Mrunal Thakur Esakal
मनोरंजन

Cannes 2023: सर्वांची लाडकी 'सीता' करणार कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये पदार्पण! म्हणाली, 'ग्लोबल फिल्ममेकरसोबत...'

Vaishali Patil

भारतीय चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाच्या जोरावर वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री मृणाल ठाकूर ही नेहमीच चर्चेत असते. मृणाल ठाकूरला तिच्या शेवटच्या 'सीता रामम' चित्रपटानंतर मोठी लोकप्रियता मिळाली.

दक्षिण भारतातील अनेक चित्रपट निर्माते तिला त्यांच्या चित्रपटांमध्ये कास्ट करण्यास उत्सुक आहेत. सध्या ती साऊथ सिनेसृष्टीतील सुपरस्टार नानीसोबत एक चित्रपट करत आहे. अभिनेत्री तिच्या उत्कृष्ट अभिनय कौशल्याने प्रेक्षकांना प्रभावित करते.

आता मृणालच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. ती फ्रान्समधील कान्स येथे सुरू झालेल्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये ती भव्य पदार्पण करत भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे.

मृणाल नेहमीच तिच्या फॅशनमुळे सर्वांचे लक्ष वेधुन घेते. तिची स्टाईल चाहत्यांनी भुरळ पाडत असते. मृणाल तिच्या कान्स पदार्पणासाठी उत्सुक आहे

ती 17 मे ते 19 मे दरम्यान फ्रेंच रिवेरामध्ये असेल. या प्रसिद्ध चित्रपट महोत्सवात पदार्पण केल्याबद्दल मृणाल किती उत्सूक आहे याचा आनंद तिने व्यक्त केला.

तिच्या पदार्पणाबद्दल बोलताना मृणालने सांगितले की, "कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये पहिल्यांदाच सहभागी होताना मला खूप आनंद झाला आहे. मी जागतिक चित्रपट निर्मात्यांशी संवाद साधण्यासाठी खुप उत्सूक आहे. नवीन संधी शोधण्यासाठी आणि भारतीय सिनेमाची प्रतिभा दाखवण्यासाठी उत्सुक आहे "

मृणालच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झालं तर ती शेवटची आदित्य रॉय कपूरसोबत गुमराहमध्ये दिसली होती. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली नाही. मात्र तिच्या अभिनयाची प्रेक्षक आणि समीक्षकांनी खूप प्रशंसा केली.

ती मोठ्या साउथ प्रोजेक्ट नानी 30 ची शुटिंग करत आहे. हुमा कुरेशीसोबत तिची 'पूजा मेरी जान' देखील आहे.

हा चित्रपट नवज्योत गुलाटी यांनी दिग्दर्शित केला आहे आणि मॅडॉक फिल्म्सचे दिनेश विजन आणि अमर कौशिक निर्मित आहेत. तो या वर्षाच्या अखेरीस प्रदर्शित होईल.

मृणाल इशान खट्टरसोबत 'पिप्पा'मध्येही दिसेल. ती अंगद बेदीसोबत 'लस्ट स्टोरीज 2' मध्येही दिसणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CSK vs PBKS: ऋतुराज गायकवाडने चेन्नईच्या सलग दुसऱ्या पराभवासाठी कोणाला धरलं जबाबदार? म्हणाला, 'कधी कधी आमच्याकडून...'

Nashik Dindori accident : नाशिक येथील दिंडोरी अपघातातील एकाच कुटुंबातील ९ मृतांची नावे समोर, क्रेनने काढले मृतदेह बाहेर

Farmer Death News : काळीज पिळवटून टाकणारी घटना! शेतात काम करताना अंगावर वीज पडली; 50 वर्षीय शेतकऱ्याचा जागीच मृत्यू

Maharashtra Weather Alert Today : पुढील 24 तास अत्यंत महत्त्वाचे! महाराष्ट्रातील 'या' 11 जिल्ह्यांना वादळी पावसाचा इशारा, हवामान विभागाचा Yellow Alert जारी

Latest Marathi News Live Update : रिक्षा चालकांवर दुहेरी आर्थिक संकट, गॅसदरवाढ आणि तुटवड्याने जगणं कठीण

SCROLL FOR NEXT