Moushumi Chatterjee news esakal
मनोरंजन

Moushumi Chatterjee : 'मी तुम्हाला काय जया बच्चन वाटले का? तिच्यासारखी...' प्रसिद्ध अभिनेत्री मौसमी चॅटर्जी काय बोलून गेल्या?

मौसमी यांनी जया बच्चन यांचे नाव घेणे आणि त्यावरुन बोलणे हा आता नेटकऱ्यांच्या प्रतिक्रियेचा विषय आहे.

युगंधर ताजणे

Moushumi Chatterjee Take A Dig When Paparazzi : हिंदी चित्रपट विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री मौसमी चॅटर्जी या आता वेगळ्या कारणामुळे चर्चेत आल्या आहे. ८० ते ९० च्या दशकांत आपल्या चित्रपटानं आणि सौंदर्यानं चाहत्यांची पसंती मिळवणाऱ्या मौसमी चॅटर्जी यांनी जया बच्चन यांचे नाव घेतले आणि वेगळ्याच चर्चेला सुरुवात झाली आहे.

जया बच्चन यांना काय म्हटल्या मौसमी चॅटर्जी?

मौसमीजी या एका इव्हेंटमध्ये सहभागी झाल्या होत्या. यावेळी त्यांना कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी फोटोग्राफर्सची लगबग सुरु होती. तेव्हा एकानं त्यांना जया बच्चन असे म्हणून हाक मारली. ते ऐकून मौसमी चॅटर्जी या नाराज झाल्या त्यांनी त्यावर दिलेली प्रतिक्रिया आता व्हिडिओमधून समोर आली आहे. मी जया बच्चनपेक्षा चांगली आहे. खरं तर तुम्ही लोकं आहात म्हणून आम्ही आहोत, तुम्ही नसता तर आम्ही कुठे गेलो असतो. अशा शब्दांत त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

नेमकं घडलं तरी काय?

त्याचं झालं असं की, जया बच्चन या नेहमीच पापाराझ्झींमध्ये वेगवेगळ्या कारणामुळे लोकप्रिय असल्याचे दिसून आले आहे. पापाराझ्झींच्या बोलण्यावर आगपाखड केल्याचे जयाजी यांचे व्हिडिओही व्हायरल झाले आहेत. त्याला नेटकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. जया बच्चन यांनी रागाच्या भरात अनेकदा फोटोग्राफर्सला सुनावल्याचे दिसून आले आहे. फोटोग्राफर्सचा बेशिस्तपणा सहन न करता त्यांना थेट सुनावणाऱ्या सेलिब्रेटींमध्ये जया बच्चन यांचे नाव घ्यावे लागेल.

जया बच्चन यांना नेहमीच त्या कारणामुळे ट्रोल केले जात असल्यानं त्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय असतात. काही दिवसांपूर्वी जयाजी यांनी त्यांची नात नव्या नवेली नंदाच्या पॉडकास्टमध्ये पापाराझ्झी आणि त्यांचे वागणे यावरुन प्रतिक्रिया दिली होती. त्यात त्यांनी म्हटले होते की, पापाराझ्झी हे बऱ्याचदा त्यांची सभ्यतेची पातळी ओलांडतात.त्याचा सेलिब्रेटींना त्रास होतो हे त्यांच्या लक्षात येत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Numerology: स्वतःचेच रील्स पुन्हा पुन्हा पाहतात 'या' मूलांकांचे लोक! पाहा कोणत्या तारखेला जन्मलेले लोक असतात 'सेल्फ लव्हर'...

Sugarcane Crushing Season : १५ ऑक्टोबरपासूनचा गाळप हंगामाचा निर्णय रद्द करावा; विविध संघटनांची साखर आयुक्तांकडे मागणी

Kokan Railway : पाच वर्षांत कोकण रेल्वेवर रोज १०० हून अधिक गाड्या; दुपदरीकरणाला वेग, २२ सप्टेंबरला कोकण रेल्वे होणार कर्जमुक्त

Mumbai High Court : घटस्फोटाच्या निकालाला स्थगिती असताना पत्नीला घराबाहेर काढता येणार नाही; मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश

सिनेसृष्टीला धक्का! 'वेलकम' फेम अभिनेत्याचं वयाच्या ५६व्या वर्षी निधन; 15 दिवसांपासून होते इस्पितळात

SCROLL FOR NEXT