मनोरंजन

'मुंबई डायरीज 26/11' मधुन अनुभवता येणार क्रौर्याची थरारक गोष्ट

गेल्या काही दिवसांपासून ओटीटीवर वेगवेगळ्या विषयांवरील मालिका प्रदर्शित होताना दिसत आहे.

युगंधर ताजणे

मुंबई - गेल्या काही दिवसांपासून ओटीटीवर वेगवेगळ्या विषयांवरील मालिका प्रदर्शित होताना दिसत आहे. ७५ व्या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्तानं अनेक चित्रपट बॉलीवूडमध्ये प्रदर्शित झाले होते.त्यात प्रामुख्यानं उल्लेख करायचा झाल्यास भुज द प्राईड ऑफ इंडिया आणि शेरशाह यांचे नाव सांगता येईल. आता अमेझॉन प्राईम व्हिडीओने त्यांच्या आगामी अमेझॉन ओरिजिनल सीरीज़ ‘मुंबई डायरीज़ 26/11’ च्या प्रीमियरची घोषणा केली आहे. 9 सप्टेंबर, 2021 ला प्रदर्शित होणार आहे. निखिल आडवाणी द्वारा निर्मित आणि एम्मे एंटरटेनमेंटच्या मोनिशा आडवाणी आणि मधु भोजवानी द्वारा निर्मित, या मेडिकल ड्रामाचे दिग्दर्शन निखिल आडवाणी आणि निखिल गोंसाल्वेस यांनी केले आहे.

मुंबई डायरी 26/11 मध्ये डॉक्टर्स, नर्सेस, पैरामेडिक्स आणि हॉस्पिटल्सच्या कर्मचाऱ्यांची संपूर्णपणे नवी कथा मांडण्यात येणार आहे, ज्यात 26 नोव्हेंबर, 2008ला शहरात झालेल्या आतंकवादी हल्ल्यात लोकांचा जीव वाचवण्याचे अथक प्रयत्न केले होते. या मालिकेमध्ये कोंकणा सेन शर्मा, मोहित रैना, टीना देसाई, श्रेया धनवंतरी, सत्यजीत दुबे, नताशा भारद्वाज, मृण्मयी देशपांडे आणि प्रकाश बेलावाड़ी सारख्या प्रतिभाशाली कलाकारांसोबत ‘मुंबई डायरीज 26/11’ 9 सप्टेंबर, 2021ला 240 हून अधिक देश आणि प्रदेशात अमेझॉन प्राईम व्हिडीओवर प्रदर्शित होणार आहे.

मुंबई डायरीज 26/11 एक काल्पनिक मेडिकल ड्रामा असून त्या अविस्मरणीय रात्रीच्या पार्श्वभूमिवर चित्रित करण्यात आला आहे ज्याने शहराला एकजुट केले. ही सीरीज त्या घटनांचा लेखा-जोखा आहे ज्यातून एक सरकारी इस्पितळातील आपातकालीन कक्ष, तेथील चिकित्सा कर्मचारी आणि त्यांच्यासोबत मुंबई शहरातील नागरिक एका जीवघेण्या संकटातून प्रवास करतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Strait of Hormuz: 'होर्मुझ'मधून जहाजांची वाहतूक सुरु होण्याचा मार्ग मोकळा; इराणने दिली माहिती, सामंजस्य कराराचा मसुदा तयार

SRH vs RR Eliminator IPL 2026: वैभव सूर्यवंशीसाठी 'क्रिकेट देवा'चे खास ट्विट... क्रिकेट दिग्गजांकडूनही कौतुक! RR चा धावांचा डोंगर

Latest Marathi News Live Update : राजकारणापासून ते गुन्हेगारीपर्यंत देशात आज काय-काय घडलं? एका क्लिकवर जाणून घ्या प्रत्येक अपडेट

Mumbai-Goa Highway : झाडं लावली की फक्त कागदावरच दाखवली? मुंबई-गोवा महामार्गावरील 'त्या' 1 लाख 96 हजार वृक्षांचं नक्की काय झालं? प्रशासनाचा नवा प्लॅन काय?

Crime: भयंकर! ४८७ हून अधिक पुरुषांसोबत शरीरसंबंधासाठी दबाव, सिगारेटचे चटके, मारहाण अन्... प्रियकराचं प्रेयसीसोबत पाशवी कृत्य

SCROLL FOR NEXT