मनोरंजन

Review : विद्युत जामवालच्या चित्रपटाने डोक्यात येईल 'सनक'

युगंधर ताजणे

अॅक्शन अभिनेता म्हणून विद्युत जामवाल एव्हाना सर्वांना परिचित झाला आहे. त्याच्या त्या लांबवर जाणाऱ्या उड्या, सेकंदामध्ये समोरच्याला गारद करण्याची त्याची ती क्षमता, प्रत्येक चित्रपटामध्ये त्यानं आर्मी किंवा एखाद्या कमांडोचं घेतलेलं प्रशिक्षण हे त्याच्या चाहत्यांना माहिती झालं आहे. सध्या त्याचा सनक नावाचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. यापूर्वी त्याच्या खुदा हाफिजलाही फारसा प्रतिसाद मिळाला नव्हता. त्यामुळे त्याच्या सनककडून फार अपेक्षा चाहत्यांना होत्या. मात्र सनक पाहिल्यानंतर त्या पूर्ण होतील असं अजिबातच वाटत नाही. त्याचं कारण विद्युत जामवालच्या चित्रपटांचा ठरलेला साचा. त्याचे स्टंट सोडून त्या चित्रपटामध्ये दुसरं काहीच घडत नाही. त्यामुळे जेव्हा हा चित्रपट पाहून होतो तेव्हा विद्युतच्या उड्या आणि फायटिंग सीनचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केले असते तरी ते जास्त हिट झाले असते. अशी एक फिलिंग सनक पाहिल्यानंतर येते.

सनक हा नावाप्रमाणेच सनकी आहे. चित्रपटामध्येही सनकीपणा फारसा प्रभावीपणा आलेला नाही. दिग्दर्शक कनिष्क वर्मानं केवळ अॅक्शनपट बनवण्याच्या उद्देशानं हा चित्रपट गोंधळून टाकला आहे. चित्रपटाची सुरुवात विवान (विद्युत जामवाल) आणि त्याची पत्नी रुक्मिणी मित्रा यांच्यातील प्रेम प्रसंगानं होते. तिला एक दुर्धर आजार आहे हे त्यावेळी विवानला कळतं. आणि तो तिला एका हॉस्पिटलमध्ये दाखल करतो. कट टू एका गाडीतून काही अतिरेकी त्या हॉस्पिटलमध्ये चालले आहेत ज्यात विवानची पत्नी दाखल झाली आहे. हॉस्पिटलमध्ये एक व्हीव्हीआयपी उपचारासाठी दाखल होते. पोलीस डॉक्टरांना सांगतात काही करुन त्या माणसाला वाचवायचं, तो पर्यत त्या दहा आतंकवाद्यांनी हॉस्पिटल्सचा ताबा घेतलेला असतो.

विशेष म्हणजे या घटना इतक्या वेगानं घडत असतात की, त्या लोकांना त्या रुग्णालयाची एवढी डिटेल्स माहिती कशी मिळते, आपण ज्या व्यक्तीच्या शोधात त्याठिकाणी चाललो आहोत ती त्याच रुग्णालयामध्ये कशी काय, त्या आतंकवाद्यांची पार्श्वभूमी काय, बरं हे सगळं सोडलं तर विवाननं त्यांच्याविरोधात लढण्यासाठी प्रशिक्षण घेतलं कुठं आणि केव्हा. यासगळ्या प्रश्नांची उत्तर त्या चित्रपटात नाहीत. हे सगळं आपल्याला गृहित धरुन सनक पाहावा लागतो. त्या व्हीव्हीआयपी माणसाला वाचविण्यासाठी रुग्णालय हायजॅक करणं, आणि त्या माणसाला बाहेर काढणं बस्स... एवढ्याच कारणासाठी विद्युत जामवालच्या अॅक्शन स्टंटला पुरेसं आहे. त्याची बायको त्या रुग्णालयात आहे. तिला वाचविण्यासाठी त्याला हे सगळं करावं लागतं. असं हे सगळं आपल्याला पाहावं लागतं. हेच मुळी सगळं पाहताना प्रेक्षकाच्या डोक्यात सणक गेली नाही तर नवल म्हणावं लागेल.

चाणाक्ष पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत असलेल्या नेहा धूपियाचा अभिनय पाहिल्यानंतर ती अधिक काळ बॉलीवूडमध्ये तग का धरु शकली नाही याचं उत्तर मिळून जातं. विवानच्या पत्नीची भूमिका साकारणाऱ्या रुक्मिणीला फारसा वाव मिळालेला नाही. सगळा भाव विद्युत जामवाल खाऊन गेला आहे. त्याच्या स्टंटबाजीला मोकळी वाट करुन देण्यासाठी सनकचा घाट दिग्दर्शकानं घातला की काय असा प्रश्न हा चित्रपट पाहून पडल्याशिवाय राहत नाही. विद्युत जामवालच्या चाहत्यांसाठी त्याची ही सनक आवडेल यात शंका नाही. काही वेगळं म्हणून सनकच्या वाटयाला जाणाऱ्यांना सनकची किक निराश करेल अशी भीती आहे...

रेटिंग - **

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT