gangubai kathiawadi 
मनोरंजन

गंगुबाई काठियावाडींच्या मुलाचाच चित्रपटाला विरोध; आलिया भट्ट, भन्साळींना कोर्टाने बजावले समन्स

स्वाती वेमूल

संजय लीला भन्साळी दिग्दर्शित 'गंगुबाई काठियावाडी' हा चित्रपट घोषणेपासूनच चर्चेत राहिला आहे. आता या चित्रपटाविरोधात गंगुबाई काठियावाडी यांच्या मुलानेच याचिका दाखल केली आहे. बाबुराव शाह यांनी याचिका दाखल केल्यानंतर दिग्दर्शक भन्साळी, अभिनेत्री आलिया भट्ट आणि लेखकाला मुंबई कोर्टाने समन्स बजावले आहेत. या तिघांनाही २१ मे रोजी कोर्टासमोर हजर राहावं लागणार आहे. 'चित्रपटात अनेक गोष्टी चुकीच्या दाखवल्या असून त्यामुळे माझ्या कुटुंबीयांची बदनामी होत आहे', असा आरोप गंगुबाईच्या मुलाने याचिकेत केला. भन्साळींचा हा बहुचर्चित चित्रपट हुसैन झैदी यांच्या 'माफिया क्वीन्स ऑफ मुंबई' या पुस्तकावर आधारित आहे. 

कोण होत्या गंगुबाई काठियावाडी?
दिग्दर्शक भन्साळींना हुसैन झैदी यांच्या 'माफिया क्वीन्स ऑफ मुंबई' या पुस्तकातून गंगुबाई हे पात्र सापडलं. गंगुबाई या कामाठीपुरात वेश्या व्यवसाय करत होत्या. त्या मूळच्या गुजरातच्या होत्या. वयाच्या अवघ्या १६व्या वर्षी प्रेमविवाह करून त्या मुंबईला पळून आल्या होत्या. मात्र त्यांच्या पतीने केवळ ५०० रुपयांसाठी त्यांना वेश्या व्यवसायात ढकललं. कामाठीपुरात वेश्या व्यवसाय करताना गंगुबाईंचा अनेक गँगस्टरशी संपर्क आला. अशाच एका प्रसंगात त्यांची गाठ करीम लालाशी पडली आणि त्यांनी त्याला राखी बांधत भाऊ मानलं. त्या घटनेनंतर करीम लालाने अवघा कामाठीपुराच गंगुबाईंच्या हातात दिला, असं म्हटलं जातं. गंगुबाईंनी वेश्या व्यवसाय केला, मात्र त्यांनी कधीच कोणत्याही मुलीच्या इच्छेविरोधात तिला हा व्यवसाय करू दिला नव्हता, असंसुद्धा सांगितलं जातं. इतकंच नव्हे तर जेव्हा मुंबईतून वेश्या व्यवसाय काढून टाकण्यासाठी प्रयत्न सुरू झाले तेव्हा त्या आंदोलनाच्या नेतृत्वासाठी गंगुबाईंनी पुढाकार घेतला होता. 

कामाठीपुराच्या रहिवाशांकडूनही झाला होता विरोध
याआधी कामाठीपुराच्या रहिवाशांनी चित्रपटातून कामाठीपुरा हा उल्लेख वगळावा अशी मागणी केली होती. यासाठी त्यांनी मनसे चित्रपट कर्मचारी सेना अध्यक्ष अमेय खोपकर यांची भेट घेतली होती. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कॉकपिटमध्ये चाकू हल्ला, विमान वेगाने खाली आलं... तरी १७४ जणांचे प्राण वाचवणारे स्मित मच्छार कोण? साहस पाहून नेतान्याहू, ट्रम्पही शॉक

LPG Cylinder Price Hike : सणासुदीच्या तोंडावर महागाईचा झटका! कमर्शियल LPG सिलिंडरच्या दरात मोठी वाढ, जाणून घ्या तुमच्या शहरातील ताजे दर

Nuchinunde Recipe: इडली-वडा तर नेहमीच खाता; ट्राय करा कर्नाटकचं स्पेशल, प्रोटीनने भरपूर 'नुचिनुंडे'!

तुझ्या सेलिब्रेशनचा अर्थ काय? Rohit Sharma याला जड्डूचा सवाल; हिटमॅनचं उत्तर ऐकून रवी शास्त्रींही हसू लागले, Video Viral

Shaktipeeth Highway : ‘शक्तिपीठ’ महामार्गाला वेग; १२९ गावांमध्ये संयुक्त मोजणी पूर्ण, सरकारची मोठी तयारी

SCROLL FOR NEXT