Mrinal Kulkarni's son Virajas Kulkarni
मनोरंजन

Mrinal Kulkarni: लाडक्या लेकाला वाढदिवसाच्या दिल्या भरभरून शुभेच्छा

सकाळ डिजिटल टीम

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे मृणाल कुलकर्णी. विशेष म्हणजे त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत त्यांचा लेक विराजस कुलकर्णी यांनेदेखील मराठी कलाविश्वात पदार्पण केलं. परंतु, विराजस अनेकदा त्याच्या प्रोफेशनल लाइफपेक्षा पर्सनल लाइफमुळे चर्चेत येत असतो.

गेल्या कित्येक काळापासून विराजस (Virajas Kulkarni) अभिनेत्री शिवानी रांगोळेला डेट करत असल्याचं साऱ्यांनाच ठावूक होतं. अलिकडेच या दोघांचा साखरपुडादेखील पार पडला. दोघांनीही इन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट करत त्यांच्या साखरपुड्याची माहिती चाहत्यांना दिली होती. त्यानंतर त्यांनी व्हॅलेंटाइन डे (Valentine Day) निमित्त आणखी एक रोमॅण्टिक फोटो शेअर केला आहे. दोघेही एकमेकांसोबत अनेकदा सोशल मिडीयावर फोटो शेअर करताना दिसतात. (Mrinal Kulkarni special post on son Virajas Kulakrni's Birthday)

आज त्याचा वाढदिवस असल्या कारणाने, आईने आणि शिवानीने (Shivani Rangole) त्याला शुभेच्छा देत सोशल मिडीयावर त्याचे फोटो आणि व्हिडीओ शेअर केले. मृणाल कुलकर्णीने (Mrinal Kulkarni) त्याला एक खास पत्र लिहिले. ती म्हणाली, ''प्रिय विराजस, अनेक वर्ष मी आणि तुझे बाबा तुझ्या या वाढदिवसाची वाट पहात होतो ..कारण काहीही ठरवायचं असलं तरी २०२२ फेब्रुवारी नंतर असं च तुझं उत्तर असायचं .. बरं झालं या तारखेआधीच तू काही गोष्टी ठरवून टाकल्यास, विशेषतः लग्न. तू काही महत्त्वाच्या गोष्टी पूर्ण करतो आहेस म्हणजे तुझे नवीन नाटक आणि तुझा पहिला चित्रपट. आता या वाढदिवसा पासूनच्या वर्षात अनेक वेगळ्या गोष्टी घडतील .. आयुष्यात अनेक सुंदर बदल होतील ..लग्न होईल, जबाबदारीही वाढेल ..आम्हाला खात्री आहे की या नव्या पर्वात ही तू नेहेमीच्या आत्मविश्वास आणि तळमळीने काम करशील .मेहेनती आणि समजूतदार तर तू आहेसच त्यामुळे आम्हाला तुझे कौतुक आहे आणि खात्रीही ! छान रहा ..काळजी घे ! तुझ्या आयुष्यातल्या या महत्वपूर्ण वर्षा साठी तुला खूप शुभेच्छा आणि प्रेम.-आई बाबा. तू नसताना तुझी खोली लख्ख आवरण्याची संधी मी आजही सोडलेली नाही .. मानसिक तयारी नी ये !!" तसेच त्याची गर्लफ्रेंड शिवानीने सुद्धा व्हिडीओ शेअर करत आपले प्रेम व्यक्त केले.

शिवानी 'बनमस्का', 'सांग तू आहेस ना', 'डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महामानवाची गौरव गाथा' यांसारख्या मालिकांमध्ये झळकली आहे. तर, विराजस अभिनेता असण्यासोबतच दिग्दर्शकही आहे. त्याने 'मिकी', 'डावीकडून चौथी बिल्डिंग', 'भंवर' या नाटकांचं लेखन आणि दिग्दर्शन केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 3rd Test: बुमराहशी जो नडला, त्याला आम्ही गाडला! शुभमन गिल अन् झॅक क्रॉली यांच्यात बाचाबाची, काय घडलं? Video

IND vs ENG 3rd Test: भारताकडे '०' धावांची आघाडी; ११ धावांत गमावले ४ बळी, कसोटीत असे केव्हा घडले अन् निकाल काय लागला होता?

Sanjay Gaikwad Imtiaz Jaleel Clash: ‘’तुला तर असं मारेन..असं मारेन की, परत तू...’’ ; संजय गायकवाडांनी आता इम्तियाज जलील यांना भरला दम!

'मला भारताकडून पुन्हा कसोटी क्रिकेट खेळायचे आहे'; अजिंक्य रहाणेची मन की बात! इंग्लंडमधून निवड समितीला पाठवला मॅसेज

IND vs ENG 3rd Test: भारताने ५० वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला! रवींद्र जडेजा थेट गॅरी सोबर्स यांच्या पंक्तीत बसला, जगात दोघंच खेळाडू असे करू शकलेत

SCROLL FOR NEXT