Yeh Rista Kya Kehlata Hai News  
मनोरंजन

'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम मोहिनीची GOOD NEWS

टेलिव्हिजन मनोरंजन वाहिनीवर सर्वाधिक लोकप्रिय असलेली मालिका म्हणजे ये रिश्ता क्या कहलाता है.

सकाळ डिजिटल टीम

Yeh Rishta Kya Kehlata Hai : टेलिव्हिजन मनोरंजन वाहिनीवर सर्वाधिक लोकप्रिय असलेली मालिका म्हणजे ये रिश्ता क्या कहलाता है. या मालिकेनं आतापर्यत लोकप्रियतेचे अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. या मालिकेतील कित्येक कलाकार हे चाहत्यांच्या पसंतीचे आहेत. सध्या मालिकेतील प्रमुख अभिनेत्री मोहिनी कुमारी (Mohena Kumari) चर्चेत आली आहे. तिनं आता गुड न्यूज दिली आहे. त्यामुळे चाहत्यांनी तिच्यावर कौतूकाचा वर्षाव केला आहे तिनं बेबी बंपचे फोटोही सोशल मीडियावरुन शेयर केले आहे. त्यावर वेगवेगळ्या प्रकारच्या कमेंट्सही केल्या आहेत. (Mohena Kumari Flaunts Baby Bump)

मोहिनीनं पती सुयशसोबत (Suyesh Rawat) फोटो शेयर केले आहेत. तिनं आपल्या पहिल्या प्रेग्नंसीबाबत चाहत्यांना माहिती दिली आहे. ये रिश्ता क्या कहलाता है मध्ये आपल्या अभिनयानं चाहत्यांचे लक्ष वेधून घेणारी अभिनेत्री म्हणून मोहिनीचं नाव घ्यावं लागेल. आज तिचे हजारो चाहते देखील आहेत. मोहिनीनं फोटो शेयर करुन त्यावर एक कॅप्शनही दिली आहे. आता पुन्हा एकदा नवीन सुरुवात. मी तुमच्यासोबत एक गुड न्यूज शेयर करत आहे. मला तुम्हाला ती गोष्ट सांगताना कमालीचा आनंद होतो आहे. यावेळी मनोरंजन क्षेत्रातील अनेक सेलिब्रेटींनी आनंद व्यक्त केला आहे.

मोहिनीनं साडीतील काही फोटो शेयर केले आहेत. त्यामध्ये तिनं बेबी बंपच्या फोटोंचा समावेश केला आहे. त्यासाठी मी देवाला खूप साऱ्या शुभेच्छा देते. यावेळी मोहिनीनं आपल्या कुटूंबासमवेत फोटो शेयर केला आहे. त्या फोटोला कॅप्शन देताना तिनं लिहिलं आहे की, माझं मन आज कमालीच्या आनंदानं भारावून गेलं आहे. तुम्ही मला दिलेल्या शुभेच्छांसाठी मी तुमची आभारी आहे. मोहिनी कुमारीनं ये रिश्ता क्या कहलाता है मध्ये कीर्तीची भूमिका केली आहे. तिनं 2019 मंत्री आणि आध्यात्मिक गुरु सतपाल महाराज यांचे चिरंजीव सुयश रावत यांच्याशी विवाह केला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

थलपती विजय यांचा दारूच्या गुणवत्तेबाबत मोठा निर्णय; अल्कोहोलचं प्रमाण तपासणार

देशात H1N1चा फैलाव; नवा स्ट्रेन की जुना विषाणू? ICMRने सांगितलं सत्य, वैज्ञानिकांनी दिली महत्त्वाची माहिती

Vivo V80 Lite: 10,000 mAh बॅटरीसह MediaTek प्रोसेसर अन् तगडा कॅमेरा; 3 सप्टेंबरला लाँच होतोय Vivoचा 5G स्मार्टफोन!

Marathi News Live Updates : ग्रामसेवकांच्या गैरहजेरीला आता लगाम! बायोमेट्रिकसह GPS हजेरी बंधनकारक, नियम मोडल्यास होणार कारवाई

MPSC Success Story: शेतकरी कुटुंबातील लेकीची मोठी झेप! नेहा पिसाळ राज्य कर निरीक्षकपदी, जिद्दीला मिळाली यशाची पावती..

SCROLL FOR NEXT