milind soman sea phase photo. 
मनोरंजन

मिलिंद सोमणचं समुद्र किना-यावर 'बोल्ड' जॉगिंग

सकाळ ऑनलाईन टीम

मुंबई - वयाची पन्नाशी ओलांडल्यानंतरही आपला फिटनेस तंदुरुस्त ठेवणा-या मॉडेल, अभिनेता मिलिंद सोमण याचा फॅन फॉलोअर्स मोठा आहे. तो त्याच्या फिटनेसचे व्हिडीओ सातत्याने सोशल मीडियावर शेयर करत असतो. त्याचे मॅरेथॉनमध्ये धावणे, कुटूंबासमवेत योगा करणे,असे फोटो प्रचंड व्हायरल झाले आहेत. आला त्याने आपल्या जन्मदिनाच्या औचित्यानं एक फोटो इंस्टावर शेयर केला आहे. अवघ्या काही तासाभरात त्याला हजारो लाईक्स मिळाले आहेत. 

मेड इन इंडिया या अलिशा चिनॉयच्या अल्बममध्ये मिलिंद सोमणला ज्यांनी पाहिलं आहे त्यांना त्याच्याबद्दल वेगळं काही सांगण्याची गरज नाही. देशातील पहिला पुरुष सुपर मॉडल म्हणून अभिनेता मिलिंद सोमणचे नाव घेतले जाते. मॉडेलिंगपासून करिअरची सुरुवात करणारा मिलिंद आज फिटनेस फ्रिक म्हणून ओळखला जातो. विशेष म्हणजे बऱ्याचदा तो सोशल मीडियावर त्याच्या वर्कआऊटचे फोटो, व्हिडीओ शेअर करतो. मात्र, यावेळी त्याने स्वत: बोल्ड फोटो शेअर केला आहे.

मॉडेलिंगपासून अभिनयापर्यंतच्या या जवळपास ३० वर्षांच्या करिअरमध्ये मिलिंदला अनेकदा टीकेचा सामना करावा लागले आहे. मात्र त्यासगळयाला त्याने मोठ्या धैर्याने तोंड दिलं आहे.मिलिंदने त्याच्या वाढदिवसाबद्दल इन्स्टाग्रामवर एक बोल्ड फोटो शेअर केला आहे.

मिलिंद सोमण ५५ वर्षांचा झाला असून त्याने  ‘हॅप्पी बर्थ डे टू मी…#55’ , अशी कॅप्शन या फोटोला दिली आहे.  यात तो समुद्रकिनारी धावत आहे. त्याचा हा फोटो पाहिल्यानंतर  त्यावर कमेंट्स करण्यास सुरुवात केली आहे.  यापूर्वीदेखील त्याने असाच एक बोल्ड फोटो शेअर केला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik Municipal Election : युती तोडल्याचे खापर कुणावर? गिरीश महाजन लक्ष्य, तर भाजपकडून शिवसेनेवर पलटवार

सुनिधी चौहानच्या कॉन्सर्टला पोहोचली झी मराठीची कमळी; स्वतःच्या नावाच्या गाण्यावर लगावले ठुमके; व्हिडिओ व्हायरल

Latest Marathi News Live Update : मांजरसुंबा रोडवरील वैद्यकिन्ही टोल नाक्यावर तिघांना बेदम मारहाण

Explainer : व्हॉट्सअ‍ॅप न्यू ईयर ग्रीटिंग स्कॅम काय आहे? एक मेसेज अन् बँक अकाऊंट होईल रिकामं..कसं राहालं सुरक्षित? वाचा A टू Z माहिती

Thane BJP Office Suvarna Kamble चा राडा, उमेदवारी नाकारल्यानं कार्यालयात गोंधळ | Video Viral | Sakal News

SCROLL FOR NEXT