Jacqueline Fernandez  Esakal
मनोरंजन

Jacqueline Fernandez : मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात जॅकलिनला मोठा दिलासा; करता येणार विदेश प्रवास

दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टाने जॅकलिनला दुबई येथे जाण्याची परवानगी दिली आहे.

सकाळ डिजिटल टीम

Money Laundering Case : २०० कोटींच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणातील आरोपी जॅकलिन फर्नांडिसला दिल्लीच्या पटियाला कोर्टाने मोठा दिलासा दिला आहे.

हेही वाचा : ....इथं बनतो आपला लाडका तिरंगा

दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टाने जॅकलिनला दुबई येथे जाण्याची परवानगी दिली आहे.

27 जानेवारी ते 30 जानेवारी दरम्यान दुबईला जाण्यासाठी जॅकलिनतर्फे याचिका दाखल करण्यात आली होती.

त्यावर कोर्टाने वरील आदेश देत जॅकलिनला विदेशात जाण्यास परवानगी दिली आहे. जॅकलिन पेप्सिको इंडिया कॉन्फरन्समध्ये सहभागी होण्यासाठी दुबईला जाणार आहे.

दुबईतील पेप्सिको इंडिया कॉन्फरन्समध्ये होणाऱ्या मैफलीत जॅकलिनला स्टार परफॉर्मर म्हणून आंमंत्रित करण्यात आले आहे. त्यात उपस्थिती लावण्यासाठी आपल्याला विदेशात जाण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी जॅकलिनने कोर्टाकडे केली होती. अखेर कोर्टाने तिला यासाठी परवानगी दिली आहे.

कोर्टाने दिला आहे नियमित जामीन

सुकेश चंद्रशेखर प्रकरणात जॅकलिन एक आरोपी असून, 15 नोव्हेंबर 2022 रोजी तिला या प्रकरणात नियमित जामीन मंजूर करण्यात आला असून, यावरील पुढील सुनावणी 15 फेब्रुवारी रोजी होणार आहे. तर सुकेश चंग्रशेखरची सुनावणी 23 जानेवारी रोजी होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC विद्यार्थ्यांचं आंदोलन मागे, चौकशी पूर्ण होईपर्यंत अध्यक्ष सक्तीच्या रजेवर; मध्यरात्री घडामोडी, पुण्यात आंदोलकांचा जल्लोष

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

SCROLL FOR NEXT