Divya Pugaonkar, Kiran Mane  
मनोरंजन

'कोणता बाप लेकीसाठी अपशब्द उच्चारेल'; 'साजिरी'चा किरण मानेंना सवाल

'मुलगी झाली हो' मालिकेत अभिनेत्री दिव्या पुगावकर साकारतेय साजिरीची भूमिका

स्वाती वेमूल

सोशल मीडियावर परखडपणे राजकीय मत व्यक्त केल्याने अभिनेते किरण माने (Kiran Mane) यांना स्टार प्रवाहवरील ‘मुलगी झाली हो’ (Mulgi Zali Ho) या मालिकेतून बाहेर काढल्याचं बोललं जात होतं. मात्र मालिकेचे दिग्दर्शक व कलाकारांनी हा दावा खोडून काढत किरण माने यांना त्यांच्या गैरवर्तणुकीमुळेच मालिकेतून काढल्याचं सांगितलं. याप्रकरणी काही राजकीय नेत्यांनीही उडी घेत प्रतिक्रिया दिल्या. तर दुसरीकडे 'मुलगी झाली हो' या मालिकेतील किरण मानेंच्या सहकलाकारांनीही मत व्यक्त केलं. मालिकेत साजिरीची भूमिका साकारणारी अभिनेत्री दिव्या पुगांवकर (Divya Pugaonkar) हिनेसुद्धा किरण मानेंवर आरोप केले. (Marathi Actress)

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत दिव्या म्हणाली, "मी या मालिकेत मुख्य अभिनेत्री असल्याचं त्यांना सतत खटकायचं. त्यावरून ते मला सतत टोमणे मारायचे. माझ्या वडिलांविरोधात ते बोलले, मला उघडपणे टोमणे मारले. माझ्याविरोधात अपशब्द उच्चारले. कुठला बाप आपल्या मुलीसाठी अपशब्द उच्चारतो", असा सवाल दिव्यानं केला. 'माझ्यावर ते मानसिक दबाव आणत होते. त्यांच्या गैरवर्तणुकीमुळे त्यांना मालिकेतून काढून टाकण्यात आलं आहे. ही घटना अचानक घडलेली नाही. सेटवर इतर कलाकारांसोबत त्यांची जी वागणूक होती, ती चुकीची होती. त्यांना तीन वेळा इशारासुद्धा देण्यात आला होता. वारंवार सांगूनही स्वभावात बदल न झाल्याने त्यांच्यावर कारवाई झाली', असं दिव्याने सांगितलं.

किरण माने यांना मालिकेतून बाहेर काढल्यानंतर राजकीय वातावरण तापलं होतं. नेटकरी तसेच काही राजकीय नेत्यांनी हा सांस्कृतिक दहशतवाद असल्याचं मत व्यक्त केलं होतं; मात्र त्यानंतर किरण माने यांच्याविरोधात ‘मुलगी झाली हो’ मालिकेतील कलाकार एकवटले आहेत. याबाबत दिग्दर्शक सचिन देव म्हणाले, की अभिनेते किरण माने यांची सेटवरील वागणूक बरोबर नव्हती. त्यांना प्रॉडक्शन हाऊसकडून तीन वेळा समज देण्यात आली होती. तरीही त्यांनी आपली वागणूक सुधारली नाही. त्यामुळे त्यांना मालिकेतून काढण्यात आलं. कोणत्याही राजकीय पक्षाच्या दबावाखाली किंवा राजकीय मत सोशल मीडियावर मांडलं म्हणून काढण्यात आलेलं नाही. अभिनेत्री शर्वाणी पिल्ले म्हणाल्या, की किरण माने यांची बोलण्याची आणि वागण्याची पद्धत बरोबर नव्हती. आपल्यामुळेच ही मालिका चालते, असा टेंभा वारंवार ते मिरवत होते. त्यांच्या अशा गैरवर्तणुकीमुळेच त्यांना काढण्यात आलं आहे. परंतु त्यांनी या गोष्टीला राजकीय रंग दिला आहे. ज्येष्ठ अभिनेत्री सविता मालपेकर यांनीही शर्वाणी पिल्ले आणि सचिन देव यांच्या प्रतिक्रियेला दुजोरा दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दोन तासांचा प्रवास ३० मिनिटात, कॅशलेस तिकिट अन्...; नव्या मेट्रो मार्गांचा मुंबईकरांना फायदा, CM फडणवीस काय म्हणाले?

Banana Crisis: दर तुमच्या मनाने ठरवा; पण केळी घेऊन जा...; निर्यात ठप्पमुळे शेतकरी हतबल; झाडावरच नासताहेत केळी, विकलेल्या मालाचे पैसे मिळेनात!

'लग्नानंतर होईलच प्रेम'मधून अभिनेत्रीची एक्झिट; पोस्ट करत म्हणाली, 'प्रवास जरी संपला असला तरी....'

Latest Marathi News Live Update : कल्याण ग्रामीणमध्ये गुरचरणाच्या जागेवर भूमाफियांचे अतिक्रमण

Supreme Court : कायदे -अधिकार असूनही महिलांवर पुरुषसत्तेचं नियंत्रण अजूनही कायम; सुप्रीम कोर्टाची खंत!

SCROLL FOR NEXT