Mukesh Khanna Birthday esakal
मनोरंजन

Mukesh Khanna : 'तुम्ही लग्न का नाही केलं'? शक्तिमाननं दिलेलं उत्तर ऐकून तुम्ही म्हणाल...

महाभारत आणि शक्तिमान या मालिकेतून घराघरात पोहचलेल्या प्रसिद्ध मुकेश खन्नांची गोष्टच वेगळी आहे.

युगंधर ताजणे

Mukesh Khanna Birthday Story why he never married : महाभारत आणि शक्तिमान या मालिकेतून घराघरात पोहचलेल्या प्रसिद्ध मुकेश खन्नांची गोष्टच वेगळी आहे. हा कलाकार आपल्याला जे वाटतं ते ठामपणे आणि बिनधास्तपणे बोलून मोकळा होतो. आपल्या बोलण्यानं कुणाला काय वाटेल याची त्यांना काही चिंता नसते.

गेल्या तीन दशकांहून अधिक काळ टीव्ही मनोरंजन आणि बॉलीवूडमध्ये सक्रिय असणाऱ्या मुकेश खन्ना यांचा आज वाढदिवस. त्यानिमित्तानं आपण त्यांच्याशी संबंधिक काही गोष्टी जाणून घेणार आहोत. आपल्या परखड आणि बेधडक वक्तव्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या मुकेश खन्नांची सध्या सोशल मीडियावर खूपच चर्चा आहे. त्यांनी ओम राऊत दिग्दर्शित आदिपुरुषवर सडकून टीका केली आहे.

Also Read - Internet shutdown : खरोखरच इंटरनेट बंद केल्याने दंगली थांबतात का?

आदिपुरुषमधून मेकर्सनं प्रेक्षकांच्या भावनेशी खेळ केला आहे. त्यामुळे त्यांना माफी नाहीत. त्यांनी कलाकृतीच्या नावाखाली जे काही तयार केले आहे ते कमालीचे निराशाजनक आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. यासगळ्यात खन्ना यांनी तो चित्रपट करणाऱ्यांना जिवंत जाळा. अशी जळजळीत प्रतिक्रिया देऊन नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. यासगळ्यात मुकेश खन्ना कोण, त्यांचे वैयक्तिक आयुष्य कसे आहे याविषयी काहींनी शोध घेतला आहे.

प्रेक्षकांना, चाहत्यांना त्यांच्या आवडीच्या सेलिब्रेटींच्या वैयक्तिक आय़ुष्यामध्ये रस असतो. त्याविषयी त्यांना सतत नवनवीन माहिती हवी असते. आज मुकेश खन्ना हे त्यांचा ६५ वा जन्मदिवस साजरा करत आहेत. महाभारतामध्ये त्यांनी भीष्म यांची भूमिका साकारली होती. तर शक्तिमान या मालिकेतून त्यांना अमाप लोकप्रियता मिळाली. ९० च्या दशकांतील या मालिकांना प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता.

एका मुलाखतीमध्ये मुकेशजींना त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावरुन प्रश्न विचारण्यात आला होता. तुम्ही अजूनही लग्न का केले नाही, याचे काही खास कारण आहे का, या प्रश्नावर त्यांनी दिलेले उत्तर चक्रावून टाकणारे होते. ते म्हणाले मी काही लग्नाच्या विरोधात नाही. मी महाभारतामध्ये भीष्माची भूमिका साकारली होती. त्यावेळी मी त्या भूमिकेच्या एवढ्या खोलात गेलो होतो की त्याचा नकळत परिणाम माझ्या व्यक्तिमत्वावर झाला. त्यामुळे मला काही निर्णय घ्यावे लागले.

मी जेव्हा भीष्म यांची भूमिका साकारत होतो तेव्हा त्या व्यक्तिरेखेच्या विचारधारेचा परिणाम माझ्यावर झाला. मला माहिती आहे की मी काही भीष्म नाही किंवा मी त्यांच्यासारखा होऊ शकणार नाही. मला माझ्या मर्यादाही माहिती आहेत. पण माझ्याकडून त्या गोष्टीचा कधीही विचार झाला नाही. लग्नं, प्रेम या गोष्टींच्या व्याख्या फारच वेगळ्या आहेत. अशा शब्दांत खन्ना यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या.

लग्नाबद्दल काय आहेत विचार....

लग्न हे दोन जीवांचे मिलन आहे. ती एक शुद्ध भावना आहे. त्यात दोन कुटूंबाचे एकत्रीकरण आहे. मला वाटते आपण त्यामागील कित्येक गोष्टींचा गंभीरपणे विचार करत नाही. त्याचा परिणाम आपल्या व्यक्तिमत्वावर होतो. तुम्ही २४ तास त्या गोष्टीशी बांधले जाता. काही मर्यादेत अडकून पडता. मला हे सगळे जमेल असे वाटले नाही. त्यामुळे मी नेहमीच एका कडेला राहिलो. असेही खन्ना यांनी त्या मुलाखतीमध्ये सांगितले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Subhanshu Shukla meet PM Modi : शुभांशू शुक्ला यांनी पंतप्रधान मोदींना दिली ‘ती’ खास भेटवस्तू ; जाणून घ्या, मोदी काय म्हणाले?

Nanded Rain : मुखेडमध्ये ३०० जणांना वाचविले; नांदेडमध्ये पावसाचा धुमाकूळ, ९ जण बेपत्ता, म्हशींसह ७० जनावरे गेली वाहून

Eleventh Admission : अकरावीच्या ‘सर्वांसाठी खुल्या’ फेरीअंतर्गत प्रवेशासाठी २२ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

Pune News : नेत्यांची वेळ न मिळाल्याने पुण्यातील उड्डाणपुलांचे उद्‍घाटन रखडले

इतिहासाची अमूल्य खुण भारतात! इतिहासाशी पुन्हा जोडणारा क्षण, मुख्यमंत्री फडणवीसांची भावनिक प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT