Mukesh Chhabra's mother passes away sakal
मनोरंजन

Mukesh Chhabra Mother: बॉलीवुडमधील प्रसिद्ध कास्टिंग डिरेक्टर मुकेश छाबरा यांच्या आईचे निधन..

७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास..

नीलेश अडसूळ

Mukesh Chhabra: अनेक दिग्गजांच्या मांदियाळीत असणाऱ्या आणि अचूक चेहरा शोधून अनेकांसाठी बॉलीवुडचे दार खुलं करणाऱ्या सुप्रसिद्ध कास्टिंग डिरेक्टर मुकेश छाबरा यांच्या आईचे काल गुरुवारी १३ एप्रिल रोजी निधन झाले आहे.

कमला छाबरा असे त्यांचे नाव असून त्यांनी ७० व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. कमला छाबरा यांच्यावर मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात उपचार सुरू होते. पण अखेर रुग्णालयातच त्यांची प्राणज्योत मालवली.

आज शुक्रवार १४ एप्रिल रोजी त्यांच्या आईवर मुंबईतील ओशिवरा येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. छाबरा यांच्या आईच्या निधनाची बातमी कळताच फराह खान, दीपिका पदुकोण, अपारशक्ती खुराना आणि नुपूर सेनन यांसारखे अनेकनेक कलाकार रुग्णालयात दाखल झाले होते. सर्व कलाकार मुकेश यांना सावरण्याचा प्रयत्न करत होते.
(Mukesh Chhabra's mother passed away)

मुकेश छाबरा हे बॉलिवूडमधील एक मोठं नाव. त्यांनी अनेक बड्या सिनेमांसाठी कास्टिंग डिरेक्टर म्हणून काम केले आहे. आहेत. सलमान खानचा ‘बजरंगी भाईजान’, ‘ट्यूबलाइट’, ‘कीक’ असे अनेक चित्रपट छाबरा यांनी केले आहेत. गेली १३ वर्षं ते सलमान खानसाठी काम करत आहेत. केवळ सलमानच नाही तर शाहरुख खानसह अनेक प्रसिद्ध सेलिब्रिटींच्या चित्रपटांसाठी कास्टिंग केले आहे.

याशिवाय मुकेश यांनी सलमानच्या आगामी ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटासाठीदेखील कास्टिंग डायरेक्टर म्हणून काम केलं आहे. त्यांनी ‘दिल बेचारा’ या चित्रपटाद्वारे दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केल होतं. सुशांत सिंह राजपूतचा हा शेवटचा चित्रपट होता.

छाबरा आणि अनेक कलाकारांना मोठमोठ्या संधी मिळवून दिल्या आहेत. त्यामुळे सर्व कलाकारांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. म्हणूनच यांच्या आईच्या निधनाची बातमी समजताच सर्व कलाकार तातडीने रुग्णालयात दाखल झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chandrashekhar Bawankule : मुख्यमंत्री फडणवीस केंद्रीय मंत्री तर बावनकुळे मुख्यमंत्री? स्वत: मंत्री बावनकुळेंनींच दिलं स्पष्टीकरण

NGO साठी सुवर्णसंधी! HCL Foundation देणार 24 कोटी रुपयांचे अनुदान; अर्ज प्रक्रिया सुरू, पाहा सविस्तर

Horoscope : उद्या बनतोय दुर्मिळ दशकीर्ती योग! 'या' 5 राशी होणार मालमाल; करिअर-व्यवसायात भरभराट, आरोग्याची मोठी समस्या होणार दूर

शाहरुखने खरेदी केलं दिल्लीतील 'ते' घर, जिथं किंग खानने गौरीसोबत अनुभवला स्ट्रगल काळ, कोट्यवधींमध्ये झाली डील

Latest Marathi News Update : फिरोज शेख यांचे मेहुणे अन्वर खाजा बाऊददीन यांनी आरोप फेटाळले

SCROLL FOR NEXT