movie bachchan Pandey Jaisalmer set recreated in up for Akshay Kumar film
movie bachchan Pandey Jaisalmer set recreated in up for Akshay Kumar film  
मनोरंजन

'बच्चन पांडेला' बसला झटका, जैसलमेरमधून झाले 'पॅक अप'

सकाळ ऑनलाईन टीम

मुंबई - बिग बजेट असणारा चित्रपट म्हणजे बच्चन पांडेला मोठा झटका बसला आहे. याचे मुख्य कारण म्हणजे या चित्रपटाचे ज्या भागात चित्रिकरण होणार होते तिथून त्यांना पॅक अप करण्यासाठी सांगितले आहे. अशी माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. त्यामुळे या चित्रपटाचे चित्रिकरण युपीत होणार आहे. जानेवारी 2021 मध्ये या जैसेलरमध्ये चित्रिकरण होणार असल्याचे अक्षयनं सांगितले होते. अचानक चित्रिकरणाचे स्थळ हलवण्यामागे काय याचे कारण अद्याप गुलदस्त्यातच आहे.

बच्चन पांडेमध्ये सुपरस्टार अक्षय कुमार प्रमुख भूमिकेत आहे. मागील वर्षी त्याचा लक्ष्मी बॉब हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांकडून मोठा प्रतिसाद मिळाला होता. त्यावरुन अक्षयला मोठ्या वादालाही समोर जावे लागले होते. आता त्याच्या बच्चन पांडे या नव्या चित्रपटाची सर्वांना उत्सुकता आहे. त्याचे चित्रिकरण जानेवारीत सुरु झाले आहे. त्याच्या चित्रिकरणाची सुरुवात जैसलमेरमध्ये चालली होती. मात्र आता ती उत्तर प्रदेशात होणार आहे.

चित्रिकरणाचे स्थळ बदलल्यानं अक्षयच्या फॅन्सनं त्याला त्याबद्दल विचारणा केली आहे. मात्र त्यामागील खरे कारण पुढे आलेले नाही. सध्या अक्षय त्याच्या या नव्या चित्रपटासाठी प्रचंड मेहनत घेतो आहे. आता युपीमध्ये वाळवंट तयार करण्यात येत आहे. त्याचे काही फोटोही सोशल मीडिय़ावर व्हायरल झाले आहेत. यामुळे बच्चन पांडेचे यापुढील चित्रिकरण उत्तर प्रदेशात होणार असल्याचे सांगितले जात आहे. गेल्या काही दिवसांपासून बच्चन पांडेच्या चित्रिकरणाविषयी उलट सुलट चर्चा होती. आता त्याविषयी उलगडा झाला आहे. 

युपीमध्ये आता बच्चन पांडे चित्रपटाचा नवा सेट लागणार आहे. या चित्रपटात अक्षय कुमार, अभिमन्यू सिंह याच्या बरोबर क्रिती सेनन, जॅकलिन फर्नांडिझ, पंकज त्रिपाठी, प्रतिक बब्बर आणि अर्शद वारसी यांचा समावेश आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी अक्षय कुमारच्या बच्चन पांडेचा नवा लूक प्रदर्शित झाला होता. त्याला चाहत्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. या चित्रपटात क्रिती सेनन ही एका पत्रकाराच्या भूमिकेत असून तिला दिग्दर्शक व्हायचे आहे. अक्षयच्या यापुढील चित्रपटांच्या बाबत सांगायचे झाल्यास सूर्यवंशी, पृथ्वीराज आणि रामसेतू सारख्या चित्रपटांमध्ये तो चमकणार आहे. सध्या तो बच्चन पांडेच्या चित्रिकरणात व्यस्त आहे. 
 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT