Anant Radhika Roka esakal
मनोरंजन

Anant Radhika Roka: कोण आहेत अंबानी कुटूंबाच्या धाकट्या सुनबाई? अनंतचं लवकरच शुभमंगल!

देशातील प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानींचा धाकटा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा रोका आज दणक्यात पार पडला आहे.

सकाळ डिजिटल टीम

Anant Radhika Roka: देशातील प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानींचा धाकटा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा रोका आज दणक्यात पार पडला आहे. यावेळी देशभरातील वेगवेगळ्या क्षेत्रातील सेलिब्रेटी हजर होते. बॉलीवूडच्या काही सेलिब्रेटींनी देखील यावेळी हजेरी लावली होती.

गेल्या काही दिवसांपासून मुकेश अंबानी यांच्या अनंत आणि विरेन मर्चंट यांच्या राधिकाच्या लग्नाची चर्चा सुरु आहे. ते लहानपणापासून एकमेकांचे मित्र आहेत. सोशल मीडियावर तर आता त्यांच्या रोकाच्या फोटोंनी नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहेत. प्रसिद्ध श्रीनाथजी मंदिरात त्यांचा रोका पार पडला आहे. मात्र यासगळयात राधिका- अनंत केव्हा विवाहबद्ध होणार याची माहिती समोर आलेली नाही.

Also Read - जोखमीचे भान राखूनच करा SIP मध्ये गुंतवणूक

अंबानींच्या घरात सध्या उत्साहाचे वातावरण आहे. धाकट्या अनंतचा रोका सोहळा अनेकांसाठी चर्चेचा आणि उत्सुकतेचा विषय होता. अखेर अनंतचा रोका झाला आहे. त्याचे फोटो नेटकऱ्यांच्या प्रतिक्रियेचा खास विषय झालेला दिसतो आहे. नेटकऱ्यांनी अनंत आणि राधिकाला शुभेच्छा दिल्या आहेत. अंबानींच्या धाकट्या सुनबाईविषयी अनेकांना कमालीची उत्सुकता आहे. त्या कोण आहेत हे जाणून घेण्याचा नेटकऱ्यांनी प्रयत्न केला आहे.

कोण आहे राधिका मर्चंट?

राधिका ही विरेन मर्चंट यांची मुलगी आहे. विरेन हे एका हेल्थकेअरचे सीइओ आहेत. राधिकानं पॉलिटिक्स आणि इकोनॉमिक्समध्ये ग्रँज्युएशन केले आहे. २०१७ मध्ये तिनं इसप्रावा टीममध्ये एक सेल्स एक्झुकेटिव्ह म्हणून काम केले होते. राधिका ही तिच्या सौंदर्यासाठीही प्रसिद्ध आहे. याशिवाय तिला वाचन, ट्रेकिंग, स्विमिंगची आवड आहे. राधिका आणि अनंत हे लहानपणापासूनचे मित्र आहेत. २०१८ मध्ये पहिल्यांदा त्यांचा एक फोटो व्हायरल झाला होता.

राधिका ही क्लासिकल डान्सरही आहे. काही दिवसांपूर्वी तिचा अरंगेत्रमचा कार्यक्रम पार पडला होता. त्यावेळी अंबानी कुटूंबीयही उपस्थित होते. तेव्हापासून राधिका चर्चेत आली होती. २०१९ मध्ये राधिका आणि अनंतचा साखरपुडा झाला आहे. असं म्हटलं जातं. मात्र त्याविषयी त्यांनी कोणतीही वाच्यता केलेली नाही. राधिकाचे वडील विरेन मर्चंट हे अंबानींचे चांगले मित्र आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नरेंद्र मोदींचा नेपाळच्या पंतप्रधानांना फोन! भारतीय नागरिकांच्या मदतीसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी

Pharmacy Direct Second Year: फार्मसी थेट द्वितीय वर्ष प्रवेशाची तिसरी यादी जाहीर; १२०८ विद्यार्थ्यांना संधी, ९४१ जणांना पसंतीचे महाविद्यालय

ICC Test Ranking मध्ये उलथापालथ! बुमराहचं वर्चस्व संपलं, ऑस्ट्रेलियन दिग्गजाने हिसकावली नंबर-१ची खुर्ची

IND vs SL, 2nd Test, 4th Day: श्रीलंकेला आघाडी घेण्यात यश, पण भारताची सामन्यावर मजबूत पकड; सूरियाबंदाराचं शतक हुकलं

Narali Purnima 2026: नारळी पौर्णिमेच्या दिवशी श्रीफळाचा 'हा' उपाय करा; मनातील २ महत्त्वाच्या इच्छा होतील पूर्ण!

SCROLL FOR NEXT