sangli sakal
मनोरंजन

Sangli : बहुपडदा चित्रपटगृहे हाउसफुल्ल

साडेनऊ हजार सांगलीकरांनी लुटला आनंद; सवलतीच्या दरावर प्रेक्षकांच्या उड्या

- जयसिंग कुंभार

सांगली : राष्ट्रीय चित्रपट दिनाच्या निमित्ताने काल सुमारे साडेनऊ हजार सांगलीकरांनी चित्रपटांचा आस्वाद घेतला. ‘मल्टिप्लेक्स असोसिएशन ऑफ इंडिया’ने जाहीर केल्याप्रमाणे काल ७५ रुपयांमध्ये चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांनी अभूतपूर्व आगाऊ नोंदणी केली होती. आगाऊ नोंदणीच ७० टक्क्यांहून अधिक झाली होती. प्रदीर्घ काळानंतर चित्रपटाच्या पडद्याने अशी गर्दी अनुभवली.

दरवर्षी १६ सप्टेंबर हा दिवस ‘राष्ट्रीय चित्रपट दिन’ म्हणून पाळण्यात येतो. मात्र यंदा बहुपडदा चित्रपटगृह व्यावसायिकांनी एकत्र येऊन संघटनेच्या माध्यमातून २३ सप्टेंबर हा दिन साजरा करण्याचा निर्णय घेतला. शिवाय, राष्ट्रीय चित्रपट दिनाच्या निमित्ताने प्रेक्षकांना चित्रपटगृहापर्यंत आणण्याचा प्रयत्न म्हणून कोणताही चित्रपट ७५ रुपयांच्या तिकिटात पाहता येईल, अशी घोषणा केली. विविध प्रसारमाध्यमांमधून त्याची भरपूर जाहिरातही झाली होती. सर्वस्तरांतील प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला.

सध्या चर्चेत असलेला ‘ब्रह्मास्त्र’ हा चित्रपट त्रिमितीय (थ्रीडी) रुपातील आहे. त्यासाठीचे चष्मा एरव्ही चाळीस रुपये भाडे आकारून मिळतो. काल मात्र तोही मोफत होता. काल प्रदर्शित होत असलेले ‘चूप’ आणि ‘धोकाझ् राऊंड द कॉर्नर’ हे नवे चित्रपट; तसेच ‘बॉईज थ्री’ हा मराठी असे चारही सिनेमे ७५ रुपयांत पाहता आले. या चित्रपटांसाठी मिळालेला प्रतिसाद अभूतपूर्व असाच होता. दिवसभरात तरुणाई गटागटाने आणि सांगलीकर कुटुंबासह चित्रपटगृहापर्यंत येत होते. रात्रीच सर्व खेळ ‘हाऊसफुल्ल’ गेले. स्वरूप आणि समर्थ या चित्रपटगृहांकडे काल आठ शोंसाठी फक्त पाचशे प्रेक्षकच फिरकले होते.

प्रेक्षकांविना’ चित्रपटाचे अर्थकारण

कोरोनाच्या टाळेबंदीनंतरही चित्रपटांकडे प्रेक्षक फिरकता दिसत नाही. मोठमोठ्या बॅनरचे बहुचर्चित कोटी-कोटी खर्चाचे चित्रपट धडाधड कोसळत आहेत, तरीही निर्माते एवढा खर्च कसा करतात? मग त्यांची कमाई होते कशी? चित्रपटांचे चित्रपटगृहाबाहेरच्या प्रदर्शनाचे अधिकार, संगीत प्रदर्शनाचे अधिकार, दूरचित्रवाणी वाहिन्यांवरील प्रदर्शनाचे अधिकार यातून निर्माते बऱ्यापैकी कमाई करतात. आता ‘ओटीटी’ प्लॅटफॉर्म चित्रपट क्षेत्राच्या उत्पन्नातील मोठा आधार ठरला आहे. अनेक ‘ओटीटी’ प्लॅटफॉर्म असे बिगबजेट सिनेमे आपल्याकडेच पहिल्यांदा प्रदर्शित व्हावेत, यासाठी आग्रही असतात. वारंवार प्रदर्शनातूनही एखाद्या चित्रपटाने प्रेक्षकांची पकड घेतल्याची उदाहरणे आहेत. ‘ओटीटी’ स्मार्ट सिनेमे चित्रपटगृहातील कमाईचा फारसा विचार करीत नाहीत. लो बजेटमध्ये हे चित्रपट चांगली कमाई करून जातात. देश-विदेशातील चित्रपटगृहांची कमाई, ‘ओटीटी’, टीव्हीचे अधिकार, संगीत, रिमेकचे अधिकार अशा कमाईचा शाखाविस्तार झाला आहे.

अलीकडे चित्रपटांमधूनच ‘इनबिल्ट’ अशी जाहिरात केली जाते. जसे - ज्वेलरी, माध्यम, वेशभूषा, खाद्यपदार्थाचे प्रायोजक चित्रपटांसाठी असतात. त्यातून होणारी जाहिरात आणि कमाई कोणाच्या लक्षातही येत नाही. चित्रपटाचे चित्रपटगृहांवरील यश आजही महत्त्वाचे असते. तिथे यश मिळाले की कमाईच्या अन्य विविध शाखांची कमाई कैक पटीने वाढते. एकूण कमाईत बॉक्स ऑफिसवर सुमारे पन्नास टक्के, डिजिटल अधिकारातून २० ते ३० टक्के, संगीत हक्कातून सुमारे दहा टक्के आणि उपग्रह प्रक्षेपणातून काही टक्के असे उत्पन्नाचे स्रोत असतात. या सर्व उत्पन्नस्रोताचे एकमेकांवर परिणाम होतात; ते एकमेकाला पूरक ठरतात. यात चित्रपटगृह मालक फक्त निश्‍चित वार्षिक भाड्याचे वाटेकरी उरले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sindhudurg Heritage : दोनशे वर्षांपूर्वीची ब्रिटिशकालीन दोन स्मारके तोडली, मालवणमधील राजकोट किल्ल्याजवळची घटना

पेशव्यांना होतं पैठणीचं आकर्षण! सोळा हात लांब, तीन किलो वजन; शुद्ध सोन्याच्या जरीची पेशवेकालीन पैठणी कशी होती?

Latest Marathi News Live Update : कुडाळ मालवण रस्त्यावर पडलेल्या खड्ड्याच्या निषेधार्थ बैलगाडी आंदोलन

Shashikant Shinde: पोलिसांविरोधात आमदार शशिकांत शिंदे आक्रमक; कोरेगावात मोर्चा; बैठकीबाबतचे पत्र दोन दिवसांत द्यावे, नेमंक काय प्रकरण..

Devendra Fadnavis : कुंभमेळ्याच्या तयारीला वेग! ७ नोव्हेंबरला मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते ७ हजार कोटींच्या कामांचे भूमिपूजन

SCROLL FOR NEXT