Mrunal Thakur  Sakal
मनोरंजन

Mrunal Thakur: मृणालचं झालं ब्रेकअप? रडत फोटो शेअर करत म्हणाली...

Latest Marathi News: मृणाल ठाकूरचा एक लेटेस्ट फोटो सोशल मीडियावर समोर आला आहे, ज्यामध्ये मृणाल ठाकूर रडताना दिसत आहे.

सकाळ डिजिटल टीम

Mrunal Thakur News: बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री मृणाल ठाकूर ही कोणत्याही वेगळ्या ओळखीवर अवलंबून नाही. छोट्या पडद्यापासून ते मोठ्या पडद्यापर्यंत आपल्या दमदार अभिनयामुळे मृणाल ठाकूरने स्वतःसाठी एक खास स्थान निर्माण केले आहे.

दरम्यान, मृणाल ठाकूरचा एक लेटेस्ट फोटो सोशल मीडियावर समोर आला आहे, ज्यामध्ये मृणाल ठाकूर रडताना दिसत आहे. मृणाल ठाकूरने या फोटोद्वारे आपली व्यथा मांडली आहे.

मंगळवारी, मृणाल ठाकूरने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर स्टोरीमध्ये एक लेटेस्ट फोटो शेअर केला. मृणाल ठाकूरच्या या इन्स्टा स्टोरी फोटोमध्ये ती रडताना दिसत आहे.

या फोटोसोबत मृणाल ठाकूरने लिहिले आहे की- 'कालचा दिवस कठीण होता, पण आज मी अधिक मजबूत, समजदार आणि आनंदी आहे, प्रत्येकाच्या कथांची अनेक पाने आहेत, परंतु प्रत्येकजण त्या मोठ्याने वाचत नाही, पण मी माझ्या कथेची पाने मोठ्याने वाचणे निवडत आहे".

अशाप्रकारे मृणाल ठाकूरने मनातील गोष्ट सांगितली आहे. मात्र, या फोटोनंतर लगेचच मृणाल ठाकूरनेही इन्स्टा स्टोरीमध्ये एक व्हिडिओ अपलोड केला आहे, ज्यामध्ये ती म्हणताना दिसत आहे की- "काल मला खूप वेगळं आणि असहाय्य वाटत होते. पण आज मी खूप आनंदी आहे".

mrunal thakur

अलीकडेच मृणाल ठाकूर सुपरस्टार अक्षय कुमार आणि इमरान हाश्मी यांच्या 'सेल्फी' चित्रपटातील 'कुडिए तेरी बाइव'मध्ये दिसली होती. आगामी काळात मृणाल ठाकूर बॉलिवूड अभिनेता आदित्य रॉय कपूरसोबत 'गुमराह' चित्रपटात दिसणार आहे. मृणालचा हा चित्रपट ७ एप्रिल रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT