morya morya song on raada marathi movie released on occasion of ganeshotsav 2022 sakal
मनोरंजन

'राडा' चित्रपटातील 'मोरया मोरया' गाणं तुफान गाजतंय..

जसराज जोशी आणि मधुर शिंदेच्या आवाजातील 'राडा' चित्रपटातील 'मोरया मोरया' गाणे करतंय रसिकांच्या दिलावर राज्य..

नीलेश अडसूळ

marathi movie : फुल्ल ऑफ ऍक्शन, कॉमेडी आणि सोबत रोमँटिक सीन्सचा भरणा असलेल्या 'राडा' सिनेमाचे पहिले वहिले गणरायाला साद घालणारे 'मोरया मोरया' गाणे रसिक प्रेक्षकांच्या दिलाचा ठेका चुकवायला प्रेक्षकांच्या भेटीस आले आहे. गणरायाचे आगमन होताच आता कोणत्याही क्षणाचा विलंब न करता या चित्रपटातील गणपती सॉंग प्रेक्षकांच्या भेटीस आले आहे.

(morya morya song on raada marathi movie released on occasion of ganeshotsav 2022)

राम शेट्टी निर्मित 'राडा' या सिनेमातील 'मोरया मोरया' हे गाणे जाफर सागर लिखित असून गायक जसराज जोशी आणि मधुर शिंदे यांनी त्यांच्या सुमधुर आणि दमदार आवाजात हे गाणे स्वरबद्ध केले आहे. तर संगीतकार दिनेश अर्जुना यांनी या गाण्याच्या संगीताची धुरा पेलवली आहे. या गाण्यातील नृत्याची जबाबदारी कोरियोग्राफर फुलवा खामकर यांनी उत्तमरीत्या सांभाळली आहे.

या चित्रपटात आकाश शेट्टीसह मिलिंद गुणाजी, संजय खापरे, गणेश यादव, अजय राठोड, गणेश आचार्य, निशिगंधा वाड, योगिता चव्हाण, सिया पाटील, हिना पांचाळ, शिल्पा ठाकरे या कलाकारांना पाहणे रंजक ठरणार आहे. दिग्दर्शक रितेश सोपान नरवाडे यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन, संवाद आणि स्क्रीनप्ले अशा तीनही धुरा पेलवल्या आहेत. तर हा भव्य ऍक्शनपट के. प्रवीण याने त्याच्या कॅमेऱ्यात कैद केला आहे.

गणरायाला वंदन करणारे हे 'मोरया मोरया' गाणे प्रेक्षकांच्या मनात घर करेलच यांत शंकाच नाही. येत्या २३ सप्टेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात 'मोरया मोरया' गाण्याचा धुमाकूळ घालणारा 'राडा' हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray Letter : बाळासाहेब, पवार साहेब, महाजन यांनी कोणालाच पाठीशी घातल नाही; राज ठाकरेंची फडणवीसांवर 'सत्तेचा माज, मौनावर' कठोर शब्दांत टीका

IND vs ENG 2nd T20I: तो परतला, आता काय खरं नाय... इंग्लंडच्या Playing XI मध्ये २ बदल; भारताला टक्कर देण्यासाठी तगडा संघ जाहीर

Latest Marathi Live Update: आमचे ऑपरेशन 3.0 सुरू... आता महाभुकंप होणार ; संजय शिरसाटांचा मोठा दावा

Sugar Factory : साखरेतील सहकाराचा गोडवा ओसरला; १६ पैकी चार कारखाने बंद, दोन भाडेपट्ट्यावर

राम मंदिर दानचोरी : आता जमिनीवर बसून मोजणी होणार, कर्मचाऱ्यांसाठी नवा ड्रेस कोड; ट्रस्टचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT