ileana d'cruz Esakal
मनोरंजन

Ileana D'cruz : गरोदरपणाचा नववा महिना अन् इलियानानं केला मोठा खुलासा! फोटो व्हायरल

Vaishali Patil

 IIeana D'cruz Boyfriend Photo: बॉलिवूड अभिनेत्री इलियाना डिक्रूझ लवकरच आई होणार आहे. सध्या ही अभिनेत्री परदेशात राहून तिच्या गरोदरपणाचा आनंद घेत आहे. इलियानाने एप्रिलमध्ये ती गरोदर असल्याचं सांगितलं होतं.

Ileana D'cruz Boyfriend Photo:

जेव्हा पासून इलियानाने तिच्या गरोदरपणाची घोषणा केली तेव्हापासून तेव्हापासून तिची चर्चा सुरु आहे. ती लग्नाशिवाय आई होणार असल्याने अनेकांनी तिला ट्रोल केले. काही दिवसांपुर्वीच तिने तिच्या बॉयफ्रेडसोबतचा फोटो शेयर केला होता.

त्यानंतर पुन्हा चर्चांना उधाण आले होते. बऱ्याच काळानंतर इलियाना डिक्रूझने तिच्या बॉयफ्रेंडसोबत एक फोटो शेयर केला आहे. त्यामुळे तो होणाऱ्या बाळाच्या वडिलांचा फोटो आहे अशी चर्चा सोशल मडियावर सुरु झाली आहे.

इलियानानं शेयर केलेल्या फोटोत तिच्या बॉयफ्रेंडसोबत डेट नाईट एन्जॉय करताना दिसत आहे. हा फोटो तिने इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केला आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिनं लिहिले, 'डेट नाइट' . मात्र तिने तिच्या बॉयफ्रेंडचे नाव काय आणि तो कोण आहे हे अद्याप तिनं स्पष्ट केलेलं नाही.

इलियानानं काही काळापूर्वी तिच्या हातातली अंगठी दाखवत एक फोटो शेअर केला होता. त्या फोटोनंतर त्यांची एंगेजमेंट झाल्याची अटकळ बांधली जात होती. मात्र, तिने अद्याप कोणतेही वक्तव्य आलेले नाही.

गेल्या अनेक दिवसांपासून तिने आयुष्यातले काही खास क्षण तिच्या चाहत्यांसोबत शेयर करत असते. मात्र आजपर्यंत इलियानाने तिचा प्रियकर किंवा जोडीदार कोण आहे खुलासा केला नव्हता. या फोटोपूर्वीही इलियानाने तिच्या बॉयफ्रेंडसोबतचे काही फोटो शेअर केले होते. तेव्हा तिने चेहरा दाखवला नव्हता. तिने तिच्या प्रियकरासोबत फोटो शेयर केला. त्यामुळे आता पुन्हा चर्चांना सुरवात झाली आहे. मात्र अद्याप तो कोण आहे हे इलियानानं सांगितलेलं नाही.

इलियानाने रणबीर कपूरसोबत 'बर्फी' या चित्रपटातुन तिचा बॉलिवूड डेब्यू फिल्म केला होता. ती शेवटची 'अनफेअर अँड लव्हली' चित्रपटात दिसली होती. आता ती तिच्या गरोदरपणाचा आनंद घेत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Theft : लॉकरचा पासवर्ड चोरला अन् १७ हजार डॉलर्सवर मारला डल्ला; पुण्यात ऑफिस बॉयचा कारनामा!

Weekend Special Recipe: वीकेंडला घरीच १५ मिनिटांत बनवा हॉटेल स्टाइल 'तंदूर पनीर टिक्का', सगळ्यांचं तोंडात पाणी सुटेल

आजचे राशिभविष्य - 10 जानेवारी 2026

Makar Sankranti 2026: मकर संक्रांतीला काळे कपडे का घातले जातात? कारण ऐकून थक्क व्हाल!

Panchang 10 January 2026: आजच्या दिवशी शनि वज्रपंजर कवच स्तोत्राचे पठण व ‘शं शनैश्चराय नमः’ या मंत्राचा जप करावा

SCROLL FOR NEXT