Mothers Day Bollywood Moms esakal
मनोरंजन

Mothers Day Bollywood Moms : 'बॉलीवूड मदर्स' ची गोष्टच वेगळी! आलिया ते बिपाशा पहिल्यांदाच...

बॉलीवूडचे सेलिब्रेटी देखील मदर्स डे च्या उत्साहात सहभागी झाले आहेत. खासकरुन बिपाशा, आलिया भट्ट, गौहर खान या अभिनेत्रींसाठी यंदाचा मदर्स डे वेगळाच आहे.

सकाळ डिजिटल टीम

Mothers Day Bollywood Moms : जगभरामध्ये आज मदर्स डे मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. भारतामध्ये देखील वेगवेगळ्या प्रकारे मदर्स डे साजरा होत आहे. सोशल मीडियावर त्यासाठी खास पोस्ट शेयर करण्यात येत आहे. यामध्ये लहानांपासून ज्येष्ठांपर्यत अनेकांनी सहभाग घेतला आहे.

बॉलीवूडचे सेलिब्रेटी देखील मदर्स डे च्या उत्साहात सहभागी झाले आहेत. खासकरुन बिपाशा, आलिया भट्ट, गौहर खान या अभिनेत्रींसाठी यंदाचा मदर्स डे वेगळाच आहे. त्यांच्यासाठी यावेळचा मदर्स डे हा पहिलाच असून त्यानिमित्तानं त्यांनी खास पोस्टही शेयर केली आहे. सोशल मीडियावर वेगवेगळ्या बॉलीवूड सेलिब्रेटींच्या पोस्ट मदर्स डे च्या निमित्तानं शेयर करण्यात आल्या आहेत.

फेसबूक आणि इंस्टावर मदर्स डे च्या निमित्तानं पोस्ट व्हायरल होताना दिसत आहे. गौहर खाननं दोन दिवसांपूर्वी तिच्या गुड न्यूजविषयी सांगितले. त्या पोस्टनंतर तिच्यावर चाहत्यांनी कौतूकाचा वर्षाव केला होता. बॉलीवूडमधील काही अभिनेत्री यंदा पहिल्यांदाच मदर्स डे सेलिब्रेट करत आहेत. त्या अभिनेत्री कोण याविषयी जाणून घेऊयात.

1. गौहर खान-

बिग बॉस ७ मधून प्रेक्षकांच्या कौतूकाचा विषय झालेल्या गौहर खाननं लक्ष वेधून घेतले होते. गौहर खाननं इश्कजादे नावाच्या चित्रपटामध्ये केलेली भूमिका प्रेक्षकांना आवडली होती. गौहर ही नेहमीच तिच्या वेगवेगळ्या वक्तव्यांमुळे चर्चेत असते. तिनं झैद दरबार सोबत लग्न केलं. तिनं दोन दिवसांपूर्वी इंस्टावर खास पोस्ट शेयर करुन चाहत्यांनी दिलेल्या शुभेच्छांचा स्विकार केला होता.

2. बिपाशा बासू -

बिपाशा बसू आणि तिचा पती करण सिंग ग्रोव्हरच्या मुलावर चाहत्यांनी कौतूकाचा वर्षाव केला होता. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये त्यांनी गुड न्युज दिली. बिपाशाच्या मुलीचे नाव देवी बासू असे आहे. बिपाशा देखील यावेळी पहिल्यांदाच मदर्स डे सेलिब्रेट करते आहे.

3. सोनम कपूर - अनिल कपूरची मुलगी सोनम कपूर ही आता लंडनमध्ये राहते. तिनं काही दिवसांपूर्वी मुलीला जन्म दिला. मार्च महिन्यात सोनमनं गुड न्युज दिली होती. तिचे फोटो हे नेहमीच सोशल मीडियावर चर्चेचा विषय असतात. आजोबा झालेल्या अनिल कपूर यांनी तर तो दिवस मोठ्या आनंदात साजरा केला होता. त्या व्हिडिओला मिळालेला प्रतिसादही मोठा होता. नातू झाल्याचा त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता.

4. काजल अग्रवाल - सिंघम फेम काजल अग्रवाल गेल्या वर्षी एप्रिलमध्ये मुलाला जन्म दिला. त्याचे नाव त्यांनी निल किचलू असे ठेवले आहे. काजलनं सोशल मीडियावर शेयर केलेल्या त्या फोटोंना चाहत्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता.

5. आलिया भट्ट

बॉलीवूडची सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्री आलिया भट्टच्या लाडक्या लेकीचं चाहत्यांनी मोठ्या उत्साहात केलं होतं. रणबीर कपूर सोबत लग्न केलेल्या आलियाच्या लेकीचं चाहत्यांना मोठं कौतूक आहे. आलियानं तिच्यासाठी वर्षभर आपण कोणत्याही प्रोजेक्टमध्ये काम करणार नसल्याचे सांगितले होते. आलियासाठी आजचा दिवस खास असणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bashir Badr: “उजाले अपनी यादों के...” म्हणणारा आवाज कायमचा शांत... शायर बशीर बद्र यांचे निधन! प्रसिद्ध शेर आजही लोकांच्या ओठांवर

Savarkar Statue Sangli : स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकरांच्या पुतळ्याला परवानगीचा अडथळा; राज्य, केंद्र शासनात हिंदुत्ववादी राज्यकर्ते, तरीही दोन वर्षांपासून फाईल रखडली

Pune Crime: उरुळी कांचनमध्ये १६ वर्षीय मुलगा बेपत्ता; सहा दिवसांनंतर अपहरणाचा गुन्हा दाखल

12 मुलं असूनही साऊथ सुपरस्टारला करायचं होतं दुसरं लग्न ! धाकट्या भावाने अभिनेत्रीला करायला लावला ब्रेकअप

Ichalkaranji Betting Case : आमदार राहुल आवाडेंचा कट्टर समर्थक नगरसेवक गोट्या पवारला ऑनलाइन बेटिंग प्रकरणात अटक, इचलकरंजी पोलिसांची कारवाई

SCROLL FOR NEXT