mohan popular south actor death Kamal Haasan Movie Actor Mohan Passes Away Found Dead On Road  SAKAL
मनोरंजन

Mohan Death: कमल हसन सोबत काम केलेला लोकप्रिय अभिनेता मोहनचं निधन, रस्त्यावर सापडला मृतदेह

अभिनेता मोहन तामिळनाडूतील भागात रस्त्यावर संशयास्पद स्थितीत मृतावस्थेत आढळून आला

Devendra Jadhav

South Actor Mohan Death News: प्रसिद्ध तमिळ अभिनेता मोहन तामिळनाडूतील मदुराई शहरातील थिरुपरनकुंद्रम भागात रस्त्यावर संशयास्पद स्थितीत मृतावस्थेत आढळून आला. सूत्रांनी शुक्रवारी ही माहिती दिली. अभिनेत्याच्या निधनाची बातमी ऐकून त्याच्या सर्व चाहत्यांना धक्का बसला आहे.

NBT च्या वृत्तानुसार अभिनेता मोहन काही काळ गरिबीत जगत होता. परिस्थिती अशी होती की त्याला भीक मागावी लागली. मोहन हे तमिळ चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध नाव होतेय. ज्यांनी कमल हसनसह अनेक दिग्गज कलाकारांसोबत काम केले होते.

(mohan popular south actor death Kamal Haasan Movie Actor Mohan Passes Away Found Dead On Road)

मोहनने 'नान कडूवुल' सिनेमात आर्याची मुख्य भूमिका साकारली होती. चित्रपटांमध्ये काम न मिळाल्याने ते मदुराई येथील थिरुपरकुंडरम येथे स्थायिक झाले. NBT च्या वृत्तानुसार, त्याच्या पत्नीचे १० वर्षांपूर्वी निधन झाले होते आणि तेव्हापासून तो उदरनिर्वाहासाठी रस्त्यावर भीक मागू लागला होता.

रिपोर्ट्सनुसार, मोहनला बऱ्याच दिवसांपासून काम मिळत नव्हते. आर्थिक विवंचनेनेही तो झगडत होता. प्रत्येक प्रकारे त्याला नोकरी मिळू न शकल्याने मोहनने बळजबरीने भीक मागायला सुरुवात केली.

31 जुलै रोजीच मोहनचा मृत्यू झाला. आजूबाजूच्या लोकांना तो रस्त्यावर मृतावस्थेत पडलेला दिसला, तेव्हा पोलिसांना त्याची माहिती देण्यात आली. त्याचे शरीर ओळखण्यापलीकडे होते. सध्या पोलिसांनी त्याच्या कुटुंबीयांना माहिती दिली आहे. त्यांच्या कुटुंबात त्यांना दोन भाऊ आणि तीन बहिणी आहेत.

1989 च्या ब्लॉकबस्टर 'अपूर्व सगोधरंगल' मध्ये सुपरस्टार कमल हासनच्या जिवलग मित्राची भूमिका केल्यानंतर मोहन प्रसिद्धीस आला. हा चित्रपट सर्व प्रमुख भाषांमध्ये डब करण्यात आला आणि समीक्षकांची प्रशंसा झाली. यानंतर मोहनने विनोदी अभिनेता म्हणून उत्तम काम केले. अनेक चित्रपटांमध्ये तो सहाय्यक भूमिकेत दिसला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL, 1st Test: टी ब्रेक संपला, केएल राहुल मैदानात आला, पण एकही बॉल न खेळला रिटायर्ड हर्ट झाला... नेमकं घडलं काय?

Marathi News Live Updates : भेसळयुक्त तूप तयार करणाऱ्या आणि त्याचे पॅकेजिंग करणाऱ्या एका संशयास्पद युनिटवर छापा

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे जेवायला रेस्टॉरंटमध्ये गेले, ताटात नकली पनीर आढळलं; पुढे काय झालं? आयुक्तांनी कारवाईचा किस्साच सांगितला!

Video: संपूर्ण 'वंदे मातरम्' गायनावर सोनिया गांधींनी खरंच आक्षेप घेतला होता का? नेमकं काय घडलं? काँग्रेसचं स्पष्टीकरण

महिलांविषयीचा 'तो' प्रश्न आणि स्पर्धकाने खेळ सोडला; बरोबर उत्तराने मिळाले असते ५० लाख; तुम्हाला येतंय का उत्तर?

SCROLL FOR NEXT