Raj Kundra 
मनोरंजन

राज कुंद्राची कानपूरमधील बँक खाती गुन्हे शाखेच्या ताब्यात

अरविंदची पत्नी हर्षिताच्या बँक खात्यात जमा केले जात होते पैसे

स्वाती वेमूल

अश्लील चित्रफितनिर्मितीप्रकरणी मुंबई गुन्हे शाखेने व्यावसायिक आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राच्या कानपूरमधील स्टेट बँक ऑफ इंडियामधील दोन खाती ताब्यात घेतली आहेत. बँक कर्मचाऱ्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. राज कुंद्राच्या या दोन्ही बँक खात्यांमध्ये कोट्यवधी रुपये जमा करण्यात आल्याची माहिती बँक अधिकाऱ्यांनी दिली. रविवारी पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आली. याचवेळी कुंद्राशी संबंधित आणखी एक मोठी माहिती पोलिसांच्या हाती लागली. अरविंद श्रीवास्तव हा राज कुंद्राची प्रॉडक्शन कंपनी चालवत होता आणि सर्व पैसे अरविंदची पत्नी हर्षिताच्या बँक खात्यात जमा केले जात होते. 'टाइम्स ऑफ इंडिया'ने यासंदर्भातील वृत्त दिले आहे. (Mumbai Crime Branch seizes Raj Kundras bank accounts in Kanpur slv92)

अरविंद गेल्या दोन वर्षांपासून घरी न आल्याचं त्याचे वडील एन.पी. श्रीवास्तव यांनी एएनआय वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं. अरविंद घरी येत नसला तरी तो दर महिन्याला घरखर्चासाठी पैसे पाठवत असल्याचं त्यांनी पुढे सांगितलं. फेब्रुवारी २०२१ मध्ये मुंबई गुन्हे शाखेने अरविंद श्रीवास्तवसाठी लूकआऊट नोटीस जारी केल्याचं त्याच्या वडिलांनी सांगितलं. त्याचप्रमाणे त्याच्या कामाबद्दल आणि हर्षिताच्या बँक खात्यात जमा होणाऱ्या रकमेबद्दल कोणतीच माहिती नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

राज कुंद्राची हायकोर्टात धाव

राज कुंद्राने पोलीस कोठडी रद्द करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका केली आहे. जो कंटेंट पोलीस अश्लील म्हणून दाखवत आहेत तो थेट अश्लील वर्तन नसून एका विशिष्ट इच्छुक वर्गासाठी तयार केलेल्या शॉर्टफिल्म्स आहेत, असा दावा कुंद्राने केला आहे. पोलिसांनी केलेली अटक बेकायदेशीर असून त्याची कायदेशीर पूर्वसूचना देण्यात आली नाही. त्यामुळे महानगर दंडाधिकारींनी दिलेला रिमांडही बेकायदेशीर आहे असा दावा कुंद्राने केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT