्लिन आणि पुनमला पैशांचे अमिष दाखवून त्यांची फसवणूक केल्याचे त्या अभिनेत्रींनी सांगितले आहे. (model and youtuber puneet kaur allegation on raj kundra porn video case yst88)

अभिनेत्री पुनमनं आपल्या सोशल मीडियाच्या अकाउंटवरुन धक्कादायक आरोप केला आहे. त्यात तिनं राजचे तुरुंगात असणे याचे समर्थन केले आहे. त्यामुळे ती चर्चेत आली आहे. राजला मुंबई क्राईम ब्रँचनं पोर्नोग्राफी व्हिडिओ बनविल्याप्रकरणी अटक केली होती. त्यानंतर अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरावरही छापा टाकण्यात आला होता. आता दोघांच्या बँक अकाउंटवरही पोलिसांचा वॉच आहे. दुसरीकडे वेगवेगळे कलाकार राजवर आरोप करताना दिसत आहे. त्यामुळे त्याच्या डोकेदुखीत वाढ होत चालली आहे.

punit kaur post

तु तुरुंगातच असायला पाहिजे. अशा शब्दांत पुनीतनं आपल्या भावना व्यक्त केल्या आहे. यासगळ्या प्रकरणात पुनीत कोण आहे, असा प्रश्न वाचकांना पडला आहे. पुनीत ही एक प्रसिद्ध युट्युबर आहे. तिनं राजनं आपल्याला एक व्हिडिओ बनवण्याची ऑफर दिली होती. असं सांगितलं आहे. त्यामुळे आणखी एक धक्कादायक खुलासा समोर आला आहे. पुनीतनं सोशल मीडियावर यासंबंधी एक पोस्ट लिहिली आहे. त्यात ती म्हणते, माझ्या व्हेरिफाईड डीएम व्हिडिओविषयी तुम्हाला माहिती असेलच....

सध्या अशाप्रकारच्या पोस्टमुळे पुनीत चर्चेत आली आहे. याशिवाय पुनितनं काही बातम्यांचे फोटो देखील व्हायरल केले आहेत. यावरुन तिनं राजबदद्ल आपला जुना राग व्यक्त केल्याचे दिसुन आले आहे. राजच्या प्रकरणात पोलिसांनी आपल्याकडे मोठ्या प्रमाणावर पुरावे असल्याचे सांगितले आहे. पुनीत कौर ही एक भारतीय – अमेरिकन मेकअप आर्टिस्टही आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs KKR Live Score: सुनील नारायणचं शानदार अर्धशतक; कोलकाता 100 धावा पार

Lok Sabha Election 2024 : लोकसभेचा तिसऱ्या टप्प्यातील प्रचार संपला, देशभरातील 94 जागांसाठी 7 मे रोजी मतदान

Ajit Pawar : रोहित पवार झाले भावनिक, अजित पवारांनी केली नक्कल! म्हणाले, असली नौटंकी...

IPL 2024 Point Table : ऋतुराजची चेन्नई टॉप फोरमध्ये दाखल! CSK च्या विजयानं पंजाबलाच नाही तर तब्बल सहा संघांना बसला धक्का

LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

SCROLL FOR NEXT