MTV Hustle 03 Esakal
मनोरंजन

MTV Hustle 03 Winner: वयाच्या 18 व्या वर्षी दिल्लीचा रॅपर उदय ठरला 'Hustle 03' चा विजेता!

दिल्लीस्थित रॅपर उदय पांधी याने MTV Hustle 03 Representativeची ट्रॉफी जिंकली आहे

Vaishali Patil

भारतातील रॅप रिअॅलिटी टीव्ही शो 'MTV Hustle 03 Represent' गेल्या तीन महिन्यांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत होता. रविवारी अखेर या शोला त्याचा विजेता मिळाला आहे. दिल्लीच्या उदय पांधीने 'MTV Hustle 03 Represent'च्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं आहे.

दिल्लीतील 18 वर्षीय रॅपर उदयने या संगीत रिअॅलिटी शोची ट्रॉफी जिंकली यासह तो सर्वात तरुण विजेता ठरला आहे. MTV हसलच्या विजेता उदयला 10 लाख रुपयांचे रोख पारितोषिक आणि 2.5 लाख रुपयांचे प्रायोजित सामान मिळाले आहे.

या शोचा विजेता उदय पांधी हा एक प्रतिभावान रॅपर आहे. उदय त्याच्या 'बॅटल रॅप'साठी ओळखला जातो. उदय पांधीने आपल्या देसी हिप-हॉपने सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे. उदय गेल्या 9 वर्षांपासून दिल्लीत रॅप करत आहे.

'MTV Hustle 03 Represent' च्या ग्रँड फिनालेमध्ये, उदयला बासिक आणि 100 आरबीएचने चांगलीच टक्कर दिली होती. बासिक हा फर्स्ट रनर अप ठरला तर 100 आरबीएचला सेकंड रनर अप घोषित करण्यात आले.

जिंकल्यानंतर उदय पांधी प्रतिक्रिया देत सर्वांचे आभार मानले त्याने सांगीतले, 'MTV Hustle 03' हे एका व्यासपीठापेक्षा जास्त आहे. शिकण्याची, कठोर परिश्रम करण्याची आणि प्रयोग करण्याची ही एक संधी आहे.

पुढे तो म्हणाला, या शोचा एक भाग झाल्यामुळे मी स्वत:ला भाग्यवान समजतो, ज्याने मला पुढे जाण्याचा मार्ग दाखवला आणि एक कलाकार म्हणून लोकांना माझी ओळख करून दिली. माझे बॉस, डी एमसी यांनी मला खूप पाठिंबा दिला आहे. या शोची ट्रॉफी जिंकणं हे एखाद्या स्वप्नासारखे आहे आणि या सन्मानाने मी खुप भारावलो आहे.

तर बादशाह म्हणाला, 'आम्हाला MTV Hustle 03 Represent मध्ये हिरे मिळाले आहेत. उदयला जिंकताना पाहून मला खूप आनंद झाला. तो यासाठी पात्र असतो. या स्टेजवर पोहोचलेल्या प्रत्येक स्पर्धकाचा मला अभिमान आहे. 'MTV Hustle 03 Reprise' 21 ऑक्टोबर 2023 रोजी प्रीमियर होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND, 4th Test: शुबमन गिल खऱ्या अर्थानं ठरतोय प्रिन्स? 'हा' पराक्रम करणारा पहिलाच आशियाई; विराटचाही विक्रम मोडला

NASA layoffs: आता ‘नासा’मध्येही मोठी कर्मचारी कपात; ‘ट्रम्प कार्ड’चा फटका!

ENG vs IND, 4th Test: राहुल - गिलची शतकाकडे वाटचाल, तरी इंग्लंडकडे चौथ्या दिवसअखेर मोठी आघाडी; पाचवा दिवस निर्णायक

Harshwardhan Sapkal : सरकार व पालकमंत्री झोपा काढत होते का?

Ajit Pawar: ''मंत्रिपदासाठी माझी जात आडवी येतेय! 'राष्ट्रवादी'ने मराठ्यांचा फक्त वापर केला'', अजित पवारांच्या आमदाराकडून घरचा आहेर

SCROLL FOR NEXT