Mouni Roy  Sakal
मनोरंजन

Mouni Roy: घर नव्हे राजवाडाच, मौनीच्या घराचे फोटो पाहिलेत का?

एकता कपूरच्या क्यूंकी सास भी कभी बहू थी या शोमधून मौनीने तिच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली.

सकाळ डिजिटल टीम

टीव्ही इंडस्ट्रीतील टॉप 10 अभिनेत्रींचे नाव घेतले तर मौनी रॉयचे नाव पहिल्या क्रमांकावर येते. एकता कपूरच्या क्यूंकी सास भी कभी बहू थी या शोमधून तिच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली. मौनी रॉय नागिन या सिरीयलपासून खूप प्रसिद्ध झाली.

मात्र, एवढ्या यशाने मौनी खूश नव्हती. तिने प्रयत्न करून 'गोल्ड' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटात तिची मोठी भूमिका नव्हती, पण मौनीच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले. यानंतर मौनी रॉयने 'रॉ' चित्रपटात आयटम नंबर केला.

मौनी मेड इन चायना आणि ब्रह्मास्त्र या चित्रपटात देखील दिसली आहे. आज मौनी रॉयचे नाव बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींमध्ये सामील झाले आहे. पण, अनेक प्रोजेक्ट्सवर काम केल्यानंतर, जेव्हा मौनीला थोडा वेळ हवा असतो, तेव्हा तिला फक्त एकच जागा आवडते ती म्हणजे तिचे मुंबईमधील फ्लॅट.

मौनीचे घर बॉलिवूडच्या ग्लॅमरपासून दूर आहे. मौनीला नैसर्गिक गोष्टी आवडतात. त्यामुळेच तिने नैसर्गिक प्रकाश असलेला हवादार फ्लॅट निवडला आहे. मौनीच्या घराच्या भिंती पांढऱ्या रंगाच्या आहेत. असे नाही की तिला रंग आवडत नाहीत, पण मौनीला पांढऱ्या रंगात शांतता मिळते. मौनीने तिचे घर सुंदर दिसण्यासाठी छोट्या रंगीबेरंगी पॉप्सने घर सजवले आहे.

मौनी रॉय जेव्हा शूटिंग करत नसते तेव्हा ती तिच्या मैत्रिणींसोबत कुठेतरी सुट्टीवर जाते. मौनीला शॉपिंग करायला आवडते आणि जेव्हा घर सजवण्याचा विचार येतो तेव्हा मौनी कुठेही जाते तेव्हा ती नक्कीच तिचे घर सजवण्यासाठी काहीतरी घेऊन येते.

मौनी रॉय मूळची बंगामधी बेहरची आहे. तिच्या घरी सर्व आर्टिस्ट राहिले आहेत. मौनीची आई मुक्ती रॉय देखील थिएटर आर्टिस्ट आहे. त्यामुळे मौनीच्या घरात तुम्हाला आणखी कलात्मक गोष्टी पाहायला मिळतील. मौनीच्या घरात मोठ्या आकाराचे फर्निचर आहे. त्याचा रंग रस्टिक आहे. दुसरीकडे, मौनीने तिच्या घरात जास्त सोनेरी दिवे लावले आहेत.

मौनी जेव्हा घरी असते तेव्हा तिचा बहुतेक वेळ सोफ्यावर बसून जातो. तसे, मौनी रॉय देखील खूप फिटनेस फ्रीक आहे आणि ती योगा करताना फोटो अपलोड करत असते. मौनी रॉय मुख्यतः घरी योगासने करते. तिच्या फ्लॅटची बाल्कनी हे तिचे आवडते योगाचे ठिकाण आहे. मौनीने तिच्या बाल्कनीत काही झाडे आणि रोपेही लावली आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP नेत्यांचा मोठा विजय! आंदोलनाला वेग; अखेर अभिजीत दिपके यांच्यासह तिघांची सुटका, आता सर्वोच्च न्यायालयात काय घडणार?

Navratri 2026 Wishes in Marathi: 'उदे ग अंबे उदे'... नवरात्रीनिमित्त व्हॉट्सॲपवर शेअर करा देवी दुर्गेच्या आशीर्वादाचे हे सुंदर शुभेच्छा संदेश

Maharashtra Live News : सप्तशृंगी देवी यात्रेला सुरुवात,देवीच्या आभूषणांची पूजा

IND vs WI 3rd T20: इंदूरमध्येही आज बॅट विरुद्ध बॅट? दुसऱ्या सामन्यात ५०१ धावांचा पाऊस, आता तिसऱ्या टी-२०मध्येही फलंदाजांचे वर्चस्व राहणार?

Madhya Pradesh: अकराशे विद्यार्थ्यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मोफत चष्मे वाटप; टीबी रुग्णांना ८ किलोची पोषण आहाराची टोपली

SCROLL FOR NEXT