Makrand Anaspure  sakal
मनोरंजन

Satara : "राज्यकर्ते विलासकाकांसारखे का वागत नाहीत ?" ; मकरंद अनासपुरेंची खंत

खासदार पाटील म्हणाले, विलासकाकांनी या भागात मोठे काम केले. मकरंद अनासपुरे यांनीही नामच्या माध्यमातुन नाना पाटेकरांच्या सहकार्याने आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांना, त्यांच्या विधवा पत्नींना दिलासा दिला आहे.

हेमंत पवार

कऱ्हाड - विलासकाकांनी पाण्यासंदर्भात केलेले काम मी पाहिले. देशातील पहिला नदीजोड प्रकल्प काकांनी साकारला. माणुस जन्माला का आला ? याचा शोध तो आयुष्यभर घेतो. काही मोजकीच माणसे असतात ते त्यांचे काम करुन जातात आणि नाव मागे ठेवतात.

त्यात काकांचे नाव घ्यावेच लागेल. ज्या परिसरात फक्त कुसळे उगवायची त्यांच्या कल्याणासाठी राजकीय कारकिर्द अविरतपणे वापरणाऱ्या विलासकाकांसारखे राज्यकर्ते जेथे आहे, त्या परिसराचे सोनं झाले आहे.

सर्वच राज्यकर्ते विलास काकांसारखे का वागत नाहीत ? हा प्रश्न पडतो अशी खंत प्रसिध्द अभिनेते आणि नाम फाऊंडेशनचे प्रमुख मकरंद अनासपुरे यांनी व्यक्त केली. \

उंडाळे (जि.सातारा) येथील स्वातंत्र्य सैनिक दादा उंडाळकर स्मारक समितीच्यावतीने स्वातंत्र्यवीर दादा उंडाळकर यांच्या ४९ व्या स्मृतीदिनी आज यंदाचा स्वातंत्र्यवीर दादा उंडाळकर सामाजिक पुरस्कार अनासपुरे यांना खासदार श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

त्याप्रसंगी ते बोलत होते. समितीचे विश्वस्त अ‍ॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर, व्यवस्थापकीय विश्वस्त प्रा.गणपतराव कणसे, अॅड. विजयसिंह पाटील आदी उपस्थित होते. पुरस्काराची ५१ हजारांची रक्कम नाम फाऊंडेशनला देत असल्याचे जाहीर करुन श्री. अनासपुरे म्हणाले, विलासकाकांनी उंडाळे भागात केलेल्या पाण्यासंदर्भातील कामे मी पाहिली.

राजकीय नेते असे का वागत नाही हा प्रश्नच आहे. उंडाळकरांच्या तीन पिढ्या कार्यरत आहेत. यापुढेही त्यांच्याकडून ही सेवा घडावी. दादा उंडाळकर यांच्या नावाने दिलेला पुरस्कार हा माझा एकट्याचा नसून तो मला घडवणाऱ्या, मला ज्यांनी उभे केले त्या सर्वांचा आहे.

ज्या भागातून आपण आलो आहोत, त्यांची वेदना वाढत चालली आहे, त्या जाणीवेतुन नाम फाऊंडेशनची स्थापना केली. त्याला आता चळवळीचे रुप आले आहे. अनेकांची दुःख दूर करण्यासाठी आम्ही काम सुरु करुन अनेकांना मदत करत आहोत. त्या कामाचा मोठा आनंद आहे.

खासदार पाटील म्हणाले, विलासकाकांनी या भागात मोठे काम केले. मकरंद अनासपुरे यांनीही नामच्या माध्यमातुन नाना पाटेकरांच्या सहकार्याने आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांना, त्यांच्या विधवा पत्नींना दिलासा दिला आहे.

त्यांचे हे काम अविरत पुढे सुरु रहावे. त्यांना माझ्या हातुन पुरस्कार प्रदान करता आला याचा मला अभिमान आहे. अॅड. उदयसिंह पाटील यांनी प्रास्तविक केले. प्रा. कणसे यांनी मानपत्राचे वाचन केले. प्रा. थोरात यांनी सूत्रसंचालन केले. महादेव ठाकर यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video : अमेरिका पाकिस्तानला मदत का करते? माजी CIA एजंटकडून स्वत:च्याच सरकारची पोलखोल; देशाला हादरवणारी माहिती समोर...

Divyang Niradhar Yojana: मोठी घोषणा! निराधार लाभार्थींना आता मिळणार महिन्याला 2500 रुपये; वाचा काय आहेत अटी?

Latest Marathi News Live Update: महसूल अधिकाऱ्यांच्या संगनमतामुळे बिलोली तालुक्यात अवैध वाळू तस्करीचा आरोप

Brazil Drug Bust : ट्रकच्या टायरमध्ये लपवला होता ३५० कोटींचा माल, चाणाक्ष कुत्र्यामुळे मोठे रॅकेट उघड, नेमकं काय घडलं?

राज्यात वीज दर कमी होणार, मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा; कर्जमाफीवरही बोलले

SCROLL FOR NEXT