Mulgi Zali Ho 
मनोरंजन

मालिका पाहून हुबेहूब केलं लेकीचं बारसं, नावही ठेवलं भूमिकेचं!

मुंबईतील गोरेगावमधल्या दाम्पत्याने कलाकारांना पाठवले फोटो

स्वाती वेमूल

मालिका आणि त्यामधील पात्र ही प्रेक्षकांच्या जगण्याचा अविभाज्य भाग असतात. त्या पात्रांच्या सुख-दु:खात प्रेक्षक अगदी समरसून जातात. याचंच बोलकं उदाहरण म्हणजे मुंबईतील गोरेगावमध्ये राहणारं साटेलकर कुटुंब. स्टार प्रवाह वाहिनीवरील सर्वच मालिका ते आवर्जून पाहतात. ‘मुलगी झाली हो’ Mulgi Zali Ho ही मालिका त्यांच्या अत्यंत आवडीची आहे. या मालिकेत ज्याप्रमाणे माऊचा बारसा दाखवण्यात आला, अगदी त्याचप्रमाणे त्यांनी आपल्या लेकीचं बारसं केलं आणि तिचं नावदेखील साजिरी असं ठेवलं. (mumbai couple followed their daughter naming ceremony as showned in the marathi serial )

काही दिवसांपूर्वीच मालिकेत माऊच्या बारश्याचा प्रसंग दाखवण्यात आला. माऊचे बाबा म्हणजेच विलास पाटील यांना आपली चूक उमजल्यानंतर खुल्या दिलाने त्यांनी माऊचा स्वीकार केला. इतकंच नाही तर तिला घरात हक्काचं स्थान देत तिचं साजिरी असं नामकरणही केलं. मालिकेतला हा भावनिक प्रसंग अंगावर रोमांचं उभं करणारा होता. साटेलकर दाम्पत्याला काही दिवसांपूर्वीच कन्यारत्नाचा लाभ झाला. मालिकेतल्या माऊच्या बारश्याच्या प्रसंगाने ते इतके भारावून गेले होते की मालिकेप्रमाणेचे अगदी हुबेहुब दिवे उजळून त्यांनी आपल्या लेकीचं नामकरणही साजिरी असं केलं.

मालिकेत विलास पाटील ही व्यक्तिरेखा साकारणाऱ्या किरण माने यांना साटेलकर कुटुंबाने बारश्याचे खास फोटो पाठवले. हे फोटो पाहून किरण माने भारावून गेले. 'आपला एखाद्या एपिसोडचा किंवा सीनचा एवढा प्रभाव पडावा हे खूप आनंद देणारं आहे. आता आयुष्यभर जेव्हा जेव्हा या गोड गोजिरीला तिच्या नावाविषयी विचारलं जाईल तेव्हा तेव्हा मुलगी झाली हो मालिकेची आठवण निघत राहिल. हे सर्व भारावून टाकणारं आहे,' अशी भावना अभिनेते किरण माने यांनी व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'शिवाजीनगर मेट्रो' स्थानकाचे नाव बदलण्यावरून वाद; फडणवीसांचा तीव्र विरोध, कर्नाटकचे CM म्हणाले, 'आम्ही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे...'

Shivaji University : शिवाजी विद्यापीठाच्या सत्तर टक्के प्रश्नपत्रिका ‘ऑनलाईन सेट’, डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर

Chhagan Bhujbal : ‘ओबीसीतूनच आरक्षण हवे, तर इतर सर्व आरक्षण सोडणार का?’ भुजबळांचे आव्हान

Latest Marathi News Updates : विंचूर उपबाजार आवारात कांद्याला कमी भाव, संतप्त शेतकऱ्यांचा रस्ता रोको आंदोलन

वरिष्ठ गाढवाला घोडा म्हणाले तर तुम्हीही घोडाच म्हणा; सरकारी कामाबाबत गडकरींचं विधान

SCROLL FOR NEXT