Victoria Movie : "आई म्हणून तुझा अभिमान", मृणालने केलं लेक विराजसचं कौतुक SAKAL
मनोरंजन

Victoria Movie : "आई म्हणून तुझा अभिमान", मृणालने केलं लेक विराजसचं कौतुक

विराजस कुलकर्णी दिग्दर्शत 'विक्टोरिया' सिनेमा १३ जानेवारीला रिलीज झालाय.

सकाळ डिजिटल टीम

विराजस कुलकर्णी दिग्दर्शत 'विक्टोरिया' सिनेमा १३ जानेवारीला रिलीज झालाय. मराठीतला सस्पेन्स थ्रिलर सिनेमा म्हणून या सिनेमाची ओळख आहे. प्रेक्षकांना या सिनेमाची उत्सुकता होती. विराजसने विक्टोरिया च्या माध्यमातून दिग्दर्शक म्हणून मराठी इंडस्ट्रीत पदार्पण केलंय. यानिमिताने विराजसची आई अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांनी सिनेमा पाहून लाडक्या लेकाचं सोशल मीडियावर कौतूक केलंय.

मृणाल यांनी त्यांचे पती रुचिर यांच्यासोबतचा एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केलाय. हा फोटो पोस्ट करून मृणाल लिहितात, "आई बाबा म्हणून तुझा अभिमान! विराजसची पहिली फिचर फिल्म! मराठी सिनेसृष्टीमधला नवीन प्रवाह! अप्रतिम कथा, दिग्दर्शन, अभिनय, छायांकन आणि पार्श्वसंगीत! घाबरण्याचे धाडस करणार्‍या लोकांचं मन हा सिनेमा जिंकेल!! आता थिएटरमध्ये जाऊन बघा!!", अशा शब्दात मृणाल यांनी लाडक्या लेकाचं कौतुक केलंय.

मृणाल कुलकर्णी अनेकदा विराजसचं कौतुक करताना दिसतात. विराजस आणि मृणाल यांचे धम्माल फोटो आणि विडिओ सोशल मीडियावर अनेकदा धुमाकूळ घालत असतात. कधी मृणाल सोशल मीडियाच्या माध्यमातून विराजसची मिश्किल बाजूही सर्वांना दाखवतात. याशिवाय विराजसची बायको म्हणजेच सून शिवानी सोबत सुद्धा मृणाल यांचं प्रेमळ नातं पाहायला मिळतं.

'माझा होशील ना' मालिकेतून विराजस हे कुलकर्णी हे नाव घराघरात पोहोचलं. याआधी विराजसने अनेक मराठी सिनेमांमधून काम केलंय. पण विराजसला खरी ओळख मिळाली माझा होशील ना मालिकेतील 'आदीत्य'च्या भूमिकेमुळे. विक्टोरिया हा सिनेमा विराजसचा दिग्दर्शक म्हणून पहिला सिनेमा असला तरी याआधी आईसोबत विराजसने असिस्टंट दिग्दर्शक म्हणून काम केलंय.

विराजसने काहीच महिन्यांपूर्वी गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री शिवानी रांगोळे सोबत लग्न केलं. विराजसचा दिग्दर्शक म्हणून पहिला सिनेमा असलेला 'विक्टोरिया' १३ जानेवारीला प्रदर्शित झालाय. सिनेमात सोनाली कुलकर्णी, आशय कुलकर्णी, पुष्कर जोग अशा कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! सततच्या पावसामुळे नुकसान झाले तरच शेतकऱ्यांना मिळणार भरपाई; सततचा पाऊस म्हणजे काय?, सोलापुरातील ‘या’ ३ तालुक्यातच अतिवृष्टी झाल्याची नोंद

दैव की कर्म?

आजचे राशिभविष्य - 24 ऑगस्ट 2025

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 24 ऑगस्ट 2025

टेबल टेनिसमध्ये भारताला ऑलिंपिक पदकाची आशा

SCROLL FOR NEXT