Mukta Barve 'Y' Movie Trailer Release Instagram
मनोरंजन

Video:आता झोप उडणार !सावध रहा.!! मुक्ता बर्वेचा बहुचर्चित 'Y' चा टीझर रिलीज

मुक्ता बर्वेसारखी मराठीतील गुणी अभिनेत्रीचा सिनेमा खूप दिवसांनी भेटीस येणार असल्यामुळे चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता पहायला मिळतेय.

प्रणाली मोरे

मुक्ता बर्वेने(Mukta Barve) हातात मशाल धरलेले 'Y' या चित्रपटाचे आगळेवेगळे असे पोस्टर काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित करण्यात आले. मशाल घेऊन नक्की ती कोणासोबत लढत आहे याचे विविध अंदाज अजूनही लावले जात आहेत. आता 'Y' चित्रपटाचा टीझरही प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. अजित सूर्यकांत वाडीकर दिग्दर्शित 'Y' २४ जून रोजी सर्वत्र प्रदर्शित होत आहे. मुक्ता बर्वे म्हणजे मराठी अभिनयसृष्टीला गवसलेला एक हिराच म्हणावा लागेल. तिनं आजपर्यत मालिका,नाटक,सिनेमा अशा सगळ्याच प्लॅटफॉर्मवर साकारलेल्या भूमिकांनी रसिकांच्या काळजाला थेट हात घातला आहे. त्यामुळे तिच्या सिनेमाची चर्चा तर होणारच. पण 'Y' या तिच्या आगामी सिनेमाचा टीझर मात्र खूप वेगळे संकेत देत आहे,उत्सुकता वाढवताना दिसतोय.(Mukta Barve 'Y' Movie Trailer Release)

अतिशय थरारक अशा या टीझरमध्ये झोपेतून अचानक जागे झालेल्या मुक्ताच्या दिशेने एक अक्राळविक्राळ कुत्रा गुरगुरत झेपावताना दिसत आहे. हा कुत्रा मुक्ताकडे का झेपावत आहे? नक्की काय घडतंय? कशासाठी घडतंय? अर्थात या सर्व प्रश्नांची उत्तरे प्रेक्षकांना चित्रपट पाहिल्यावर मिळणार आहेतच.

कंट्रोल एन प्रॉडक्शन्स निर्मित चित्रपटाची कथा अजित सूर्यकांत वाडीकर यांची असून पटकथा व संवाद अजित वाडीकर, स्वप्नील सोज्वळ व संदीप दंडवते यांनी लिहिलेले आहेत. तर कार्यकारी निर्माते विराज विनय मुनोत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Ganeshotsav: गणेशोत्सवासाठी मंडपात वीज कनेक्शन हवंय? BEST च्या ११ अटी पूर्ण करा, ELCB रिपोर्टही द्यावा लागणार, नवे नियम काय?

MS DHONI CSK STAKE CONTROVERSY: धोनीला CSKमध्ये २५ टक्के हिस्सा हवा होता? दाव्याने खळबळ, आकाश चोप्रांनी सांगितलं नेमकं सत्य

‘मराठी डाऊनमार्केट भाषा आहे असं सांगण्यात आलं’ चिन्मयी सुमीत यांनी सांगितला मुंबईतील जीमचा धक्कादायक अनुभव

सणासुदीत अन्नसुरक्षेवर FDAची नजर! शाळा, अंगणवाड्यांसह सेंट्रल किचनची तपासणी; नवे आदेश जारी करणार

Marathi News Live Updates : नेपाळमधील अचानक आलेल्या पुरामुळे मृतांची संख्या २५८ वर पोहोचली

SCROLL FOR NEXT